नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Stenographer Course Information in Marathi.
सरकारी पदावर नोकरी मिळवण्याचे स्वप्न प्रत्येक व्यक्तीचे असते. जेंव्हा अनेक विद्यार्थी दहावीत असतात, तेव्हापासूनच सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. परंतु अनेक वेळा असे घडते की विध्यार्थी स्वप्न तर पाहतो परंतु कोणती सरकारी नोकरी मिळवायची आणि ती कशी मिळवायची याबद्दल त्याला पुरेशी माहिती मिळत नाही.
सध्याच्या काळात सरकारी नोकरीसाठी कॉम्पिटिशन इतकं वाढलं आहे कि प्रत्येकाला हवी ती सरकारी नोकरी मिळवणे खूप अवघड झाले आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत जे 12वी उत्तीर्ण झाल्यावर आपल्या करिअरचा विचार करू लागतात. मग त्यांना एक प्रश्न पडतो कि असा कोणता कोर्स करावा, कि जो कोर्स केल्यावर चांगली सरकारी नोकरी मिळू शकेल, असाच त्यांचा विचार असतो.
बहुतेक विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कोणता कोर्स करावा या विचारात असतात. तसे तर अनेक कोर्सेस आहेत जे करून तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. परंतु आज या लेखात आपण स्टेनो या कोर्सबद्दल माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला स्टेनोग्राफरची नोकरी मिळवायची असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे.
आजच्या लेखात आम्ही तुम्हाला स्टेनोग्राफर म्हणजे काय? स्टेनोग्राफर होण्यासाठी काय कराव लागेल? आणि स्टेनोग्राफर होण्यासाठी कोणती पात्रता असायला हवी? स्टेनोग्राफर कसे बनायचे? याबद्दल माहिती सांगणार आहोत, त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा. चला तर मग स्टेनोग्राफी या कोर्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
Table of Contents
स्टेनोग्राफी म्हणजे काय । Stenographer Course Information in Marathi
स्टेनोग्राफी म्हणजे जलद आणि संक्षिप्त लेखन. स्टेनोग्राफी हि लघुलेखनाची एक पद्धत आहे ज्यामध्ये सामान्य लेखनापेक्षा अधिक वेगाने लिहिता येते. यामध्ये प्रामुख्याने छोट्या चिन्हांचा वापर केला जातो. लघुलेखनात लिहिण्याच्या या क्रियेलाच स्टेनोग्राफी असे म्हणतात.
माणसाच्या बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या वेगात खूप फरक असतो. साधारणपणे, एक कुशल माणूस ज्या वेगाने हाताने लिहितो, त्याच्या चौपट, पाचपट बोलण्याचा वेग असतो. अशा स्थितीत एखाद्या वक्त्याचे भाषण किंवा संभाषण रेकॉर्ड करण्यात विशेष अडचण येते. ही अडचण सोडवण्यासाठी वेगवान लेखनाचा आविष्कार करण्यात आला त्यालाच आपण स्टेनोग्राफी असे म्हणतो.
स्टेनोग्राफीला मराठीमध्ये लघुलेखन असे म्हणतात आणि इंग्लिश मध्ये स्टेनोग्राफीला शॉर्टहँड असे म्हणतात. स्टेनोग्राफी कोर्समध्ये तुम्हाला कोणतेही संभाषण कमीत कमी शब्दात आणि जलद गतीने वाचायला आणि लिहायला शिकवले जाते.
स्टेनोग्राफर म्हणजे काय । Stenographer in Marathi
स्टेनोग्राफी हि एक कोडिंग लँग्वेज असते ज्याला आपण शॉर्ट हँड असे म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचे तर स्टेनोग्राफी ही अशी भाषा आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कोणतेही पत्र किंवा संभाषण शॉर्ट शब्दात आणि कमी वेळेत जलद गतीने लिहू शकता.
स्टेनोग्राफर म्हणजे अशी व्यक्ती जी दुसर्या व्यक्तीकडून बोलले जाणारे शब्द पटकन लिहून ठेवते, ज्यासाठी तो शॉर्ट हॅन्ड भाषेचा वापर करतो. स्टेनोग्राफी ही भाषा शिकलेली व्यक्ती आणि स्टेनोग्राफी या भाषेचा वापर करून लिखाण करणाऱ्या व्यक्तीला स्टेनोग्राफर असे म्हणतात. स्टेनोग्राफर शॉर्टहँड भाषेचा वापर करतो. जवळपास सर्वच सरकारी क्षेत्रात स्टेनोग्राफरची आवश्यकता असते.
स्टेनोग्राफर होण्यासाठी आवश्यक पात्रता | Eligibility for Stenographer in Marathi
कोणतीही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्याकडे सरकारी नोकरीसाठी लागणारी पात्रता असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना स्टेनोग्राफर होण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे याची माहिती आता पाहुयात.
- स्टेनोग्राफर बनण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याला इयत्ता 12वी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याकडे स्टेनोग्राफी कोर्स पूर्ण केलेले सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
- स्टेनोग्राफरची निवड करण्यासाठी सरकारकडून अधिसूचना जारी केली जाते. जेंव्हा वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये स्टेनोग्राफरच्या जागा निघतात त्यावेळेस त्याबद्दलची जाहिरात दिली जाते. तेंव्हा पात्र विद्यार्थ्यांनी जाहिरातीनुसार अर्ज भरावा आणि परीक्षा उत्तीर्ण करावी.
स्टेनोग्राफर होण्यासाठी वयोमर्यादा किती आहे | Age Limit for Stenographer in Marathi
स्टेनोग्राफर होण्यासाठी वयोमर्यादा देखील आहे. येथे वय 18 ते 30 वर्षे ठेवण्यात आले असून सरकार आरक्षित जातींना स्वतंत्र सूट देत आहे.
स्टेनो कोर्सची फी किती आहे | Fees for Stenographer Course Information in Marathi
जर तुम्हाला कोणत्याही इन्स्टिट्यूट मधून स्टेनोग्राफीचा कोर्स करायचा आहे आणि तुम्हाला त्याची फीस जाणून घ्यायची आहे का? तर मित्रानो स्टेनोग्राफिच्या फीस चा फिक्स आकडा सांगणे अवघड आहे. कारण वेगवेगळ्या इन्स्टिटयूट मध्ये स्टेनोग्राफीची फी कमी जास्त असू शकते.
परंतु अंदाजे सांगायचे झाले तर स्टेनोग्राफीची फीस 5 हजार ते 15 हजार रुपये पर्यंत असू शकते. ती सगळीकडे सारखी असू शकत नाही, ती कमी-अधिक असू शकते. फीस बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही ज्या इन्स्टिटयूट मध्ये हा कोर्स करणार आहात त्या इन्स्टिट्यूटला भेट देऊन चौकशी करावी.
सेनोग्राफरच्या परीक्षेच्या अर्जाची फी किती आहे | Exam Fees for Stenographer Course Information in Marathi
सेनोग्राफरच्या परीक्षेच्या अर्जाच्या फीबद्दल बोलायचे झाले तर ते 100 रुपये इतके असते. हे शुल्क तुम्हाला परीक्षेसाठी अर्ज करताना भरावे लागते. याशिवाय इतर कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.
स्टेनोग्राफर बनण्यासाठी काय करावे How to Became Stenographer in Marathi
ज्या विद्यार्थ्यांना स्टेनोग्राफर बनायचं आहे त्यांना स्टेनोग्राफर बनण्यासाठी काय करावं लागते हे माहित असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात कि स्टेनोग्राफर कसं बनायचं.
- स्टेनोग्राफर होण्यासाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- तुम्हाला कॉम्प्युटरबद्दल बेसिक माहिती असणे गरजेचे आहे. कारण स्टेनोग्राफर या पदावर काम करण्यासाठी तुम्हाला कॉम्पुटर ऑपरेट करता येणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही MSCIT हा कोर्स करू शकता.
- कॉम्पुटरचे बेसिक ज्ञान असणे तर गरजेचे आहेच परंतु त्यासोबतच तुम्हाला टायपिंग येणे सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्लिश टायपिंगचा कोर्स करावा. MSCIT आणि टायपिंगचा कोर्स तुम्ही दहावीनंतर किंवा बारावीचे पेपर झाल्यांनतर सुट्टीत लगेच करून घ्या त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही.
- जेव्हा तुम्ही स्टेनोग्राफर बनण्यासाठी लागणारी पात्रता निकष पूर्ण करता. त्यानंतर तुम्हाला सरकारद्वारे आयोजित स्टेनोग्राफर भरतीसाठी अर्ज करावा लागेल आणि त्या परीक्षेच्या भरतीमध्ये बसून स्टेनोग्राफर होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल.
- स्टेनोग्राफर बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे चांगले ज्ञान आणि दोन्ही भाषांमध्ये टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.
स्टेनोग्राफरच्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे | Syllabus For Stenographer Exam in Marathi
प्रत्येक सरकारी नोकरीसाठी एक अभ्यासक्रम आधीच जाहीर केला जातो आणि त्या अभ्यासक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्न विचारले जातात. स्टेनोग्राफरचा अभ्यासक्रम काय आहे, त्याची माहिती खाली दिली आहे.
- इंग्रजी व्याकरण
- हिंदी व्याकरण
- इंग्रजी एक्टिव एंड पैसिव वॉइस
- डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीच
- फिल इन द ब्लैंक्स
- व्होकॅब्युलरी
- सामान्य ज्ञान
- जनरल अवेअरनेस
- इतिहास
- भूगोल
- संविधान
- चालू घडामोडी
- तर्क क्षमता आणि रिजनिंग प्रश्न
- गणित
- [Stenographer Course Information in Marathi]
स्टेनोग्राफर परीक्षेचा पॅटर्न कसा असतो | Stenographer Exam Pattern
स्टेनोग्राफर पदाच्या भरतीच्या परीक्षेच्या पॅटर्नबद्दल बोलायचे तर, या भरतीची परीक्षा पॅटर्न खालीलप्रमाणे आहे:
- स्टेनोग्राफरसाठी लेखी परीक्षा घेतली जाते.
- या लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि जनरल रिझनिंग संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
- या परीक्षेत सामान्य ज्ञान आणि रिझनिंगचे 50 टक्के प्रश्न विचारले जातात.
- जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश या विषयावर 50 प्रश्न म्हणजे एकूण 200 प्रश्न तुमच्या समोर येतात.
- परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तास मिळतात.
- शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी या परीक्षेचा पेपर पास करण्यासाठी 2 तास 40 मिनिटे देण्यात आली आहेत. [Stenographer Course Information in Marathi]
स्टेनोग्राफरचा पगार किती असतो | Salary of Stenographer in Marathi
स्टेनोग्राफर पदावर काम करताना उमेदवाराला किती पगार मिळतो याबद्दल स्टेनोग्राफरची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला याबद्दल जाणून घ्यायचे असते. चला तर मग जाणून घेऊयात स्टेनोग्राफरला किती पगार असतो.
- स्टेनोग्राफरच्या सी ग्रेड भरतीतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना मूळ वेतन दरमहा ₹ 9300 ते ₹ 38800 पर्यंत मिळते आणि याशिवाय अनेक प्रकारचे सरकारी भत्ते देखील दिले जातात.
- स्टेनोग्राफरच्या डी ग्रेड भरतीतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना मूळ वेतन दरमहा ₹ 5200 ते ₹ 20200 पर्यंतचे मूळ वेतन दिले जाते आणि त्याशिवाय अनेक प्रकारचे सरकारी भत्ते दिले जातात.
निष्कर्ष [Stenographer Course Information in Marathi]
देशातील प्रत्येक सरकारी नोकरीसाठी विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा आहेत. सरकारी नोकरी शोधणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरी मिळाल्यावर खूप अभिमान वाटतो. देशात स्टेनोग्राफर पदासाठी निश्चितपणे भरती आयोजित केली जाते. रिक्त पदांच्या आधारे अनेकदा विविध भरती आयोजित केली जाते.
तर या लेखात आपण स्टेनोग्राफी म्हणजे काय, स्टेनोग्राफर म्हणजे काय, स्टेनोग्राफर बनण्यासाठी काय करावे लागते अशी सर्व माहिती घेतली. मला आशा आहे कि हि माहिती तुम्हाला आवडली असेल. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. [Stenographer Course Information in Marathi]