The 7 Habits of Highly Effective People Book Review in Marathi

यशस्वी लोकांच्या या सात सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील | The 7 Habits of Highly Effective People Book Review in Marathi

नमस्कार मित्रांनो, इंस्टामराठी या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत The 7 Habits of Highly Effective People Book Review in Marathi

तुम्ही कधी विचार केला आहे का, की काही लोक आयुष्यात इतके यशस्वी का होतात? तर दुसरीकडे, काही लोक नेहमीच संघर्ष करत राहतात. पण त्यांना यश मिळत नाही. 

तुमच्या या प्रश्नाचे उत्तर स्टीफन कोवे यांच्या 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल म्हणजेच मराठीमध्ये अत्यंत प्रभावी लोकांच्या सात सवयी या पुस्तकात मिळेल.

मित्रानो तुम्हाला तो सुविचार माहित आहे का,

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

होय मित्रानो हे बरोबर आहे. खरंतर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आयुष्यात प्रत्येक क्षण, प्रत्येक परिस्थिती आपल्याला एक नवीन पर्याय देत असते . आणि अशा परिस्थितीत आपल्याकडे नेहमीच योग्य आणि सकारात्मक गोष्टी निवडण्याची संधी असते.

आपल्या सवयीच आपलं आयुष्य बनवत असतात, आज आपण जे काही आहोत ते मागील दिवसांच्या सवयीमुळे आहोत, म्हणूनच आपल्या आयुष्यातील सवयी सुधारणे फार महत्वाचे आहे. तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलावे लागेल. आणि हे काम तुम्हाला तुमच्या सवयी बदलून करता येईल.

स्टीफन आर कोवे यांचे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक 1989 मध्ये प्रकाशित झाले होते. पण आजही हे जगातील सर्वोत्तम सेल्फहेल्प पुस्तकांपैकी एक आहे. आजही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खूप प्रभावी आहेत. या पुस्तकात अशा 7 सवयींचे वर्णन करण्यात आले आहे ज्या एक यशस्वी आणि प्रभावी व्यक्ती बनण्यासाठी आवश्यक आहेत. चला तर मग पाहुयात त्या सात सवयी ज्या प्रभावी आणि यशस्वी लोकांमध्ये असतात

1. पहिली सवय: Be Proactive सक्रिय व्हा

जगात दोन प्रकारचे लोक असतात : Proactive आणि reactive.

reactive लोक ते असतात जे नेहमी इतरांना दोष देत असतात. अशी लोक स्वतःच्या परिस्थितीचा दोष  आपल्या फॅमिलीला, मित्रांना किंवा  सरकारला देत असतात.  दोष देण्यासाठी कोणी नाही भेटलं तर अशी लोक शेवटी स्वतःच्या नशिबाला दोष देतात. त्यांना असे वाटते त्यांच्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे ते इतरांमुळेच घडत आहे.

दुसरीकडे, Proactive लोकं दुसऱ्याला दोष देण्याऐवजी जे घडले त्याच्या पुढे काय करता येईल याकडे लक्ष देतात. Proactive लोकं स्वतःच्या परिस्थितीची स्वतः जबाबदारी घेतात. मित्रानो Proactive असणे किंवा सक्रिय असणे याचा अर्थ असा आहे कि इतरांच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्यावर परिणाम न होऊ देता आपल्या आयुष्यात जे ध्येय आहे त्याकडे फोकस करायचं.

अनेकांना इतरांचे वागणे, बोलणे वाईट वाटते. अशा गोष्टींना इग्नोर करायचं सोडून, अनेक जण उलट उत्तर देतात किंवा भांडत बसतात. अशा लोकांना reactive किंवा प्रतिक्रियाशील म्हणतात. कारण ते प्रतिक्रिया देत असतात. लेखक म्हणतो की रिऍक्टिव्ह होण्याऐवजी Proactive व्हा. म्हणजे लोकांच्या वाईट गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ नका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि शांतपणे तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत रहा. जर तुम्ही प्रत्येक नेगेटिव्ह गोष्टीला प्रतिक्रिया देत बसलात तर तुम्ही फक्त तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवाल.

मित्रांनो, तुम्हाला सर्वत्र नकारात्मक लोक आढळतील. घरात, ऑफिसमध्ये, शाळा-कॉलेजमध्ये, सोसायटीत. ते तुम्हाला टोमणे मारतील, तुमच्याबद्दल वाईट बोलतील, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष्य न देता तुमच्या ध्येयावर फोकस केलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. त्यामुळे आजपासूनच Proactive होण्याचा प्रयत्न करा.

हे नक्की वाचा:
तुमचे विचार तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात
पैसे कमावण्याचे हे नियम लवकर शिकून घ्या
जे पाहिजे ते मिळेल, फक्त तुमच्या सबकॉन्शिअस मनाची शक्ती जाणून घ्या

2. दुसरी सवय: Begin With End In The Mind (अंतिम ध्येय ठरवूनच सुरुवात करा)

लेखक म्हणतो की, जेव्हा पण आपण कोणतेही काम करतो तेव्हा आधी त्याचे नियोजन करतो. आणि मग ते काम करू लागतो. काम करत असताना आपण इतके व्यस्त होतो की अंतिम ध्येय काय आहे ते आपल्याला आठवत नाही. म्हणूनच आजपासून जेव्हाही तुम्ही कोणतेही काम कराल तेव्हा प्रथम तुम्हाला कुठे पोहोचायचे आहे याचा विचार करा आणि मगच त्या कामाची सुरुवात करा.

  तुमचे विचार तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात | Think and Grow Rich Book Review in Marathi

जसे कि, जर तुम्हाला बॉक्सिंग शिकायचे असेल तर तुमचे अंतिम ध्येय काय आहे? तुम्हाला फक्त कॉलेजमधील संघात खेळायचे आहे, राज्य पातळीवर खेळायचे आहे की ऑलिम्पिकला जायचे आहे?

जोपर्यंत तुम्ही अंतिम ध्येय ठरवत नाही तोपर्यंत तुमच्या मनात संभ्रम कायम राहील. गोंधळलेले मन तुम्हाला योग्य प्रकारे मदत करू शकणार नाही. तुम्हाला अभिनेता व्हायचे असले तरी अंतिम ध्येय ठरवा. टीव्ही सिरियलमध्ये जायचे आहे कि चित्रपटात जायचे आहे? अंतिम ध्येयाचा विचार करूनच कामाला सुरुवात करा. यामुळे तुमचे मन पूर्ण उत्साहाने तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे ढकलण्यास सुरुवात करेल. तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर कोणता व्यवसाय करायचा आहे, त्यातून तुम्हाला किती कमाई करायची आहे, इत्यादी.

क्षेत्र कोणतेही असो, सर्व प्रथम शांत बसून अंतिम ध्येयाचा विचार करा, शेवटी काय साध्य करायचे आहे ते ठरवा आणि मग सुरुवात करा.

3. तिसरी सवय : Put First Thing First (महत्वाच्या गोष्टींना प्राथमिकता द्या)

मित्रांनो, कधी कधी आपल्याला हजारो गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणते काम करायचे आणि कोणते सोडायचे हे ठरवणे कठीण होऊन बसते. लेखक म्हणतात की अशा परिस्थितीत सर्वात महत्त्वाचे काम आधी केले पाहिजे.

आमच्याकडे अनेक कामं असतात, त्यातील काही अत्यंत महत्त्वाचे असतात तर काही अत्यावश्यक असतात. पण कोणते काम कोणत्या वेळी करायचे याचं  ज्ञान आपल्याला नसतं. त्यामुळं एकही काम आपण योग्यरीत्या करू शकत नाही.आणि मग वेळ निघून गेल्यावर आपल्याला वाईट वाटतं.

एक बॅलन्सड लाईफ जगण्यासाठी, तुम्हाला एक गोष्ट समजायला हवी ती म्हणजे तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्ट करू शकत नाही. स्वतःला स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त कामात व्यस्त करण्याची गरज नाही. जेंव्हा गरज पडेल तेंव्हा नाही म्हणायला संकोच करू नका. आपल्या महत्वाच्या प्रायॉरिटीज वर फोकस करायला शिका.

4. चौथी सवय : Think Win-Win (सर्वांचा विजय व्हावा असं विचार करा)

यात लेखक सांगतात की जेव्हा जेव्हा वाद होतात तेव्हा असा मार्ग शोधला पाहिजे की ज्यामुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल. मी जिंकलो आणि समोरची व्यक्ती हरली असा विचार करू नये. अशा परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीच्या मनात सूडाची भावना निर्माण होते. आणि कधी ना कधी ती व्यक्ती तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते.

प्रभावी लोक नेहमी जिंकण्याच्या मानसिकतेने काम करतात. ते त्यांच्या गरजा आणि इतरांच्या गरजा अशा प्रकारे एकत्र करतात की दोघांनाही असे वाटते की फक्त त्यांनाच फायदा झाला आहे.

कोणत्याही खेळात असे घडते की एक संघ जिंकतो आणि दुसरा हरतो. पण आयुष्याच्या खेळात असं होत नाही. जिंकण्यासाठी कोणालातरी हरावंच लागतं असं नाही. जगातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी पुरेशी आहे.

केवळ Win-Win परिस्थितीच योग्य संबंध बनवू शकते. आधी समोरच्या व्यक्तीला काय हवे आहे हे समजून घेतले पाहिजे. आणि तुमची गरज काय आहे हे समजून घ्या. मग या दोघांमध्ये सामंजस्य निर्माण करून काम करा. या विचाराने, अतिप्रभावी लोक प्रत्येकाच्या विजयाचा विचार करतात आणि या सवयीने परस्पर संबंध मजबूत करण्यावर भर देतात.

5. पाचवी सवय : Seek First To Understand Then, To Be Understood  (आधी समजून घ्या आणि मग समजावा)

संभाषण कौशल्य हे एक महत्वाचं स्किल आहे. आपण आयुष्यातील कित्येक वर्षे लिहिणे, वाचणे आणि  बोलणे  या गोष्टी शिकण्यासाठी घालतो. परंतु ऐकण्याचं काय ? असं कोणतं शिक्षण आहे जे आपल्याला ऐकायला शिकवत.ज्यामुळे आपण समोर बोलणाऱ्या माणसाचं खरच समजून घेतो का?

  पैसे कमावण्याचे हे नियम लवकर शिकून घ्या | Rich Dad Poor Dad Book Review in Marathi

तर याच उत्तर नाही हेच आहे. असं का ?

कधी कधी एखादा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य आपल्याशी एखाद्या समस्येवर चर्चा करतो, पण त्याचा मुद्दा नीट समजून न घेता आपण त्याला लेक्चर द्यायला सुरुवात करतो. आपण फक्त इतरांना उत्तर देण्यासाठी गोष्टी ऐकू नयेत. कधी कधी इतरांच्या फीलिंग्स समजून घेण्यासाठी सुद्धा शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला काय सांगायचे आहे हे समजून घ्यायला पाहिजे.

प्रभावशाली लोक फक्त इतरांच बोलणं ऐकत नाहीत. त्याऐवजी, त्याला कसे वाटत आहे, त्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा ते इतरांना समजून घेतात, तेव्हाच ते काहीतरी समजावून सांगण्याच्या दिशेने जातात.

6. सहावी सवय : Synergize (समन्वय साधणे)

हि सवय आपल्याला एकत्र टीममध्ये काम करायला शिकवते. समन्वय साधणे म्हणजे – टीम मध्ये सहकार्य करायला शिकने. कोणत्याही कंपनीतील एखादी व्यक्ती एकट्याने संपूर्ण प्रोजेक्ट करू शकत नाही. संपूर्ण टीमला एकजुटीने काम करावे लागते.

बॉसचे आवडते बनण्यासाठी तुम्ही टीम सोडून एकट्यानेच काही तरी करण्याचा प्रयत्न केला तर टीमचा तुमच्यावरील विश्वास उडेल. पुढे जाऊन नुकसान फक्त तुमचेच होईल. कारण तुमची प्रतिष्ठा खराब होईल. म्हणूनच टीमसोबत काम करा. कुटुंबातही समन्वय ठेवायला शिका. कारण वाईट काळात आपलं कुटुंबच आपल्याला साथ देत असतं.

7. सातवी सवय : Sharpen Your Saw (सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहा)

याचा अर्थ असा कि कुर्हाड जेवढी धारदार असते तेवढ्या लवकर झाड तोडता येते. कुऱ्हाडीला धार लावली नाही तर कुर्हाड गंजते. त्याचप्रमाणे लेखक सांगतात की आपण आपली कौशल्ये सुधारत राहिली पाहिजेत. नाहीतर आपल्या बुद्धीला सुद्धा गंज लागेल.

  • तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहायचे असेल तर नियमित व्यायाम करा.
  • समाजात चांगले स्थान मिळवायचे असेल तर समाजामध्ये चांगले आणि अर्थपूर्ण संबंध बनवा. समाजसेवा करा.
  • आध्यात्मिक राहण्यासाठी ध्यान, योग, उपासना इत्यादी करत राहा.
  • आनंदी राहण्यासाठी काही छंद शिकत रहा – जसे गिटार वाजवणे, पोहणे, चित्र काढणे इ.
  • यासोबतच तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये ज्या स्किलची गरज आहे असे स्किल्स शिकत राहा. ज्यामुळे तुम्ही नेहमी अपडेटेड असाल.
  • स्वत:साठी वेळ काढून तुम्ही या गोष्टी करत राहिले पाहिजे. तुम्हाला सतत शिकत राहावे लागेल, तुम्हाला तुमच्या कौशल्यांना धार द्यावी लागेल. आणि अत्यंत प्रभावशाली लोक सातत्याने तेच करतात.

तर मित्रानो मला आशा आहे कि तुम्हाला The 7 Habits of Highly Effective People Book Review in Marathi हा लेख नक्कीच आवडला असेल. तुम्हाला हि माहिती कशी वाटली? कंमेंट करून नक्की कळवा.

1 thought on “यशस्वी लोकांच्या या सात सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील | The 7 Habits of Highly Effective People Book Review in Marathi”

  1. Pingback: जे पाहिजे ते मिळेल, फक्त सबकॉन्शिअस मनाची शक्ती जाणून घ्या | The Power of Your Subconscious Mind Book Review in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *