Issac Newton Information in Marathi

आइझॅक न्यूटन मराठी माहिती | Issac Newton Information in Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Issac Newton Information in Marathi. 

सर आइझॅक न्यूटन हे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, गणितज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ, खगोल शास्त्रज्ञ, रसायन शास्त्रज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ तसेच 17 व्या शतकातील अतिशय प्रतिभावंत वैज्ञानिक होते. त्यांनी विज्ञानाच्या जगात मोलाची भर टाकली आहे.

सर आइझॅक न्यूटन यांच्याशिवाय तर हे विज्ञान अपूर्णच राहिलं असतं. 2005 साली झालेल्या रॉयल सोसायटीच्या सर्वेक्षणात वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे कि आईन्स्टाईन पेक्षाही जास्त प्रतिभावंत न्यूटन होते.

आइझॅक न्यूटन यांची थोडक्यात माहिती | Issac Newton Information in Marathi

  • नाव : आइझॅक न्यूटन
  • जन्म : २५ डिसेंबर १६४२
  • जन्मस्थान : इंग्लंडच्या लिंकनशायरमधील वुलस्टोर्प येथे
  • वडिलांचं नाव : आइझॅक न्यूटन
  • आईच नाव : हॅना आयस्कॉ
  • पत्नी : नाही
  • नागरिकत्व : इंग्लंड
  • मृत्यू : २० मार्च १७२७

आइझॅक न्यूटन यांचा जन्म आणि बालपण | Isaac Newton birth and childhood

न्यूटन यांचा जन्म ख्रिसमसच्या दिवशी, 25 डिसेंबर 1642 मध्ये इंग्लंडच्या लिंकनशायरमधील वुलस्टोर्प येथे झाला. न्यूटनच्या वडिलांचा मृत्यू न्यूटनच्या जन्माच्या  महिने अगोदरच झाला होता. न्यूटन जेंव्हा तीन वर्षांचे होते तेंव्हा त्यांच्या आईने दुसरं लग्न केलं आणि त्यांना सोडून गेली. न्यूटनचे संगोपन त्यांच्या आजीने केले.

जेंव्हा न्यूटनच्या आईच्या दुसऱ्या पतीचाही मृत्यू झाला तेंव्हा त्या वुलस्टोर्प येथे परत आल्या आणि पारंपरिक शेती करायला सुरुवात केली. न्यूटनच्या आईचा असा आग्रह होता कि त्यांनी शेतात लक्ष घालावे. परंतु न्यूटनला मात्र शेतीत अजिबात रस नव्हता. त्यांना शिक्षणात आवड होती.

आइझॅक न्यूटन यांचं शिक्षण | Education of Issac Newton Information in Marathi

न्यूटोनच प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झालं. जेंव्हा ते बारा वर्षांचे झाले तेंव्हा पुढील शिक्षणासाठी ते ग्रांथम येथील शाळेत शिकायला गेले. तेथे ते एका फार्मासिस्टच्या घरी राहत होते. ज्यांचं नाव क्लार्क होतं. न्यूटनला क्लार्क यांची रासायनिक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय खूप आवडायचे.

वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी इंग्लंड च्या ट्रिनिटी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. 1665 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यांना पुढील शिक्षण घ्यायचं होत परंतु प्लेग आजारामुळे त्यांना वुलस्टोर्प येथे परत जावं लागलं. 1666 ते 1667 पर्यंत ते तिथेच राहिले. या काळातच त्यांनी त्यांच्या प्राथमिक प्रयोगांना सुरुवात केली होती. त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण आणि प्रकाश यांच्यावरही ते काम करत होते.

त्यानंतर ते केम्ब्रिजला परत आले आणि त्यांनी मास्टर डिग्री पूर्ण केली आणि आपल्या प्रयोगांना विस्तृत रूप प्रयत्न सुरु केले. त्यांचे गणिताचे प्राध्यापक त्यांच्या बुद्धिमत्तेवर खूपच प्रभावित होते. 1669 मध्ये जेंव्हा ते नोकरी सोडत होते. तेंव्हा त्यांनी  न्यूटनला त्यांच्या जागी काम करण्यास सुचवले. न्यूटन यांनी त्यांचा सल्ला मान्य केला आणि न्यूटन गणिताचे प्राध्यापक झाले.

आइझॅक न्यूटन यांची कारकीर्द | career and work of Issac Newton Information in Marathi

न्यूटन यांनी आयुष्यभर अनेक संशोधन केले. ते पुढीलप्रमाणे

1. न्यूटन यांचा प्रकाशाचा सिद्धांत:

1670 ते 1672 पर्यंत न्यूटन यांनी प्रकाशाच्या सिद्धांतावर अनेक वाख्याने दिली. न्यूटन यांना प्रकाशाबद्दल खुपचं आकर्षण होतं. न्यूटन यांनी प्रकाशाच्या गुणधर्मांबद्दल शोध लावला. न्यूटन यांनी हे सिद्ध करून दाखवलं कि पांढऱ्या रंगाचा प्रकाश हा सात रंगांच्या प्रकाशाच्या मिश्रणातून तयार होतो.

2. न्यूटन यांचे बलांचे नियम:

  पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर  | Ahilyabai Holkar information in Marathi

दोन कणांमधील आकर्षण आणि प्रतिकर्षण या विषयावर संशोधन सुरु असताना न्यूटन याना असं जाणवलं कि कोणत्याही कानांमध्ये बल प्रयुक्त करण्यासाठी ईश्वराची उपस्तीथी असू शकते.

असा विचार त्यांनी यामुळे केला कारण कि ते खूपच धार्मिक विचारांचे आणि ईश्वराच्या दिव्य शक्तीमध्ये विश्वास ठेवत होते. त्यामुळेच आपल्या विचारांमध्ये त्यांनी ईश्वराचा आधार घेतला होता. नंतर याच विचाराला त्यांनी बलाच्या क्रिया आणि प्रतिक्रिया असे नाव दिले.

3. न्यूटन यांचे यांत्रिक आणि गुरुत्वाकर्षणाचे संशोधन:

1679 मध्ये न्यूटन यांनी त्यांच्या प्रिंसिपिया च्या दुसऱ्या संस्करणात यांत्रिकीबद्दल व्याख्या केली आहे. या प्रिंसिपियामुळेच न्यूटन याना आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त झाली आहे. एके दिवशी न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते.

एक सफरचंद खाली पडले त्यानंतर त्यांच्या डोक्यात विचार आला कि हे सफरचंद खालीच का पडले, ते वरती का नाही गेले. आणि याच क्षणापासून सुरु झाला त्यांचा वैज्ञानिक शोध आणि  गुरुत्वाकर्षणाचा जन्म.

न्यूटन यांनी गतीच्या तीन नियमांचा शोध लावला. जे आपण आजही शाळेत शिकतो. हे तीन नियम इतके तंतोतंत लागू होतात कि आजपर्यंत त्यांच्यात कोणतेही बदल करण्याची गरज भासली नाही.

आइझॅक न्यूटन यांचा मृत्यू | Isaac Newton death

न्यूटन हे एक अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे होते. ते ईश्वरमध्ये विश्वास ठेवत होते. त्यांनी बायबल वरही अनेक लेख लिहिले होते. त्यांचा मृत्यू 20 मार्च 1727 मध्ये झाला. त्यांचे वेस्टमिन्स्टर एब्बे मध्ये अंत्यसंस्कार झाले. न्यूटन यांनी जन्मभर लग्न केलं नाही. मृत्यूनंतरही न्यूटन यांच्या प्रसिद्धीमध्ये कोणतीच कमी आली नाही. ते आजही खूप प्रसिद्ध आहेत.

हे नक्की वाचा: [Issac Newton Information in Marathi]
थॉमस एडिसन यांचे जीवनचरित्र
सीव्ही रमण यांची माहिती

  • मॅथेमॅटिका प्रिंसिपिया
  • गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत
  • न्यूटनचे गतिविषयक तीन नियम

न्यूटनच्या गतीविषयक नियमांची माहिती :

आयझॅक न्यूटन यांचे गतीविषयक तीन नियम आपल्याला माहिती आहेत. जेंव्हा वस्तू गतिमान असते तेव्हा आणि स्थिर असते तेव्हा काय घडत असते? याचे आकलन या नियमांवरून होते.

1. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम :

जडत्वाचा नियम:
न्यूटनच्या पहिल्या गती नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात.
जडत्व म्हणजे गतीला विरोध
या नियमानुसार एखादी वस्तू स्थिर असेल किंवा सरळ रेषेत गतीमान असेल तर जोपर्यंत बाहेरून बल लावले जात नाही तोपर्यंत तिची स्थिती कायम राहते.
या नियमानुसार जोवर एखादे बल वस्तुला ओढत नाही किंवा ढकलत नाही तोवर त्या वस्तूची स्थिती बदलत नाही. त्यामुळे स्थिर वस्तू स्थिरच राहील आणि एकसमान गतीने सरळ रेषेत पुढे जाणारी वस्तू त्याच गतीने पुढे जात राहील.

न्यूटनच्या गतीविषयक पहिला नियम उदाहरण

न्यूटनच्या पहिल्या नियमाप्रमाणे एक उदाहरण पाहू.
जेंव्हा आकाशात चेंडू फेकला जातो तेंव्ह तो वर जातो कारण त्याला बल लावून वर फेकलं जात परंतु एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यावर तो परत खाली पडतो कारण त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती खाली खेचत असते.

2. न्युटनचा गतीविषयक दुसरा नियम :

त्वरणाचा नियम:
न्यूटनने मांडलेल्या गतीविषयक दुसऱ्या नियमास त्वरणाचा नियम असे म्हणतात.
या नियमानुसार वस्तुच्या गतीतील बदल त्या वस्तुवर लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि वस्तुच्या वस्तुमानावर अवलंबून असते.
वस्तुला कुणीतरी ढकलले किंवा ओढले तर काय होते, हे हा नियम आपल्याला सांगतो. बल जेवढे जास्त तेवढेच वस्तुची गती खूप वाढते किंवा खूप कमी होते.
जड वस्तुची गती वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जास्त बल आवश्यक असते.

न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियम उदाहरण

न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाप्रमाणे एक उदाहरण पाहू.
मोटारगाडीला गतिमान करण्यासाठी जास्त बल लागते कारण मोटारगाडीचे वजन जास्त असते तर त्या तुलनेत एखाद्या मोटारसायकलला गतिमान करण्यासाठी कमी बल लागते.

3. न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम :

क्रिया आणि प्रतिक्रिया नियम:
न्यूटनने मांडलेला गतीचा तिसरा नियम क्रिया आणि प्रतिक्रिया नियम म्हणून ओळखला जातो.
या नियमानुसार प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरोधी प्रतिक्रिया असते.
न्यूटनच्या मते, जेव्हा एखादे बल वस्तुला ढकलते तेव्हा वस्तू उलट दिशेत त्या बलाला ढकलत असते. उलट दिशेत ढकलणाऱ्या या बलाला प्रतिक्रिया बल म्हणतात.

न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियम उदाहरण

न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाप्रमाणे एक उदाहरण पाहू.
मित्रानो रॉकेट आकाशात उडते ते याच नियमाचा उपयोग करून. रॉकेटमधून निघणारा वायू रॉकेटला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेला जाण्यास मदत करते.
दुसरं एक उदाहरण म्हणजे जेंव्हा आपण रबरी चेंडू भिंतीला मारतो तेंव्हा चेंडू जेवढ्या जोरात फेकून मारतो तेवढ्या जोरात ते परत येते.

  संतश्रेष्ठ एकनाथ महाराज | Sant Eknath Information in Marathi

आइझॅक न्यूटन यांचे प्रसिद्ध साहित्य | Isaac Newton Literature

  • फिलॉसॉफी नाचुरलीस प्रिंसिपिया मॅथेमॅटिका
  • मेथोड ऑफ फ्लॅक्सियस
  • दे मोटू कार्पोरम इन जिरम
  • ऑप्टीकस
  • अरीथमेटिका युनिव्हर्सेलिस
  • सिस्टम ऑफ द व्हर्ल, ऑप्टिकल लेक्चर्स, द क्रोनॉलॉजी ऑफ एन्शिएन्ट किंग्डमस.

FAQ: [Issac Newton Information in Marathi]

न्यूटन यांचे पूर्ण नाव काय?

सर आइझॅक न्यूटन

न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम काय आहे?

जडत्वाचा नियम:
न्यूटनच्या पहिल्या गती नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात.
जडत्व म्हणजे गतीला विरोध
या नियमानुसार एखादी वस्तू स्थिर असेल किंवा सरळ रेषेत गतीमान असेल तर जोपर्यंत बाहेरून बल लावले जात नाही तोपर्यंत तिची स्थिती कायम राहते.
या नियमानुसार जोवर एखादे बल वस्तुला ओढत नाही किंवा ढकलत नाही तोवर त्या वस्तूची स्थिती बदलत नाही. त्यामुळे स्थिर वस्तू स्थिरच राहील आणि एकसमान गतीने सरळ रेषेत पुढे जाणारी वस्तू त्याच गतीने पुढे जात राहील.
न्यूटनच्या गतीविषयक पहिला नियम उदाहरण
न्यूटनच्या पहिल्या नियमाप्रमाणे एक उदाहरण पाहू.
जेंव्हा आकाशात चेंडू फेकला जातो तेंव्ह तो वर जातो कारण त्याला बल लावून वर फेकलं जात परंतु एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यावर तो परत खाली पडतो कारण त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती खाली खेचत असते.

न्युटनचा गतीविषयक दुसरा नियम काय आहे?

त्वरणाचा नियम:
न्यूटनने मांडलेल्या गतीविषयक दुसऱ्या नियमास त्वरणाचा नियम असे म्हणतात.
या नियमानुसार वस्तुच्या गतीतील बदल त्या वस्तुवर लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि वस्तुच्या वस्तुमानावर अवलंबून असते.
वस्तुला कुणीतरी ढकलले किंवा ओढले तर काय होते, हे हा नियम आपल्याला सांगतो. बल जेवढे जास्त तेवढेच वस्तुची गती खूप वाढते किंवा खूप कमी होते.
जड वस्तुची गती वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जास्त बल आवश्यक असते.
न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाप्रमाणे एक उदाहरण पाहू.
मोटारगाडीला गतिमान करण्यासाठी जास्त बल लागते कारण मोटारगाडीचे वजन जास्त असते तर त्या तुलनेत एखाद्या मोटारसायकलला गतिमान करण्यासाठी कमी बल लागते.

न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम काय आहे?

क्रिया आणि प्रतिक्रिया नियम:
न्यूटनने मांडलेला गतीचा तिसरा नियम क्रिया आणि प्रतिक्रिया नियम म्हणून ओळखला जातो.
या नियमानुसार प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरोधी प्रतिक्रिया असते.
न्यूटनच्या मते, जेव्हा एखादे बल वस्तुला ढकलते तेव्हा वस्तू उलट दिशेत त्या बलाला ढकलत असते. उलट दिशेत ढकलणाऱ्या या बलाला प्रतिक्रिया बल म्हणतात.
न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाप्रमाणे एक उदाहरण पाहू.
मित्रानो रॉकेट आकाशात उडते ते याच नियमाचा उपयोग करून. रॉकेटमधून निघणारा वायू रॉकेटला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेला जाण्यास मदत करते.
दुसरं एक उदाहरण म्हणजे जेंव्हा आपण रबरी चेंडू भिंतीला मारतो तेंव्हा चेंडू जेवढ्या जोरात फेकून मारतो तेवढ्या जोरात ते परत येते.

गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?

सर आइझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला

सारांश : [Issac Newton Information in Marathi]

मित्रानो या लेखात आपण Issac Newton Information in Marathi याबद्दल माहिती पहिली. मला आशा आहे कि हि माहिती तुम्हाला आवडली असेल. आमचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा.

1 thought on “आइझॅक न्यूटन मराठी माहिती | Issac Newton Information in Marathi”

  1. Pingback: थॉमस एडिसन यांचे जीवनचरित्र | Thomas Edison Information In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *