Mudra Loan Information in Marathi

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंत कर्ज मिळेल | Mudra Loan Information in Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Mudra Loan Information in Marathi. 

भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) एप्रिल 2015 मध्ये सुरू केली होती. छोट्या व्यावसायिकांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आधीच सुरू केलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बँकांकडून रु.50000/- ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणे हा प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा उद्देश आहे.

सरकारने छोट्या व्यावसायिकांना बँकेकडून सुलभ अटींवर कर्ज देण्याची व्यवस्था प्रधानमंत्री मुद्रा लोन या योजने अंतर्गत केली आहे.

या लेखात आपण मुद्रा लोनशी संबंधित सर्व मुद्द्यांबद्दल पाहणार आहोत, जसे की मुद्रा लोन म्हणजे काय?, त्यासाठी पात्रता काय आहे?, तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?, तुम्हाला मुद्रा लोनची जास्तीत जास्त रक्कम कशी मिळू शकते? आणि महिलांनाही मुद्रा लोन मिळू शकते का? इत्यादी.

मुद्रा लोनशी संबंधित सविस्तर माहितीसाठी कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Table of Contents

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2023 MUDRA Loan Information in Marathi

मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (MUDRA) कर्ज योजना हा केंद्र सरकारचा एक मोठ्या प्रमाणावर उपक्रम आहे, ज्याद्वारे वैयक्तिक (individual), एसएमई (small-to-medium enterprise) आणि एमएसएमई (micro small & medium enterprises) यांना कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना तीन भागामध्ये विभागली गेली आहे. ते तीन भाग खालीलप्रमाणे आहेत.

 1. शिशू (50000 पर्यंत सुरू)
 2. किशोर (50001 – 5 लाख)
 3. तरुण (500001 ते 10 लाख)

कर्जाची रक्कम किमान 50000 रुपये ते कमाल 10 लाख रुपये इतकी दिली जाऊ शकते. या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाची विशेष बाब म्हणजे अर्जदाराला कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा (सिक्योरिटी) देण्याची गरज नाही.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना थोडक्यात (PMMY) 2023 | MUDRA Loan Information in Marathi

योजनेचे नावप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
यांच्याव्दारे सुरुवातकेंद्र सरकार
योजनेची सुरुवात8 एप्रिल 2015 लाँच केले गेले
योजनेअंतर्गत किती कर्ज दिले जाते₹50000 ते ₹1000000/-
अधिकृत वेबसाइटhttps://www.mudra.org.in/
टोल फ्री क्रमांक (National)1800 180 11 11 / 1800 11 0001
टोल फ्री क्रमांक (Maharashtra)18001022636
मुद्रा लोन अर्ज / Application Formप्रधान मंत्री मुद्रा लोन अर्जाचा फॉर्म
  सरकारी योजना लिस्टMudra Loan Information in Marathi

MUDRA चा फुल फॉर्म काय आहे? | Full Form of MUDRA in Marathi

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेतील MUDRA या शब्दाचा फुल फॉर्म Micro Units Development Refinance Agency किंवा मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी असा आहे. यालाच सामान्य भाषेत प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) असे म्हणतात.

  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

छोट्या व्यापाऱ्यांनी त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करावा यासाठी किंवा त्यांना त्यांचा जुना व्यवसाय वाढवण्यास मदत व्हावी यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने  प्रधानमंत्री मुद्रा लोन ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकांकडून सुलभ अटींवर दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे प्रमुख मुद्दे । Key points of Pradhan Mantri Mudra Yojana in Marathi

 • पात्रता: सर्व महिला आणि पुरुष जे प्रौढ आहेत म्हणजेच ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत. याशिवाय तुम्ही कोणत्याही बँकेचे डिफॉल्टर (Defaulter) नसावे.
 • क्रेडिट स्कोअर: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेमध्ये अर्जदाराला CIBIL/CRIF किंवा EQUIFAX इत्यादींमध्ये क्रेडिट स्कोअरचा अहवाल प्राप्त करणे अनिवार्य आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर योग्य नसेल, तर बँक तुम्हाला कर्ज देण्यास नकार देऊ शकते.
 • कर्जाचे स्वरूप: रधानमंत्री मुद्रा लोन योजनेमध्ये कर्जाची रक्कम वार्षिक नूतनीकरण आधारावर मंजूर केली जाते. या कर्जाची रक्कम मुदत कर्ज (Term Loan) आणि रोख क्रेडिट (Cash Credit) स्वरूपात अर्जदाराला दिली जाते.
 • कर्जाचा उद्देश: जे व्यावसायिक असंघटित क्षेत्रातील आहेत किंवा बिगर कृषी क्षेत्रातील (जे शेतीशी संबंधित नाहीत) आहेत अशा छोट्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि रोजगाराचा विस्तार करणे. यासाठी बँकेकडून सुलभ अटींवर कर्ज देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

मुद्रा कर्जाचे प्रकार | Types of MUDRA Loan Information in Marathi

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज किती प्रकारे दिले जाऊ शकते हे पाहुयात. मुद्रा कर्ज मुख्यत्वे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे शिशू, किशोर आणि तरुण.

या तीन श्रेणी सरकारने सर्व वर्गातील व्यावसायिकांना डोळ्यासमोर ठेऊन बनवल्या आहेत. या तीन श्रेणीपैकी सर्वाधिक शिशू श्रेणीचे कर्ज छोट्या व्यावसायिकांना दिले जाते.

SR NOकर्जाचा प्रकाररक्कमयोगदान
1शिशुरुपये 50000/- पर्यंतशून्य
2किशोररुपये 50,001 /- ते 5,00,000/- पर्यंत25%
3तरुणरुपये 5,00,001 से 10,00,000/- पर्यंत25%

मुद्रा लोनसाठी पात्रता | Mudra Loan Eligibility in Marathi

प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात खूप लोकप्रिय आहे. मुद्रा कर्ज सर्व प्रकारच्या छोट्या व्यावसायिकांना दिले जाते. तुम्ही कोणताही छोटा, मध्यम किंवा मोठा व्यवसाय करत असाल तर तुम्ही प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहात.

जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा तुमचा आधीचा जुना व्यवसाय वाढवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही या योजनेद्वारे सहज कर्ज घेऊ शकता. जर तुम्ही लहान व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला शिशु योजनेअंतर्गत कर्ज दिले जाईल. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.

प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. तुमचे आधार कार्ड आणि इतर ओळखीचा पुरावा सोबत ठेवा. तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती देखील विचारली जाऊ शकते. तुमचा CIBIL स्कोर देखील चेक केला जाईल. CIBIL स्कोर योग्य असल्यास मुद्रा कर्ज सहज उपलब्ध होईल.

ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडून फक्त आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र मागितले जाईल. यासोबतच, तुम्हाला दोन जामीनदार आणि तुमच्या व्यवसायाचा तपशील बँकेला द्यावा लागेल. बँक शिशू योजनेअंतर्गत 50000/- चे कर्ज सहज उपलब्ध करून देईल.

कर्जाची रक्कम तुम्हाला रोख स्वरूपात दिली जाणार नाही. तुम्ही तुम्ही एखाद्या दुकानदाराकडून तुमच्या किरकोळ दुकानासाठी माल खरेदी करत असाल तर  त्या दुकानदाराच्या खात्यात कर्जाची रक्कम थेट वितरित केली जाईल.

  प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना । PMGAY Yojana in Marathi | Pradhanmantri Awas Yojna in Marathi

Mudra Loan Information in Marathi:

 • कोणताही भारतीय नागरिक मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतो.
 • अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा. जर अर्जदाराने इतर कोणत्याही बँकेकडून दुसरे कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर जमा केले नसेल. अशा परिस्थितीत त्याचा CIBIL किंवा CRIEF स्कोअर कमी होईल आणि बँका तुम्हाला कर्ज देण्यास नकार देतील.
 • कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही ते पैसे कुठे गुंतवाल किंवा कोणता व्यवसाय सुरू करणार आहात. हे तुम्हाला बँकेला लेखी कळवावे लागेल.
 • अर्जदाराकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
 • अधिक माहितीसाठी, तुम्ही PMMY च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

मुद्रा लोनचा व्याजदर किती आहे?

प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्जाचे व्याज दर वेळोवेळी बदलत असतात. बँकेनुसार ते वेगवेगळे असू शकतात. सध्या, जर आपल्याला काही प्रमुख बँकांबद्दल बघायचे झाले तर ते सुमारे 8.15% पासून सुरू होते. मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेनुसार ते बदलू शकते.

मुद्रा लोनसाठी अर्ज कसा भरायचा?

मुद्रा लोनसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जा. तुम्ही तिथल्या अधिकाऱ्याशी (फील्ड ऑफिसर) संपर्क साधू शकता. जर तो सहमत असेल तर सर्वप्रथम तो तुम्हाला सिबिल रिपोर्टसाठी अर्ज देईल. तुम्ही ते भरा आणि त्यांना परत करा.

जर तुमचा CIBIL अहवाल बरोबर असेल (सुमारे 700 गुण), तर तुम्हाला एक अर्ज दिला जाईल. ते काळजीपूर्वक भरावे लागेल. अर्जामध्ये, तुम्हाला त्यावर विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल, प्रामुख्याने तुमच्या व्यवसायाशी संबंधित माहिती, कुटुंबातील सदस्यांची माहिती इ. याशिवाय आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांसह फोटो इत्यादी तुमच्याकडून मागण्यात येईल.

महिलांसाठी मुद्रा कर्ज

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत, देशातील महिला त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा कर्जासाठी ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज करू शकतात. PMMY योजना महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काम करते. या योजनेंतर्गत महिलांना बँका, NBFC आणि मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त दहा लाख रुपये दिले जाऊ शकतात.

जर कोणत्याही महिलेला स्वतःचा कोणताही वयक्तिक व्यवसाय करायचा असेल तर ती मुद्रा कर्ज घेण्यास पात्र आहे, ती या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचे बँक कर्ज घेऊ शकते. यासाठी ती महिला जवळपासच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तेथील व्यवस्थापक किंवा कर्ज अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकते. [Mudra Loan Information in Marathi]

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना हेल्पलाइन क्रमांक | Pradhan Mantri Mudra Loan Yojana Helpline Number

टोल फ्री क्रमांक (National)1800 180 11 11 / 1800 11 0001
टोल फ्री क्रमांक (Maharashtra)18001022636

FAQ: [Mudra Loan Information in Marathi]

मुद्रा योजना PMMY म्हणजे काय?

मुद्रा योजना ही कर्ज-संबंधित योजना आहे, ज्याद्वारे 50000/- ते 1000000/- पर्यंतचे कर्ज लहान व्यावसायिकांना सुलभ अटींवर उपलब्ध करून दिले जाते.

मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे, मला मुद्रा कर्ज कसे मिळेल?

जर तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल, तर सुरुवातीस तुम्ही छोट्या प्रमाणावर सुरुवात करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेशी संपर्क साधू शकता. सुरुवातीला तुम्ही कमी कर्जासाठी अर्ज करता. तुम्ही ते वेळेवर जमा केल्यास, बँक तुमची कर्ज मर्यादा वेळोवेळी वाढवत राहील.

मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मंजुरीसाठी किती वेळ लागतो?

पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत, तुमचे बँक कर्ज 7 ते 10 दिवसांत मंजूर केले जाऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *