नमस्कार मित्रांनो, इंस्टामराठी या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत The Power of Your Subconscious Mind Book Review in Marathi
अनेक वेळा तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की काही लोक यशस्वी का होतात आणि काही लोक अपयशी का होतात? लोक इतके श्रीमंत आणि आनंदी कसे राहतात? तर याच उत्तर कुठे बाहेर नसून तुमच्या आतच आहे. होय, ही माणसाच्या अवचेतन मनाची शक्ती आहे जी त्याला यश,श्रीमंती आणि आनंद किंवा दुःख आणि अपयश देते.
मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये हे जाणून घेणार आहोत की आपल्या अवचेतन मनाचा वापर करून आपण आपल्या जीवनात आपल्याला जे हवे आहे ते कसे मिळवू शकतो.
मित्रांनो, जर तुम्हाला भरपूर संपत्ती मिळवायची आहे किंवा तुम्हाला एक चांगला जीवनसाथी हवा आहे किंवा तुम्हाला कोणत्याही आजारापासून मुक्त व्हायचे आहे. तर हे सगळं शक्य आहे. तुम्ही तुमच्या अवचेतन मनाचा वापर करून तुम्हाला हवे ते मिळवू शकता.
मित्रानो जसे कि आपल्याला आईसबर्ग माहीतच असेल. आईसबर्ग म्हणजे बर्फाचा डोंगर. या आईसबर्गचा 10% भाग पाण्याच्या वर असतो ज्याला आपण पाहू शकतो. आणि 90% भाग पाण्याखाली असतो जो आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या मनाचा 10% भाग हे आपले चेतन मन आहे.
मित्रांनो, आपले चेतन मन म्हणजे ते असते ज्याच्या सहाय्याने आपण विचार करतो, प्रश्न विचारतो, निर्णय घेतो आणि हे मन आपण जोपर्यंत जागे असतो तोपर्यंतच कार्य करत असते. आणि आपल्या मनाचा 90% भाग म्हणजे आपले अवचेतन मन.
आपले अवचेतन मन हे आपल्या भावना आणि विचारांचे साठवण केंद्र आहे. मित्रांनो, हे शरीरातील महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवते, जसे की आपले हृदय, किडनी, लीवर इत्यादी…
मित्रांनो, आपले अवचेतन मन हे टाइमलेस आणि स्पेसलेस आहे आणि त्याचा संबंध यूनिवर्स सोबत आहे. जसे आपले विचार आणि भावना असतात तसेच आपले जीवन देखील असते. मित्रांनो, हे विचार आणि भावना चेतन मनातूनच आपल्या अवचेतन मनात प्रवेश करतात.
मित्रांनो, जे काही तुम्ही तुमच्या चेतन मनात रिपीट करता किंवा तुम्ही जसे विचार करत राहता, तेच तुमचे अवचेतन मन शिकत राहते.
तुमच्या अवचेतन मनाला हे काळात नाही कि काय चांगलं आहे आणि काय वाईट. तुम्ही जसे विचार करता तसेच तुमचे अवचेतन मन तुम्हाला घडवत जातं.
मित्रांनो, मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजावतो….
ज्याप्रमाणे घोडा आणि घोडेस्वार. मित्रांनो, घोडा अतिशय पॉवरफुल, वेगवान आणि चपळ असतो परंतु घोडेस्वार त्या घोड्याचे नियंत्रण करतो.
नेमकं त्याचप्रमाणे आपल्या अवचेतन मनामध्येहि खूप शक्ती आहे, परंतु ते आपल्या चेतन मनाने नियंत्रित केले आहे ज्याद्वारे आपण विचार करतो.
मित्रांनो, तुमच्या अवचेतन मनाचा वापर करून तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते कसे मिळवू शकता ते आपण पाहुयात. मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यात नेमकं काय पाहिजे आहे ते स्पष्टपणे जाणून घेतले पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो…
तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत किंवा तुम्हाला एखादा व्यवसाय उभा करायचा आहे किंवा तुम्हाला कुठल्यातरी आजारापासून मुक्ती मिळवायची आहे.
आता तुमच्या चेतन मनात एक गोष्ट क्लिअर झाली आहे कि तुम्हाला काय पाहिजे आहे ते ? आता तुम्हाला ही गोष्ट तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचवायची आहे. मित्रांनो, लेखक जोसेफ मर्फी यांनी दिलेल्या काही नियमांचे पालन करून तुम्ही तुमचे विचार तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचवू शकता.
मित्रांनो, तुम्हाला जे पाहिजे आहे ते एका कागदावर लिहा आणि दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी, परत परत वाचा.
यालाच अफर्मेशन देखील म्हणतात. दररोज सकाळी उठल्यानंतर, आपले चेतन मन शांत असत. आपल्या मनात कसलेही विचार नसतात.
आणि अशा वेळी जर तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्या चेतन मनाला सांगितली तर ती गोष्ट आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचते. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अर्ध्या झोपेच्या अवस्थेत असता, तेव्हा तुमचे चेतन मन निष्क्रिय होत असत, आणि मग तुम्ही झोपण्यापूर्वी जेंव्हा एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करता, तेव्हा ती गोष्ट तुमच्या अवचेतन मनाकडे जाते.
हे नक्की वाचा:
तुमचे विचार तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात
पैसे कमावण्याचे हे नियम लवकर शिकून घ्या
यशस्वी लोकांच्या या सात सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील
मित्रांनो, दुसरे म्हणजे, तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीचाही वापर करावा लागणार आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवे आहे त्याची कल्पना करा, एखाद्या सिनेमाप्रमाणे… मित्रांनो, जर तुम्हाला एखादा व्यवसाय सेटअप करायचा असेल, तर कल्पना करा की तुमचा व्यवसाय सेटअप झाला आहे आणि तुम्ही तुमच्या क्लायंटशी डील करत आहात आणि तुम्हाला भरपूर ऑर्डर्स मिळत आहेत.
जर तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील, तर कल्पना करा की तुम्ही परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहात किंवा तुम्हाला चांगली नोकरी मिळाली आहे आणि चांगला पगारही मिळाला आहे.
मित्रांनो, एकदा का या गोष्टी तुमच्या अवचेतन मनात गेल्या की, तुमचे अवचेतन मन निसर्गाशी जोडले जाईल आणि तुमची परिस्थिती अशी बनवेल की तुम्ही ती गोष्ट 100% साध्य कराल.
मित्रांनो, यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
- तुम्हाला इतरांवर जळणे सोडून द्यायचे आहे.
- तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकायचे आहेत.
- मी एखादी गोष्ट कधीच करू शकत नाही, असा विचार तुम्हाला तुमच्या मनातून काढून टाकायचा आहे.
- माझ्यासाठी हि गोष्ट अशक्य आहे, त्याऐवजी तुम्हाला असा विचार करायचा आहे कि एक दिवस मी हे नक्कीच विकत घेईन.
मित्रांनो, तुम्ही तुमच्या क्षमतेवर अजिबात शंका घेऊ नका आणि तुम्ही नेहमी सकारात्मक राहा. जर तुमच्या मनात थोडीशीही शंका किंवा नकारात्मकता आली, तर तुमच्या अवचेतन मनाला चुकीचे संकेत पाठवले जातील आणि मग तुमचे अवचेतन मन त्याप्रमाणेच कार्य करेल.
मित्रांनो, आता ही सबकॉन्शस मनाला प्रोग्रॅम करण्याची टेकनिक वेगवेगळ्या क्षेत्रात कशी लागू केली जाते ते समजून घेऊयात. {The Power of Your Subconscious Mind Book Review in Marathi}
1. एखाद्या आजाराच्या उपचारामद्ये हि टेकनिक कशी वापरली जाते हे पाहुयात.
मित्रांनो लेखक जोसेफ मर्फीचे वडील टीबी चे पेशंट होते आणि त्यांची फुफुसं खराब झाली होती. त्यांची तब्येत सुधारण्यात डॉक्टरांनाही यश आले नव्हते, त्यानंतर लेखक जोसेफ मर्फी यांनी त्यांच्या वडिलांना एक क्रॉस दिला आणि त्यांना सांगितले की हा एक अतिशय पवित्र क्रॉस आहे.
कारण ते एका महान पादरीचे आहे. ज्याने 150 वर्षे ध्यान केले होते आणि हे ऐकून त्यांच्या वडिलांनी तो क्रॉस आपल्या छातीवर ठेवला आणि त्यात पवित्र शक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांचा आजार बरा होईल या विचाराने ते झोपी गेले.
मित्रांनो, काही दिवसांनी त्यांची तब्येत सुधारली आणि डॉक्टरांनाही हे ऐकून आश्चर्य वाटले. नंतर जोसेफ मर्फीने सांगितले की, हा क्रॉस कोणत्याही पादरीचा नाही, तर त्यानी तो शेजारच्या दुकानातून विकत घेतला होता. पण त्यांचे वडील बरे झाले कारण त्यांना वाटले की त्यात पवित्र दैवी शक्ती आहे.
आणि त्यांनी त्यांच्या सुप्त मनाला हा संकेत दिला होता की त्यात पवित्र शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळे त्यांचा आजार आता बरा होईल आणि जोसेफचे वडील अवचेतन मनाच्या शक्तीने बरे झाले.
मित्रांनो, तुम्ही अनेकदा ऐकले असेल की एखाद्या आंधळ्या माणसाचे डोळे कोणत्या ना कोणत्या मंदिरात आले किंवा कोणाचा कर्करोग बरा झाला. या सर्व गोष्टींमागील विज्ञान हे तुमच्या अवचेतन मनाची उपचार शक्ती आहे.
मित्रांनो, या सर्व प्रकरणांमध्ये रुग्णांची कोणत्यातरी अज्ञात शक्तीवर अतूट श्रद्धा असते आणि हीच श्रद्धा मनात ठेवून ते अखंड प्रार्थना करतात. आणि या प्रार्थनेद्वारे हा संकेत त्यांच्या अवचेतन मनाकडे जातो आणि त्यांचे अवचेतन मन त्यांना त्याच्या उपचार शक्तीचा वापर करून बरे करते.
2. यश आणि संपत्ती मिळवण्यासाठी हि टेकनिक कशी वापरली जाते हे पाहुयात
मित्रांनो, एक मुलगी एका औषधांच्या दुकानात काम करायची पण तिचे स्वप्न औषध दुकानाची मालकीण बनण्याचे होते. तिने एके दिवशी या पुस्तकाच्या लेखकाला सांगितले की तिला औषधांच्या दुकानाची मालकीण व्हायचे आहे, परंतु तिला असे वाटत होते कि तिच्यासाठी हे अशक्य आहे. कारण तिच्याकडे एवढे पैसे नव्हते.
लेखकाने त्या मुलीला तिचे स्वप्न एका कागदावर लिहायला सांगितले आणि दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना ते वाचण्यास सांगितले. त्याचबरोर तिच्या स्वप्नांबद्दल इमॅजिन हि करायला सांगितले. त्यानंतर ती मुलगी रोज सकाळी उठल्यावर औषधांच्या दुकानाची कल्पना करू लागली. ती लोकांना कशी औषधे देत आहे आणि लोक तिची औषधे घेऊन बरे होत आहेत याची कल्पना करू लागली.
मित्रांनो, त्यानंतर काही दिवसांनी शालिनी जिथे काम करत होती ते औषध दुकान बंद झाले आणि त्यामुळे शालिनीला औषध मार्केटिंगचे काम करावे लागले. मित्रांनो, एके दिवशी ती औषध विक्रीसाठी एका औषध दुकानात पोहोचली. ते दुकान एका खूपच वयस्कर माणसाचं होतं. त्याला कोणी नातेवाईकही नव्हते. त्या मुलीची इमानदारी आणि कामाप्रती समर्पण पाहून त्या म्हातार्याने आपले दुकान कमी किमतीत त्या मुलीला देण्याचे ठरवले. आणि अशा प्रकारे ती मुलगी त्या औषध दुकानाची मालक झाली. मित्रांनो, त्या मुलीप्रमाणे प्रमाणे जर तुम्हीहि तुमच्या अवचेतन मनाला योग्य संकेत दिला आणि कल्पनाशक्तीचा योग्य वापर केला तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे ते साध्य करू शकता.
3. विवाह आणि नातेसंबंध चांगल्याप्रकारे टिकवण्यासाठी हि टेकनिक कशी वापरली जाते हे पाहुयात
मित्रांनो, अनेकांना ही समस्या असते की त्यांचे त्यांच्या जोडीदारासोबतचे संबंध चांगले नसतात आणि त्यांच्यात नेहमी भांडणे होतात. मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की नाते आणि विवाह हे आध्यात्मिक संबंध जोडण्यासाठी केले पाहिजेत.
मित्रांनो, तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये हृदयाचे नाते असावे. पैशासाठी किंवा अहंकाराच्या समाधानासाठी आपण कधीही लग्न करू नये. मित्रांनो, चांगला जोडीदार मिळवण्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर शंका घेणे बंद करा आणि तुम्हाला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे एका कागदावर लिहा.
लिहिल्यानंतर, दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी ते वाचा आणि त्याचबरोबर कल्पना करा की तुम्हाला हवा असलेला जोडीदार तुम्हाला मिळाला आहे. मित्रांनो तुमची मागणी प्रेम, शांती आणि भावनांची असावी, पैसा, सत्ता आणि वासना नाही…
मित्रांनो, जर तुम्ही ऑलरेडी एखाद्या रिलेशनशिप मध्ये आहेत आणि तुमचे नाते चांगले चालत नसेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल नकारात्मक विचार करून चालणार नाही तर तुम्हाला नेहमी सकारात्मक कल्पना करावी लागेल.
मित्रांनो, दररोज सकाळी उठल्यावर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या दोघांमधील संबंध चांगले राहावेत आणि तुमच्या दोघांमध्ये कधीच दुरावा येण्याचा विचार करू नये. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाला हा संकेत द्यायचा आहे की सर्व काही ठीक आहे, सर्व काही मनासारखं आहे आणि तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप खुश आहेत…
तर मित्रांनो, आजच्या आमच्या The Power of Your Subconscious Mind Book Review in Marathi या लेखामध्ये, इतकंच होतं, तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा.
Pingback: Rich Dad Poor Dad Book Review in Marathi
Pingback: यशस्वी लोकांच्या या सात सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील | The 7 Habits of Highly Effective People Book Review in Marathi