जाहिरात लेखन कशी करायची । Jahirat Lekhan in Marathi

नमस्कार मित्रानो, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण पाहणार आहोत Jahirat Lekhan in Marathi

मित्रानो, जाहिरात म्हणजे कोणत्याही वस्तू किंवा सेवांबद्दल आकर्षक आणि रचनात्मक पद्धतीने लिहिणे आणि ग्राहकांसमोर मांडणे. एखाद्या वस्तूची जाहिरात बघून ग्राहक त्याकडे आकर्षित होतात आणि त्या वस्तू किंवा सेवा खरेदी करतात. त्यामुळे एखाद्या वस्तूच्या विक्रीचे यश हे त्याच्या जाहिरातीवर अवलंबून असते.

त्यामुळे कोणत्याही व्यवसायासाठी जाहिरात हि खूप महत्वाची असते. कारण जाहिरातींमुळेच ग्राहक त्यांच्याकडे आकर्षिले जातात आणि त्यांचा व्यवसाय चांगल्याप्रकारे चालतो. जाहिरातीला इंग्रजीमध्ये advertisement असे म्हणतात.

मित्रानो विचार करा कि जर जाहिरातच नसेल तर आपल्याला कसे कळणार कि बाजारात एखादी वस्तू विकण्यासाठी आहे. जाहिरातच केली नाही तर ग्राहकांना कळणारच नाही कि एखाद दुकान, हॉस्पिटल, खुल्या जागा, फ्लॅट, हॉटेल किंवा वस्तू बाजारात अवैलेबल आहेत.

आजच युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे स्पर्धा इतकी वाढली आहे कि प्रत्येक जण आपली वस्तू किंवा आपल्या सेवा विकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक जाहिराती करतात. ज्यामुळे ग्राहक त्या जाहिरातीमुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या वस्तू खरेदी करतात.

मित्रानो आज असे अनेक व्यवसाय आहेत जे ब्रँड बनले आहेत ते फक्त जाहिरातींमुळेच शक्य झाले आहे.

आपल्या आजूबाजूला अनेक जाहिराती असतात त्यामुळेच तर सर्व गोष्टींची माहिती आपल्याला उपलब्ध होते आणि ग्राहक म्हणून आपल्याला ती खरेदी करणे सोपे होते.

आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाहिरात पाहायला मिळेल जस कि दैनंदिन वापरात असणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तूंपासून ते मोठमोठ्या शहरातील फ्लॅट, खुले प्लॉट, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, दागिन्यांचे दुकाने, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, रोपवाटिका इत्यादी.

जाहिरातीची व्याख्या काय आहे? | What is Defination of Advertisement in Marathi

एखाद्या वस्तूची किंवा सेवेची विक्री किंवा निर्मिती करण्याच्या उद्देशाने केलेल्या जनसंवादाला जाहिरात असे म्हणतात. जाहिरात हि एक प्रकारची कलाच आहे ज्याद्वारे ग्राहकांना जाहिरात करणाऱ्याच्या इचछेनुसार विचार करणे, सहमती देणे, कृती करणे किंवा वागणे या दृष्टीने माहिती दिली जाते.

तसं पाहायला गेलं तर जाहिरात हि दिसायला खूप छोटी आणि कमी शब्दात असते पण त्याचा अर्थ खूप मोठा असतो. जस कि आपण पाहतोच टीव्ही वर, मोबाईलमध्ये, किंवा रस्त्यावर लावलेले पोस्टर किंवा बॅनर हे अगदी कमी शब्दात मोठा संदेश देत असतात.

मित्रानो, आजच्या आधुनिक युगात जाहिरात हे व्यवसाय वाढवण्याचे एक माध्यम म्हणून ओळखले जाते.

जाहिरात कशी लिहावी यासाठी काही महत्वाचे टिप्स | Tips to Write Advertisement in Marathi

मित्रानो जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना आपला व्यवसाय, उत्पादने किंवा सेवा यांच्याविषयीचा संदेश दिला जातो. तुमची जाहिरात बघत बसण्यासाठी किंवा वाचण्यासाठी ग्राहकांना वेळ नसतो त्यामुळे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त संदेश जाहिरातीत द्यायचा असतो. त्यासाठी खालील टिप्सचा वापर करावा.

  • मित्रानो जाहिरात लिहीत असताना महत्वाची टीप म्हणजे कमीत कमी शब्दात जास्त संदेश देण्याचा प्रयत्न करावा.
  • सर्वप्रथम जाहिरात हि कशाची आहे म्हणजे कोणत्या व्यवसायाची आहे किंवा कोणत्या वस्तूची आहे हे ठळक अक्षरात वर लिहायला पाहिजे.
  • जाहिरातींकडे बघून ग्राहक त्याकडे आकर्षित होतील अशा प्रकारचे शब्द जाहिरातीत वापरावे.
  • जाहिरात आकर्षक करण्यासाठी तुम्ही अलंकारिक शब्द, काव्यमय शब्द आणि प्रभावी शब्दांचा वापर करू शकता.
  • जाहिरात लिहीत असताना नवनवीन ट्रेंड्स, ग्राहकांची आवड, नवीन फॅशन्स, ग्राहकांच्या सवयी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहकांना कशाची गरज आहे या गोष्टीचा उल्लेख जाहिरातीत करावा. त्यासाठी आधी थोडस संशोधन करावं.
  • जाहिरात लिहिताना त्या व्यवसायाची गुणवत्ता किंवा वस्तूची गुणवत्ता याबद्दल ग्राहकांना माहिती द्यावी. कारण वस्तूची गुणवत्ताच त्या व्यवसायाला यशस्वी बनवते, आणि पुढे चालून तो व्यवसाय ब्रँड बनत असतो.
  • जाहिरात लिहीत असताना जाहिरातीमध्ये संपर्क करण्यासाठी पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल ऍड्रेस नक्की द्यायला पाहिजे.
  • आजकाल सोशल मीडियाचाहि वापर केला जातो त्यामुळे सोशल मीडियावर त्या व्यवसायाचे ग्रुप्स किंवा पेज असेल तर त्यांचेहि ऍड्रेस जस कि फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन यांचे ऍड्रेसहि जरूर द्यायला पाहिजे. सोशल मेडीयाद्वारे ग्राहक रिटेन्शन वाढतं.
  प्लॅस्टिक शाप कि वरदान | Plastic Shap Ki Vardan

चला तर मग आता आपण जाहिरात लेखनाची काही उदाहरणे पाहुयात.

बेकरी साठी जाहिरात लेखन करा | Bakery Jahirat Lekhan in Marathi

Bakery cake shop jahirat in marathi

आइस्क्रीम पार्लर साठी जाहिरात लेखन करा | ice-cream Parlour Jahirat Lekhan in Marathi

icecream parlour jahirat in marathi

छत्री साठी जाहिरात लेखन करा | Chatri Jahirat Lekhan in Marathi

chatri jahirat in marathi

मोबाईल शॉप साठी जाहिरात लेखन करा | Mobile Shop Jahirat Lekhan in Marathi

mobile shop jahirat in marathi

मोबाईल जाहिरात लेखन मराठी | Mobile Jahirat Lekhan in Marathi

मोबाईल जाहिरात लेखन मराठी

साबण जाहिरात लेखन मराठी | Jahirat Lekhan in Marathi on Soap

saban jahirat lekhan in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *