नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणं आहोत PF balance check in Marathi.
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड (EPF) असोसिएशनने तुमची PF शिल्लक ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर घरी बसून तुमच्या पीएफ, पीएफ पासबुकमध्ये किती रक्कम जमा केली आहे ते ऑनलाइन तपासू शकता.
युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे तुम्ही PF शी संबंधित सर्व काम ऑनलाइन करू शकता. पण तुमच्याकडे UAN नसेल किंवा तो विसरला असेल आणि तुम्हाला PF मध्ये किती रक्कम जमा झाली हे तपासायचे असेल तर काय करायचे?
या परिस्थितीत, तुम्ही EPFO वेबसाइटवरून किंवा उमंग अॅपवरून तुमची पीएफची रक्कम पाहू शकत नाही. या लेखात, आपण UAN शिवाय पीएफची रक्कम कशी तपासू शकता हे जाणून घेऊ.
UAN नंबरशिवाय पीएफ बॅलन्स कसे चेक करायचे याबद्दल या लेखात दिलेली सर्व माहिती सोप्या शब्दात स्पष्ट केली आहे. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
UAN नंबर शिवाय PF ची रक्कम तपासण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी | PF Balance Check in Marathi
- तुमचा मोबाईल नंबर पीएफ खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे.
- मोबाइल सिम कार्ड रिचार्ज करणे आवश्यक आहे जेणेकरुन तुम्ही एसएमएस प्राप्त करू शकता किंवा मिस्ड कॉल देऊ शकता.
- UAN क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे.
- तुमच्या पीएफ खात्यात केवायसी असणे आवश्यक आहे. आधार, पॅन किंवा बँक खाते क्रमांक केवायसीमध्ये जोडलेले असावेत.
UAN नंबर शिवाय पीएफ मध्ये शिल्लक रक्कम तपासण्याचे मार्ग | PF Balance Check in Marathi
UAN क्रमांकाशिवाय, तुम्ही खालील प्रकारे तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता.
- मिस कॉल देऊन
- एसएमएस पाठवून
पद्धत 1 – मिस्ड कॉल देऊन पीएफची रक्कम कशी जाणून घ्यावी । PF balance check without UAN number by Missed Call in Marathi.
मिस्ड कॉल देऊन पीएफची रक्कम पाहण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर UAN नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.
तुमचा मोबाईल नंबर UAN शी कसा लिंक करायचा हे जाणून घ्या?
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरमध्ये फोन डायलर उघडा.
- आता खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा. कॉल करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये बॅलेन्स असल्याची खात्री करा.
- मिस्ड कॉलद्वारे PF ची रक्कम चेक करण्यासाठी पुढील नंबर वर मिस कॉल करा – 01122901406
- दोन रिंग वाजल्यानंतर कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल.
- आता काही वेळानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे पीएफची शिल्लक रक्कम किती आहे हे कळेल.
हे नक्की वाचा:
केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजनांची यादी
पद्धत 2 – एसएमएस पाठवून पीएफमध्ये असणारी शिल्लक रक्कम कशी जाणून घ्यावी । balance check without UAN number by SMS in Marathi.
- तुमच्या फोनवर SMS app उघडा.
- New Message वर जा आणि खाली दिलेल्या नंबरवर एसएमएस पाठवा.
- एसएमएसद्वारे PF ची रक्कम चेक करण्यासाठी पुढील नंबर वर एसएमएस पाठवा
- Send EPFOHO UANENG to 7738299899
- मेसेज पाठवल्यानंतर काही वेळाने तुम्हाला एक रिप्लाय एसएमएस येईल, ज्यामध्ये पीएफमध्ये असणारी शिल्लक रक्कम सांगितली जाईल.
अशाप्रकारे, तुम्ही UAN नंबरशिवाय तुमच्या फोनवरून PF बॅलन्स जाणून घेऊ शकता.
UAN नंबर असेल तर PF कसा चेक करायचा । PF balance check with UAN number in Marathi
तुमच्या कडे UAN नंबर असेल तर तुम्ही वरती दिलेल्या दोन पद्धतींचा वापर करून PF चेक करू शकता किंवा खाली दिलेल्या दोन पद्धतींचा वापर करूनही PF चेक करू शकता.
- EPFO च्या पोर्टलवरती जाऊन
- EPFO चे उमंग ऍप्प वापरून
पद्धत 3 – EPFO च्या पोर्टल वर जाऊन PF कसे चेक करायचे | PF Balance Check in Marathi
- जर तुमच्या कडे UAN नंबर आणि पासवर्ड असेल तर तुम्ही डायरेक्ट EPFO च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुमची PF ची शिल्लक रक्कम तपासू शकता.
- त्यासाठी www.epfindia.gov.in या वेबसाईट वर जा.
- वेबसाईट वर गेल्यावर, त्यानंतर पासबुक या ऑप्शन वर क्लिक करून UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
- त्यानंतर पासबुक या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमचा EPF पासबुक चेक करू शकता.
पद्धत 4 – EPFO चे अँड्रॉइड ऍप्प UMANG App वापरून PF कसे चेक करायचे | PF Balance Check in Marathi
- EPFO चे अँड्रॉइड ऍप्प UMANG App वापरून हि तुम्ही तुमचा EPF बॅलेन्स चेक करू शकता.
- त्यासाठी मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मधून UMANG हे अँड्रॉइड ऍप्प डाउनलोड करा.
- UMANG ऍप्प मध्ये UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि तुमचा PF बॅलेन्स चेक करा.