Thomas Edison Information In Marathi

थॉमस एडिसन यांचे जीवनचरित्र | Thomas Edison Information In Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Thomas Edison Information In Marathi. 

थॉमस एडिसन हे एक महान अमेरिकी शास्त्रज्ञ होते. एडिसन यांनी त्यांच्या आयुष्यात एक हजार पेक्ष्या जास्त शोध लावले आणि आजही त्या शोधांचे पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत.

1868 साली वयाच्या 21 व्या वर्षीच त्यांनी विद्युत मतमोजणी यंत्राचा शोध लावून त्याच पाहिलं पेटंट नोंदवलं. टाइम्स या वृत्तपत्राने 1997 मध्ये एक हजार वर्षातील जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तींच्या यादीत त्यांना पहिलं स्थान दिलं आहे.

एडिसन यांची थोडक्यात माहिती | Thomas Edison brief information

 • नाव : थॉमस एल्वा एडिसन
 • जन्म : 11 फेब्रुवारी 1847
 • जन्मस्थान : मिलन, ओहिओ, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
 • वडिलांचं नाव : सॅम्युअल ओगडेन एडिसन
 • आईच नाव : नॅन्सी मॅथिव इलिएट
 • पत्नी : मेरी स्टिलवेल, मीना मिलर
 • नागरिकत्व : अमेरिका

थॉमस एल्वा एडिसन यांचा जन्म आणि बालपण | Thomas Edison birth and childhood

थॉमस एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 साली अमेरिकेतील ओहियो राज्यातील मिलन शहरात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युअल ऑग्डन एडिसन आणि आईचं नाव नॅन्सी मॅथिव इलिअट होते. एडिसन यांनी वयाच्या 24 व्या वर्षीच 16 वर्षाच्या मेरी स्टिलवेल नावाच्या महिलेशी विवाह केला.

1871 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी त्या दोघांनी लग्न केलं होत. त्यांना तीन मुलं झाली विल्यम, थॉमस जुनिअर, आणि मरिआन. लग्नानंतर 13 वर्षांनी मेरी स्टिलवेल यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. एडिसन यांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीचं नाव मीना मिलर होतं. दुसऱ्या पत्नीलाही तीन मूळ झाली. मेंडेलिन, थिओडोर आणि चार्ल्स हि त्यांची मुलं.

थॉमस एल्वा एडिसन यांचं शिक्षण | Thomas Edison Education

थॉमस एडिसन लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. ते खूप जिज्ञासू वृत्तीचे होते. कोणतीही नवीन गोष्ट दिसली कि त्याबद्दल जाणून घेण्यात त्यांना उत्सुकता असे. परंतु सुरुवातीला शाळेत प्रवेश घेतल्यावर तीन महिन्यातच त्यांना मंदबुद्धी विद्यार्थी म्हणून शाळेतून हाकलून देण्यात आलं.

त्यानंतर त्यांच्या आईनं त्यांना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केलं. एडिसन जेंव्हा दहा वर्षांचे होते तेंव्हा गिबन, डिक्शनरी ऑफ सायन्स सारखे मोठे ग्रंथ वाचून पूर्ण केले.

थॉमस एडिसन यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे त्यांना स्कटलेट नावाचा आजार होता ज्यामुळं त्यांना ऐकू कमी येत होतं. त्यांच्या वयाच्या शेवटी त्यांना पूर्णपणे ऐकू येन बंद झालं होतं. परंतु या महान शास्त्रज्ञाने आपल्या बहिरेपच्या आजाराला आपल्या आडवं कधीच येऊ दिलं नाही.

आपलं ध्येय गाठण्यासाठी त्यांनी इमानदारीने कष्ट केले आणि साऱ्या जगाला आपली प्रतिभा दाखवून दिली.

थॉमस एल्वा एडिसन यांची  कारकीर्द | career and work of Thomas Edison Information In Marathi

थॉमस एडिसन यांनी लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या 13-14 व्या वर्षीच नोकरी करण्यास सुरुवात केली होती. रेल्वे स्टेशनवर एका कोपऱ्यात वृत्तपत्रे आणि चॉकलेट विकायचे.

  स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे जीवनचरित्र | Veer Savarkar in Marathi

1886 ला थॉमस एडिसन केंटुकीला गेले. तिथे त्यांनी असोसिएटेड प्रेस ब्युरो मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिथं त्यांनी रात्रीची नोकरी धरली. एडिसन रात्रभर नोकरी करायचे आणि दिवसभर प्रयोग करायचे.

एकदा बॅटरी चा प्रयोग करत असताना ऍसिड सांडलं आणि ते सर्वत्र पसरलं. तेंव्हा त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.

एडिसन यांनी लावलेले शोध | Thomas Edison research

1868 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षीच विद्युत मतमोजणी यंत्राचा शोध लावून त्यांनी आपलं पाहिलं पेटंट नोंदवलं होतं. नोकरी सोडून प्रयोगशाळेत नवनवीन संशोधन करण्याचं धाडस करून एडिसन यांनी आपला आत्मविश्वास आणि दृढनिश्चय जगाला दाखून दिलं. 1

870-1876 मध्ये एडिसन यांनी अनेक शोध लावले. वेगवेगळे संशोधन केले. एडिसन यांनी स्टॉक एक्सचेंज मध्ये वापरण्यात मशीन, बेल टेलिफोन अशा अनेक यंत्रांमध्ये सुधारणा केल्या.

1875 मध्ये एडिसन यांनी सायंटिफिक अमेरिका मध्ये इथरीय बल्ब या विषयावर शोधपत्रिका प्रकाशित केली. 1878 मध्ये फोनोग्राफ यंत्राचं पेटंट केलं. एडिसन यांनी प्रकाश, उष्मा आणि शक्ती या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सर्व विद्युत उपकरणांवर प्रयोग केली.

तीन तारी वीज वाहक प्रणालीसाठी लागणाऱ्या उपकरणांवर सुद्धा त्यांनी संशोधन केलं. डायनॅमो, मोटर यांमध्ये एडिसन यांनी सुधारणा केली पॅसेंजर तसेच मालवाहून नेणाऱ्या विद्युत रेल्वेचाही त्यांनीच अविष्कार केला.

चालत्या जहाजावरुन संदेश पाठवणे आणि ते प्राप्त करण्याच्या प्रणालीचाही त्यांनी शोध लावला. 1891 मध्ये व्हिडीओ कॅमेराचा शोधही त्यांनीच लावला. पहिल्या विश्व्युद्धाच्या काळात एडिसन जलसेना सल्लागार बोर्डाचे अध्यक्ष बनले. येथे त्यांनी 40 युद्धोपयोगी उपकरणांचा शोध लावला. 1927 मध्ये एडिसन नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सचे सदस्य म्हणून निवडून आले होते. [Thomas Edison Information In Marathi]

 • Incandescent Light Bulb (गरमागरम प्रकाश बल्ब)
 • Gramophone (ग्रामोफोन)
 • Kinetoscope (काइनेटोस्कोप)
 • Movie Camera (मूवी कैमरा)
 • Phonograph Cylinder (फोनोग्राफ सिलेंडर)
 • Electric Pen (इलेक्ट्रिक पेन)
 • Mimeograph (मिमियोग्राफ)
 • Tasimeter (टेसीमीटर)
 • Vitascope (विटास्कोप)
 • Phonomotor (फोनोमोटर)
 • Electric Power Distribution (विद्युत शक्ति वितरण)
 • Carbon Microphone (कार्बन माइक्रोफोन)
 • Vacuum Diode (वैक्यूम डायोड)
 • Quadruplex Telegraph (क्वाड्रुप्लेक्स टेलीग्राफ)
 • Kinetograph (काइनेटोग्राफ)
 • Rechargeable Battery (रीचार्जेबल बैटरी)
 • Thomas Edison Information In Marathi

थॉमस एडिसन याना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार | Honors and Awards of Thomas Edison in marathi

 • थर्ड फ्रेंच रिपब्लिकचे अध्यक्ष ज्युल्स ग्रेव्ही यांनी थॉमस एडिसनला लीजन ऑफ ऑनर (Légion d’honneur) हा अवॉर्ड 10 नोव्हेंबर 1881 रोजी बहाल केला, ज्युल्स बार्थेलेमी-सेंट-हिलेर, त्यांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, आणि त्यांच्यासोबत पोस्ट मंत्र्यांकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
 • 1879 मध्ये त्यांनी सैन्यात अधिकारी या पदावर कार्य केलं आणि नंतर त्यांना कमांडरची पदवी मिळाली.
 • थॉमस एडिसन यांना 1887 मध्ये मॅट्युची पदक देण्यात आले. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये सामील होण्यासाठी 1890 मध्ये त्यांची निवड झाली.
 • 1889 मध्ये, थॉमस एडिसनला फिलाडेल्फिया सिटी कौन्सिलने जॉन स्कॉट पदक दिले होते.
 • 1899 मध्ये, थॉमस एडिसनला फ्रँकलिन इन्स्टिट्यूटचे एडवर्ड लाँगस्ट्रेथ मेडल देण्यात आले. लुईझियाना प्रोक्युरमेंट एक्स्पोझिशन वर्ल्ड फेअरमध्ये, 1904 मध्ये थॉमस एडिसनला हा सन्मान मिळाला.
 • अमेरिकन असोसिएशन ऑफ इंजिनियरिंग सोसायटीजने 1908 मध्ये एडिसनला जॉन फ्रिट्झ पदकही दिले होते.
 • 1915 मध्ये एडिसन यांना फ्रँकलिन संस्थेकडून उद्योगाच्या विकासासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी योगदान दिल्याबद्दल फ्रँकलिन पदक मिळाले.
 • 1920 मध्ये अमेरिकेच्या नौदलाच्या विभागाकडून एडिसनला नौदलाचे विशिष्ट सेवा पदक देण्यात आले. 1927 मध्ये त्यांना राष्ट्रीय विज्ञान अकॅडेमीची मेम्बरशिप मिळाली.
 • 29 मे 1928 रोजी थॉमस एडिसन यांना काँग्रेसचे गोल्ड मेडल देण्यात आले.
 • 2008 मध्ये थॉमस एडिसन यांना सर्वोच्च मानला जाणारा न्यू जर्सी हॉल ऑफ फेम यामध्ये सामील करण्यात आले.
 • फ्लोरिडाचे गव्हर्नर आणि मंत्रिमंडळाद्वारे ग्रेट फ्लोरिडियन म्हणून ओळखल्या जाण्याव्यतिरिक्त, एडिसनला 2011 मध्ये उद्योजक वॉक ऑफ फेम आणि 2010 मध्ये तांत्रिक ग्रॅमी पुरस्कारात समाविष्ट करण्यात आले.
  सीव्ही रमण यांची माहिती | CV Raman Information

हे नक्की वाचा: [Thomas Edison Information In Marathi]
आइझॅक न्यूटन मराठी माहिती | Issac Newton Information in Marathi
लोकमान्य टिळक यांची माहिती । Lokmanya Tilak Information in Marathi
संत ज्ञानेश्वर महाराज | sant dnyaneshwar information in marathi

थॉमस एल्वा एडिसन यांचा मृत्यू | Thomas Edison death

थॉमस एल्वा एडिसन यांचा 18 ऑक्टोबर 1931 मध्ये वयाच्या 84 व्या वर्षी Glenmont, West Orange, New Jersey येथे राहत्या घरी त्यांचे निधन झाले. 

FAQ : [Thomas Edison Information In Marathi]

थॉमस एडिसन यांचा जन्म कधी झाला?

थॉमस एडिसन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ साली अमेरिकेतील ओहियो राज्यातील मिलन शहरात झाला होता.

थॉमस एडिसन यांचा मृत्यू कधी झाला?

थॉमस एल्वा एडिसन यांचा १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये वयाच्या 84 व्या वर्षी Glenmont, West Orange, New Jersey येथे राहत्या घरी त्यांचे निधन झाले. 

थॉमस एडिसओच्या पत्नीचं नाव काय?

एडिसन यांनी वयाच्या २४ व्या वर्षीच १६ वर्षाच्या मेरी स्टिलवेल नावाच्या महिलेशी विवाह केला. १८७१ मध्ये ख्रिसमसच्या दिवशी त्या दोघांनी लग्न केलं होत. त्यांना तीन मुलं झाली विल्यम, थॉमस जुनिअर, आणि मरिआन. लग्नानंतर १३ वर्षांनी मेरी स्टिलवेल यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. एडिसन यांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीचं नाव मीना मिलर होतं. दुसऱ्या पत्नीलाही तीन मूळ झाली. मेंडेलिन, थिओडोर आणि चार्ल्स हि त्यांची मुलं.

थॉमस एडिसन यांनी कशाचा शोध लावला?

Incandescent Light Bulb (गरमागरम प्रकाश बल्ब)
Gramophone (ग्रामोफोन)
Kinetoscope (काइनेटोस्कोप)
Movie Camera (मूवी कैमरा)
Phonograph Cylinder (फोनोग्राफ सिलेंडर)
Electric Pen (इलेक्ट्रिक पेन)
Mimeograph (मिमियोग्राफ)
Tasimeter (टेसीमीटर)
Vitascope (विटास्कोप)
Phonomotor (फोनोमोटर)
Electric Power Distribution (विद्युत शक्ति वितरण)
Carbon Microphone (कार्बन माइक्रोफोन)
Vacuum Diode (वैक्यूम डायोड)
Quadruplex Telegraph (क्वाड्रुप्लेक्स टेलीग्राफ)
Kinetograph (काइनेटोग्राफ)
Rechargeable Battery (रीचार्जेबल बैटरी)

सारांश: [Thomas Edison Information In Marathi]

मित्रानो या लेखात आपण Thomas Edison Information In Marathi बद्दल माहिती पहिली. मला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती आवडली असेल. कृपया खाली कंमेंट्सच्या माध्यमाने आम्हाला कळवा कि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. हि माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *