नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत MSW Course Information in Marathi.
जर तुम्हालाही समाजसेवा करायची इच्छा असेल किंवा समाजसेवा करायची असेल तर MSW हा कोर्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या कोर्सचा अभ्यास करताना तुम्हाला समाजात सुधारणा करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती दिली जाते.
MSW या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्याला समाज कल्याण कार्य, समाजातील वाईट गोष्टी कशा दूर कराव्यात, समाजात तंत्रज्ञानाचा प्रसार कसा करावा, जागरूकता कशी वाढवावी याबद्दल शिकवले जाते.
या लेखात आपण MSW कोर्स म्हणजे काय, MSW कोर्स कसा करायचा, MSW कोर्ससाठी पात्रता काय असावी, या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाहि हा कोर्स करायचा असेल आणि या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Table of Contents
MSW कोर्स म्हणजे काय? । What is MSW Course in Marathi
MSW चा फुल फॉर्म मास्टर इन सोशल वर्क (Master in Social Work) असा आहे. हा कोर्स एक प्रकारची पोस्ट ग्रेजुएट डिग्री आहे, या कोर्सचा कालावधी 2 वर्षांचा आहे, तुम्ही हा कोर्स रेगुलर किंवा डिस्टेंस अशा दोन्ही पद्धतीने करू शकता.
हा कोर्स मास्टर डिग्री अर्थात पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. या कोर्समध्ये समाजकल्याण, समाजशास्त्र, समाजकार्य, इतर सामाजिक विषय असे विषय शिकवले जातात. समाजातील नवनवीन समस्यांवर उपाय योजना करणे, समाजातील वाईट गोष्टी दूर करणे, समाजात तंत्रज्ञान विकसित करणे, समाजाला चांगल्या मार्गावर चालवण्यासाठी उपाय योजना करणे, अशा गोष्टी MSW मध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात.
समाजाला कोणत्या गोष्टींची गरज आहे, समाजाला काय पाहिजे आहे, उपेक्षित आणि मागासवर्गीय वर्गाला पुढे कसे न्यायचे, विविध प्रकारच्या संकटांतून जनतेला कसे बाहेर काढायचे, त्यातून सुटका कशी करायची, लोकांना मदत करून त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे या गोष्टी MSW या कोर्समध्ये विध्यार्थ्यांना शिकवल्या जातात.
मास्टर इन सोशल वर्कमध्ये विद्यार्थ्याला समाजातील नवनवीन समस्या ओळखता आल्या पाहिजेत, त्या कशा सोडवता येतील हे शोधता आले पाहिजे आणि समाजातील गरिबीचे लेबल मोजता आले पाहिजे आणि सरकारने दिलेल्या योजना समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत. एमएसडब्ल्यूमध्ये विद्यार्थ्यांना समाजाच्या उणिवांची गणना कशी करायची आणि सरकारला डेटा कसा द्यायचा हे शिकवले जाते.
अनेकांना MSW कोर्स करून समाजसेवा करायची असते, पण त्यांना त्याबद्दल माहिती नसते, म्हणून आज या लेखात आम्ही तुम्हाला MSW कोर्सशी संबंधित संपूर्ण माहिती देणार आहोत.
MSW कोर्स करण्यासाठी पात्रता काय लागते | Eligibility for MSW Course in Marathi
आता MSW कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी हा प्रश्न आहे, कोणताही कोर्स करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक असते, चला तर मग जाणून घेऊया MSW कोर्स करण्यासाठी पात्रता काय लागते.
- MSW कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण करावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन (ह्युमॅनिटीज, सोशल सायन्स, सायन्स आणि मॅनेजमेंटमधून किंवा कोणत्याही शाखेतून) पूर्ण करावे लागेल.
- BSW कोर्स केल्यानंतरही तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये MSW कोर्स करू शकता.
- MSW कोर्स करण्यासाठी डिग्रीच्या कोर्समध्ये किमान 55% गुण असावेत, पण अशी अनेक महाविद्यालये आहेत ज्यात तुम्हाला थोडी सूट दिली जाते, त्या महाविद्यालयांमध्ये तुम्ही 45% गुणांवरही प्रवेश घेऊ शकता.
MSW कोर्स करण्यासाठी फी किती आहे? Fees for MSW Course in Marathi
MSW या कोर्सची फी किती आहे, या प्रश्नाचे उत्तर ठरविकपणे देता येणार नाही, कारण प्रत्येक कॉलेजची फी वेगवेगळी असते, अनेक कॉलेजची फी कमी जास्त होत असते.
पण इथे मी एक अंदाजित फी सांगतो, खाजगी कॉलेजमध्ये एमएसडब्ल्यू कोर्सची सरासरी फी 40000 पासून ते 150000 रुपये पर्यंत असू शकते. हा आकडा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळा असू शकतो. सरकारी कॉलेजमध्ये एमएसडब्ल्यू कोर्सची सरासरी फी 10000 पासून ते 20000 रुपये पर्यंत असू शकते.
यावरून तुम्हाला कल्पना येऊ शकते कि, एमएसडब्ल्यू कोर्ससाठी सरासरी फी किती असेल, ती यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकते, कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विध्यार्थ्यानी त्या कॉलेजमध्ये फी बद्दल चौकशी करावी.
MSW कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया काय आहे? | Admission Process for MSW Course
एमएसडब्ल्यू कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. हा कोर्स करण्यासाठी, तुम्हाला खूप कमी महाविद्यालये सापडतील ज्यात तुम्ही मेरिट बेस/थेट प्रवेश घेऊ शकता.
जर तुम्हाला कोणत्याही इन्स्टिट्यूटमधून MSW कोर्स करायचा असेल तर अशा वेळी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया असतात. ज्या अंतर्गत काही इन्स्टिट्यूटमध्ये विशेषत: MSW अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि काही इन्स्टिट्यूटमध्ये पदवीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याच्या आधारे प्रवेश दिला जातो.
अशा परिस्थितीत, तुम्हाला ज्या विशिष्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या इन्स्टिट्यूटच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळवावी लागेल.
MSW कोर्सच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे? । Syllabus For Entrance Exam of MSW Course
एमएसडब्ल्यू कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी, प्रवेश परीक्षेत सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज), तर्क (रिजनिंग), सामाजिक कार्य आणि मौखिक क्षमता (सोशल वर्क और वर्बल एबिलिटी) या विषयांवर प्रश्न विचारले जातात.
यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. या परीक्षेची वेळ कॉलेजवर अवलंबून असते, ते तुम्हाला किती वेळ देतात. अंदाजे ही परीक्षा देण्यासाठी फक्त 2 तास दिले जातात.
MSW कोर्स कसा करायचा? । How to do MSW Course
- 12वी नंतर जर तुम्ही सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले असेल, तुम्ही तर बॅचलर ऑफ सोशल वर्क (BSW) मधून पदवी पूर्ण करावी जेणेकरून तुम्हाला पुढे MSW मध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणे सोपे जाईल.
- 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर बॅचलर ऑफ सोशल वर्कमध्ये प्रवेश घ्या आणि हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करा, हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असेल, या अभ्यासक्रमाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करा आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हा आणि त्यानंतर किमान 50% गुण असणे अनिवार्य आहे. त्यानंतर तुम्हाला MSW कोर्सला प्रवेश मिळू शकतो.
- 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण केल्यानंतर, तुम्हाला MSW कोर्समध्ये प्रवेश घ्या, यासाठी भारतात अनेक महाविद्यालये आहेत, जिथे तुम्ही हा कोर्स करू शकता. MSW कोर्समध्ये प्रवेश मिळाल्यानंतर, तुम्हाला 2 वर्षे अभ्यास करावा लागेल, अभ्यास पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. ज्याच्या आधारावर तुम्हाला नोकरी मिळेल.
- जर तुम्हाला पदवीनंतर MSW हा कोर्स कराचा असेल तर तुम्हाला मागील परीक्षेत 50% गुण असायला पाहिजेत. त्यानंतर तुम्ही MSW कोर्सची कोणतीही प्रवेश परीक्षा पस करून या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता.
MSW कोर्स करण्याचे फायदे काय आहेत? । Advantages of MSW Course in Marathi
- MSW कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही संस्थेसाठी सामाजिक विकासाचे काम करू शकता.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करू शकतो.
- गरीब मुलांना अन्न व शिक्षण देणे, लाईटची सुविधा देणे आणि या सर्व सुविधा स्वयंसेवी संस्थांमार्फत देणे इत्यादी बाबींचा विकास करू शकता.
- हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला रुग्णालयातील सुविधांमध्ये विकास करता येईल.
- हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला मानसशास्त्र क्षेत्रात करता येईल.
- हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला शालेय शिक्षण क्षेत्रात विकास करता येईल.
- हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाचे काम करता येईल.
- हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थापन क्षेत्रात काम करता येईल.
MSW कोर्स मध्ये शिकवले जाणारे विषय । Main Subjects in MSW Course
- लेबर वेलफेयर
- चिल्ड्रन वेलफेयर
- फैमिली वेलफेयर
- वूमेन वेलफेयर
- पर्सनल मैनेजमेंट
- ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट
- मेडिकल सोशल वर्क
- रूरल डेवलपमेंट
- अर्बन और सेमी अर्बन डेवलपमेंट
- स्कूल सोशल वर्क
- ह्यूमन साइकोलॉजी
- ट्राइबल एंथोर्पोलॉजी और सोशल वर्क
- ह्यूमन ग्रोथ एंड डेवलपमेंट
MSW कोर्स केल्यानंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळेल? । Jobs after MSW Course
सोशल वर्कमध्ये मास्टर्स केल्यानंतर, खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रात तुमच्यासाठी नोकरीसाठीचे दरवाजे उघडतात. या कोर्सनंतर तुमच्या नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतात. या कोर्सनंतर तुम्ही खासगी संस्थांमध्येही चांगली नोकरी मिळवू शकता.
या कोर्सनंतर, बहुतेक विद्यार्थी सरकारी क्षेत्रात लोकांसाठी चालवल्या जाणार्या सरकारी योजनांच्या क्षेत्रात काम करतात. पण या कोर्सनंतर तुम्हाला इतर अनेक नोकऱ्या मिळू शकतात. याशिवाय तुम्ही आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांसाठीही अर्ज करू शकता. जिथे या कोर्सला खूप मागणी आहे. खाली इतर नोकऱ्यांबद्दल माहिती देत आहोत
- चिकित्सालय (Clinics)
- समुपदेशन केंद्र (Counseling Center)
- शिक्षण क्षेत्र (Education sector)
- विकास कार्य क्षेत्र (Development work area)
- रुग्णालय क्षेत्र (Hospital area)
- सामाजिक सेवा क्षेत्र (Social Services Sector)
- आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य (International Social Work)
- उद्योग मानव संसाधन विभाग (Industry Human Resource Department)
- मानवाधिकार एजन्सी (Human Rights Agency)
- खाजगी संस्था (NGO) (Private Organization)
- नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभाग (Department of Natural Resource Management)
MSW कोर्सनंतर पगार किती असतो । Salary after MSW Course
कोणताही कोर्स पूर्ण केल्यावर किती पगार मिळू शकतो या प्रश्नाचे उत्तर शोधल्यानंतरच बहुतेक लोक कोर्स करायला पुढे जातात. MSW कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला सुरुवातीला मासिक 20,000 ते 30,000 रुपये पगार मिळू शकतो. पण जसजसा अनुभव वाढत जाईल, तसतसा पगार वाढतो.
काही संस्थांमध्ये तुम्हाला यापेक्षा जास्त पगार मिळू शकतो, या क्षेत्रात इतर क्षेत्रांपेक्षा जास्त पगार आहे, अनुभव मिळाल्यावर तुम्हाला या सॅलरी पॅकेजपेक्षा जास्त पगार मिळू शकेल.
MSW कोर्सचा अभ्यासक्रम । Syllabus for MSW Course
सेमेस्टर 1
- हिस्ट्री एंड फिलोसोफी ऑफ सोशल वर्क
- सोशल प्रॉब्लम्स एंड सोशल डेवलपमेंट
- सोशल वर्क रिसर्च एंड क्वानटेटिव एनालिसिस
- ह्यूमन ग्रोथ एंड डेवलपमेंट
- सोशल वर्क प्रैक्टिकल 1
- सोशल वर्क प्रैक्टिकल 2
- आई टी इन सोशल सेक्टर
सेमेस्टर 2
- सोशल एक्सक्लूजन एंड इंक्लूसिव पॉलिसी
- रिहैबिलिटेशन एंड रि-सेटेलमेंट
- सोशल वर्क मेथड्स
- विजुअल कल्चर
- सोशल वर्क प्रैक्टिकल 3
- सोशल वर्क प्रैक्टिकल 4
- कम्युनिटी इंटरवेंशन एंड एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट
सेमेस्टर 3
- आईडियोलॉजी एंड एथिक्स ऑफ सोशल वर्क
- सोशल लेजिसलेशन एंड लेबर वेलफेयर
- वल्नरेबल चिल्ड्रन एंड डेवलपमेंट
- इलेक्ट्रिक 1
- सोशल वर्क प्रैक्टिकल 5
- सोशल वर्क प्रैक्टिकल 6
सेमेस्टर 4
- सोशल वर्क एडमिनिस्ट्रेशन
- कॉरपोरेट सोशल रिस्पांसिबिलिटी
- ट्राईबल एंथ्रोपोलॉजी एंड सोशल वर्क
- इलेक्टिव 2
- फंडामेंटल ऑफ मेडिकल सोशल वर्क
- ब्लॉक फील्ड वर्क प्लेसमेंट