नमस्कार मित्रांनो, इंस्टामराठी या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत Rich Dad Poor Dad Book Review in Marathi
मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad) हे पुस्तक एक अस पुस्तक मानल जात जे जगातील प्रत्येक व्यक्तीने वाचल पाहिजे.
ज्याला नऊ ते पाच या नोकरीच्या चक्रातून बाहेर पडायचे आहे, ज्यांना खरोखर श्रीमंत बनायचे आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. इथं मी मुद्दाम खरे श्रीमंत असे म्हणतोय कारण आपल्या आजूबाजूला असे अनेक श्रीमंत लोक असतात जे दिसायला खूप श्रीमंत असतात पण आतून पूर्णपणे पोकळ असतात आणि या सर्व गोष्टींवरून तुम्हाला हे समजेल की अशा पोकळ श्रीमंत लोकांच्या तुलनेत प्रत्यक्षात तुम्ही किती चांगले आहात.
रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाने अनेक यशस्वी उद्योजक आणि अनेक यशस्वी मोटिवेशनल स्पीकर्स यांचं जीवन बदलून टाकलं आहे. त्यामुळेच तर अशी यशस्वी लोकं हे पुस्तक वाचण्याची शिफारस करतात.
चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकात श्रीमंत होण्याचे कोणते रहस्य दडले आहे ज्यामुळे हे पुस्तक खूप खास आहे.
शाळेत मुलांना फक्त जगात कोणत्या अडचणी आहेत हे शिकविलं जात. शाळेत मुलांना पैशांबद्दलच ज्ञान किंवा आर्थिक साक्षरता कधीच शिकविली जात नाही. शाळेत फक्त प्रोफेशनल स्किल्स शिकवले जातात फायनान्शिअल स्किल्स शिकविले जात नाहीत. त्यामुळेच तर श्रीमंत लोक श्रीमंत होत चालले आहेत तर गरीब आणखी गरीबच होत आहेत. खरं तर अनेकजण आर्थिक ज्ञान आपल्या पालकांकडूनच शिकतात.
मित्रांनो, जेव्हा रॉबर्ट नऊ वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या शाळेतील काही श्रीमंत मुले त्यांच्या एका श्रीमंत मित्रासोबत वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी बीच हाऊसवर जात होती, परंतु त्यांनी रॉबर्टला आमंत्रित केले नाही कारण रॉबर्ट गरीब होता.
रॉबर्टला खूप वाईट वाटले आणि तो त्याच्या घरी गेला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही मला श्रीमंत कसे व्हावे ते सांगू शकाल का? पण त्याच्या वडिलांकडे याचं उत्तर नव्हतं.
थोडा वेळ विचार केल्यावर ते म्हणाले, हे बघ बेटा, जर तुला श्रीमंत व्हायचे असेल तर तुला पैसे कमवायला शिकावे लागेल आणि त्यासाठी तू तुझ्या मेंदूचा वापर कर. हे ऐकल्यानंतर रॉबर्टला समजले की श्रीमंत कसे व्हायचे याचे उत्तर त्याच्याकडे नाही.
दुसर्या दिवशी, रॉबर्ट आणि त्याचा खास मित्र माईक यांना एक पैसे कमविण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी काही जुन्या झिंक ट्यूब गोळा करण्यास सुरुवात केली आणि नंतर त्या वितळवून त्यांनी बनावट नाणी बनवण्यास सुरुवात केली.
पण यावर रॉबर्टच्या वडिलांनी त्याला सांगितले की बघ बेटा असे करणे बेकायदेशीर आहे. जर तुला खरोखर पैसे कसे कमवायचे हे शिकायचे असेल तर तु माईकच्या वडिलांना हा प्रश्न विचार. आणि इथेच माईकचे वडील रॉबर्टच्या आयुष्यात प्रवेश करतात, ज्यांना तो दुसरा पिता मानतो आणि त्यांना तो रिच डॅड म्हणजेच श्रीमंत वडिल असे म्हणतो.
आणि मग तो त्याच्या श्रीमंत वडिलांकडे जातो आणि तोच प्रश्न विचारतो, श्रीमंत कसे व्हायचे ते सांगू शकाल का? आणि इथून रॉबर्टच्या आर्थिक शिक्षणाची एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू होते.
त्याचे श्रीमंत बाबा त्याला जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर श्रीमंत कसे व्हायचे आणि कायमचे श्रीमंत कसे राहायचे याचे काही महत्त्वाचे धडे शिकवतात. जसे पैसे कसे व्यवस्थापित केले जातात. पैशातून पैसे कसे कमवायचे? आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्यांमुळे गरीब नेहमीच गरीब राहतात आणि त्याचवेळी गरीब माणसाला श्रीमंत व्हायचे असेल तर काय केले पाहिजे हे ते सांगतात.
लेखकाचे श्रीमंत वडील विचार करायचे कि सर्व अडचणी या पैश्याच्या कमतरतेमुळे येतात. तर त्याउलट त्यांचे गरीब वडील विचार करायचे कि सर्व अडचणीचं मूळ पैसा आहे. श्रीमंत वडिलांचं असं म्हणणं होतं कि आपण रिस्क घ्यायला पाहिजे. रिस्कला न घाबरता कसं मॅनेज करता येईल हे शिकायला पाहिजे. म्हणूनच म्हणतात ना,
“रिस्क है तो इष्क है.”
लेखक स्वतःला खूप नशीबवान समजतात कि त्यांना दोन वडील मिळाले. या पुस्तकात लेखकाने आर्थिक साक्षरतेवर भर दिला आहे. त्यांनी आसेट्स आणि लायबिलिटीज म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आहे. यात त्यांनी सांगितलं आहे कि कशा प्रकारे श्रीमंत असेट्स बनवतात आणि गरीब लायबिलिटीज बनवतात.
या पुस्तकात लेखकांनी आर्थिक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. आता फायनान्स, अकाउंटिंग म्हटलं कि बोअर होतच पण रॉबर्ट कियोसाकी म्हणतात कि आयुष्यात हेच ज्ञान खूप महत्वाचं आहे.लेखक त्यांच्या आयुष्यात जी आर्थिक स्थिरता आहे त्याचे श्रेय त्यांच्या श्रीमंत वडिलांना देतात.
या पुस्तकातील महत्वाचा पॉईंट हा आहे कि आपल्यातील बरेच जण फायनान्सियल एजुकेशन त्या लोकांकडून शिकतात ज्यांना स्वतःलाच त्याच ज्ञान नसतं. आणि अशा लोकांकडे स्वतःकडेच पैसा नसतो हे आपण अनेक वेळा पाहतो.
आपण हेसुद्धा पाहतो ज्यांच्याकडे पैसे नसतात असे गरीब लोकच जास्त आर्थिक सल्ले देत असतात. तेसुद्धा अशा पद्धतीनं सांगतात कि जस काय त्यांना सर्व काही माहित आहे. आता इथं मेन पॉईंट हा आहे जर तुम्ही अशा माणसांचे सल्ले घेत आहात जो वर्षाला 3-4 लाख रुपयेच कमवतो तर त्याच्या सल्ल्याची किंमत पण तेवढीच राहते.
जर तुम्ही अशा माणसाचा सल्ला घेताय जो वर्षाला एक कोटी रुपये कमवतो तर त्याचा सल्ला देखील तेवढाच मूल्यवान असेल. या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत कि श्रीमंत आणि गरीब माणसाच्या विचारात कसा फरक असतो.
आता या पुस्तकातील काही महत्वाचे मुद्दे आपण पाहुयात
हे नक्की वाचा:
पैसे कमावण्याचे हे नियम लवकर शिकून घ्या
जे पाहिजे ते मिळेल, फक्त तुमच्या सबकॉन्शिअस मनाची शक्ती जाणून घ्या
या पुस्तकातील पहिला महत्वाचा मुद्दा: [Rich Dad Poor Dad Book Review in Marathi]
श्रीमंत माणसं असेट्स (Assets) निर्माण करतात आणि गरीब माणसं लायबिलिटीज (Liabilities) निर्माण करतात.
आता साध्या भाषेत सांगायचे झाले तर आसेट्स (Assets) म्हणजे अशा गोष्टी ज्या तुमच्या खिश्यात पैसा आणतात आणि लायबिलिटीज (Liabilities) म्हणजे अशा गोष्टी ज्या तुमच्या खिशातून पैसे घेऊन जातात, तुमचा खर्च वाढवतात. आता आपण याचं एक एक उदाहरण पाहुयात,
1.एक माणूस एक घर विकत घेतो आणि भाड्याने देतो. दर महिन्याला भाड्याच्या स्वरूपात त्याला पैसे मिळतात हे झालं असेट्स (Assets).
2.एक माणूस स्वतःसाठी नवी कार विकत घेतो तर इथे त्याला दर महिन्याला पैसे तर मिळत नाहीत उलट त्यालाच कारच्या मेन्टेनन्ससाठी आणि इंधनासाठी खर्च करावा लागतो. हे झालं लायबिलिटीजचं उदाहरण.
आता इथं मी तुम्हाला असं म्हणत नाही कि तुम्ही तुमचे सगळे खर्च कमी करा किंवा लायबिलिटीज बंद करा. पण त्याचबरोबर जास्तीत जास्त असेट्स निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आता तर या डिजिटल जमान्यात असेट्स निर्माण करणे खूपच सोपे झाले आहे.
तुम्ही एखादा ब्लॉग सुरु करू शकता, एखादा ऍप बनवा, एखाद ईबुक तयार करून विका, तुम्हाला एखादं चांगलं स्किल येत असेल तर ते ऑनलाईन शिकवा, किंवा एखादं युट्युब चॅनेल सुरु करा तेसुद्धा एक असेटचं (Assets) आहे. जेवढे असेट्स तुम्ही तुमच्या आयुष्यात बनवाल तेवढे तुम्ही श्रीमंत बनत जाल.
या पुस्तकातील दुसरा महत्वाचा मुद्दा: [Rich Dad Poor Dad Book Review in Marathi]
श्रीमंत लोकं पैश्यासाठी काम करत नसतात तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो.
मित्रांनो जगातील बहुतेक लोक चांगला अभ्यास करतात, मोठ्या पदव्या मिळवतात आणि मग नोकरी लागल्यावर लग्न करतात आणि मग छान घर आणि गाडी घेतात. मग त्या नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून घर आणि गाडीचे कर्ज फेडण्यात आयुष्य घालवतात.
त्या लोकांना हे देखील कळत नाही की ते सर्वात जास्त मेहनत करतात, पण त्यांच्या मेहनतीचा खरा फायदा दुसऱ्याला होतो. अनेकांना यातून बाहेर पडायचे असते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
त्यांच्या जबाबदाऱ्या, समाजातील आदर, भीती आणि इतर अनेक कारणांमुळे ते ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करत राहतात आणि त्यामुळेच त्यांना आयुष्यभर पैशासाठी काम करावे लागते. पण श्रीमंत लोक कधीही पैशासाठी काम करत नाहीत. त्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करतात
जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आधी तुम्हाला पैशाची पॉवर कशी वापरायची हे शिकायला पाहिजे. गरीब लोकं सदैव पैश्यासाठी काम करत असतात. असे लोक तोपर्यंतच पैसे कमाऊ शकतात जोपर्यंत ते कष्ट करतात.
जेंव्हा ते काम करणं बंद करतात तेंव्हा पैसे कमावणे सुद्धा बंद होतं. श्रीमंत लोकांना एक गोष्ट माहित आहे ती म्हणजे पैश्यांचा वापर करून आणखी पैसे कसे कमवायचे. अनेकजण आपले पैसे सेविंग करून ठेवतात कारण त्यांना ते सेफ वाटतं.
तुम्ही जर तुमचे पैसे इन्व्हेस्ट केले नाहीत तर तुमचे पैसे वाढणार कसे? तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी आणखी कष्ट करावे लागतील. श्रीमंत लोकं त्याच पैश्याना इन्व्हेस्ट करतात बिझनेसमध्ये, शेअर मार्केटमध्ये आणि त्यांचा पैसा वाढतच जातो. आता यासाठी तुमच्याकडे कोट्यवधी रुपये असणे आवश्यक नाही तुम्ही थोड्या पैश्यातही गुंतवणूक करू शकता.
या पुस्तकातील तिसरा महत्वाचा मुद्दा: [Rich Dad Poor Dad Book Review in Marathi]
पैसे कमावण्यासाठी काम करू नका तर शिकण्यासाठी काम करा.
जेवढे जास्त स्किल्स तुम्हाला शिकता येतील तेवढे तुम्ही शिका. जेवढे जास्त स्किल्स आणि ज्ञान तुमच्याकडे असेल तेवढा जास्त पैसा तुम्ही कमाऊ शकता. इथं महत्वाची गोष्ट हि आहे कि, ते स्किल्स आणि ज्ञान हे प्रॅक्टिकल असावेत फक्त पुस्तकी ज्ञान असून फायदा नाही. म्हणून तर या पुस्तकात लेखक आपल्या हेच सांगतो कि पैसे कमावण्यासाठी काम करू नका तर शिकण्यासाठी काम करा.
या पुस्तकात अजून भरपूर शिकण्यासारखं आहे त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. मित्रानो आर्थिक साक्षरता हि सध्याची गरज आहे. त्यामुळे हे पुस्तक विकत घ्यायला अजिबात संकोच करू नका. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल. [Rich Dad Poor Dad Book Review in Marathi]
तर मित्रांनो, आजच्या आमच्या या लेखात मध्ये, इतकंच होतं, तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
Pingback: तुमचे विचार तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात | Think and Grow Rich Book Review in Marathi
Pingback: यशस्वी लोकांच्या या सात सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील | The 7 Habits of Highly Effective People Book Review in Marathi
Pingback: जे पाहिजे ते मिळेल, फक्त सबकॉन्शिअस मनाची शक्ती जाणून घ्या | The Power of Your Subconscious Mind Book Review in Marathi