'आदिपुरुष' मधील हनुमानाच्या पात्राच्या तोंडून टपोरी डायलॉग  ऐकून ते लोक खूप संतापले असतील ज्यांनी आपल्या मुलांना मोठ्या पडद्यावर काहीतरी चांगलं दाखवण्याच्या इच्छेने सिनेमागृहात गेले असतील.

image credit: twitter

मात्र, वादाचे कारण केवळ 'आदिपुरुष'चे टपोरी डायलॉग नसून, यामध्ये इंद्रजीतला 'टॅटू बॉय'सारखे दाखवणे, राम-रावणाच्या प्रतिमेशी छेडछाड करणे हेही लोकांच्या सहनशक्तीच्या बाहेर आहे.  चला तर मग बघुयात आदिपुरुष  मधील 10 चुका.

image credit: twitter

1. माता जानकीचा पोशाख:  'आदिपुरुष' मध्ये सीता माता वेगवेगळ्या पोशाखात दाखवली आहे, तर ज्यांना 'रामायण' समजते त्यांना हे चांगलंच माहीत आहे की जेव्हा राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात गेले तेव्हा त्यांनी फक्त भगवे कपडे घातले होते.

image credit: twitter

2. रावणाची दहा डोकी:  'आदिपुरुष'मध्ये रावणाची दहा डोकी बेढबपणे वर-खाली दाखवण्यात आली होती, ज्यामुळे पात्र अगदी बालिश वाटले होते. रावणाच्या लूकवर सोशल मीडियावर बरेच मीम्स बनवले जात आहेत.

image credit: twitter

3. इंद्रजित बनला 'टॅटू बॉय':  मेघनाथच्या पात्रात अभिनेता 'टॅटू बॉय'सारखा दिसतो. लोक या पात्राची खिल्ली उडवत त्याची सरड्याशी तुलना करत आहेत.

image credit: twitter

4. टपोरी डायलॉग: 'आदिपुरुष'च्या काही डायलॉगनी सर्वाधिक वाद निर्माण केला. 'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की' आणि 'तेरी बुवा का बगीचा है क्या जो हवा खाने चला आया' यांसारखे वाईट डायलॉग ऐकून प्रेक्षक प्रचंड संतापले होते.

image credit: twitter

5. पुष्पक विमान: रावणाने त्याच्या पुष्पक विमानाद्वारे माता सीतेचे अपहरण केले. कथेत याला खूप महत्त्व आहे, पण 'आदिपुरुष'मध्ये रावणाचे विमान पुष्पक विमान नाही तर एक वटवाघूळ दाखवण्यात आले आहे, त्यामुळे प्रेक्षक प्रचंड संतापले होते.

image credit: twitter

6. सुवर्ण लंका: 'आदिपुरुष'मध्ये जेव्हा लोकांनी सुवर्ण लंकेऐवजी काळी लंका पाहिली तेव्हा ते अधिक संतप्त झाले. सुवर्ण लंकेवर लोकांनी टोमणे मारत प्रश्न उपस्थित केले.

image credit: twitter

7. भगवान हनुमानाचे 'प्रणाम': 'आदिपुरुष'मध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, चित्रपटातील भगवान हनुमानाचे पात्र माता सीतेला नीट नमस्कारही करत नाही.

image credit: twitter

8. चित्रपटातील चुकीचे दृश्य: 'आदिपुरुष'मध्ये मेघनाथला मायावी सीतेचा शिरच्छेद करताना दाखवण्यात आले आहे.  'रामायण' किंवा 'रामचरितमानस' मध्ये अशा दृश्याचा उल्लेख किंवा वर्णन नाही. 'रामायण'च्या मूळ भावनेशी छेडछाड करणाऱ्या या दृश्यावर लोकांचा प्रचंड आक्षेप आहे.

image credit: twitter

9. चुकीची माहिती:  नेपाळच्या काठमांडूच्या महापौरांनी 'आदिपुरुष'च्या डायलॉगवर आक्षेप घेतला आहे, ज्यामध्ये सीता माताचे वर्णन भारताची कन्या आहे असा आहे. त्यामुळे काठमांडूमध्ये सर्व भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. कारण माता सीतेचा जन्म नेपाळमधील जनकपूर येथे झाला असे मानले जाते.

image credit: twitter

10. 'आदिपुरुष'च्या आणखी एका दृश्यात माता सीता हनुमानाला तिची ओळख म्हणून बांगडी देते, पण 'रामचरितमानस'मध्ये माता सीता हनुमानाला चुडामणी देते असे वर्णन आहे.

image credit: twitter