Fashion Designer Course Information In Marathi

फॅशन डिझायनिंग कोर्स करिअरचा उत्तम पर्याय । Fashion Designer Course Information In Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Fashion Designer Course Information In Marathi. 

फॅशन डिझायनिंगमध्ये करिअरच्या अफाट संधी आहेत. कारण, जग झपाट्याने फॅशन ट्रेंड्स स्वीकारत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्या मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंगचे कोर्स करावे लागतात. कारण, या क्षेत्रात नोकरी, पैसा यासोबतच प्रसिद्धी सुद्धा मिळते.

फॅशनच्या जगात दररोज ट्रेंड बदलत आहेत. या बदलत्या ट्रेंडनुसार प्रत्येकाला चांगले दिसायचे आहे. अशा परिस्थितीत सामान्य लोक जे काही कपडे खरेदी करतात ते फॅशन ट्रेंड लक्षात घेऊन खरेदी करतात. अशा परिस्थितीत फॅशन इंडस्ट्री जसजशी विकसित होत आहे, तसतशी फॅशन डिझायनर्सची मागणीही बाजारात वाढत आहे. त्याचबरोबर फॅशन डिझायनिंगनेही शैक्षणिक क्षेत्रात स्थान निर्माण केले आहे.

फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग, कापड उद्योग, फॅशन मॅनेजमेंट, फॅशन ऍक्सेसरीज डिझायनिंग आणि अशा अनेक गोष्टींबद्दल खूप काही शिकायला मिळते.

तुम्हालाही फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचे असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे, चला जाणून घेऊया फॅशन डिझायनर होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आणि कोर्स केल्यानंतर कोणत्या प्रकारचा जॉब करावा लागतो, तसेच त्यांचा पगार किती मिळतो.

फॅशन डिझायनिंग म्हणजे काय । What is Fashion Designing?

फॅशन डिझायनिंग ही एक प्रकारची कला आहे. फॅशन डिझायनिंग कोर्स हा एक कोर्स आहे जो सुंदर फॅशनेबल कपडे आणि फॅशन अॅक्सेसरीज डिझाइन करण्याची कला शिकवतो.

या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना नवनवीन ट्रेंड आणि डिझाइनिंगबद्दल प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये फॅशन डिझायनर आपले कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पना वापरून कपड्यांना नवीन आणि चांगला लुक देतात.

फॅशन डिझायनर केवळ नवनवीन डिझाईन्सच तयार करत नाही, तर त्याच्या कामात पॅटर्न तयार करणे, फॅब्रिक निवडणे, डिझाइननुसार कपडे कापणे आणि शिलाई करणे इत्यादींचा समावेश त्यामध्ये होतो.

फॅशन डिझायनिंगमधील उत्तम करिअरसाठी केवळ फॅशन डिझाईनचे ज्ञान पुरेसे नाही, तर फॅशन शो, मार्केट ट्रेंड आणि फॅशन बिझनेसचे ज्ञान असणेही खूप महत्त्वाचे आहे. फॅशन डिझायनिंग हे केवळ कपड्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते खूप विस्तारले आहे, ज्यामध्ये उत्तम करिअर करता येते.

या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना नवीन ट्रेंड आणि डिझाइनिंगबद्दल प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून ते बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार आणि बदलत्या फॅशन कल्चरनुसार नवनवीन डिझाइनचे कपडे आणि अॅक्सेसरीज डिझाइन करू शकतील.

यशस्वी फॅशन डिझायनर होण्यासाठी उमेदवाराने कला (Art) आणि हस्तकलेचा (Craft) बारकाईने अभ्यास केला पाहिजे. फॅशन डिझायनिंग हे खूप जास्त मागणी असलेले क्षेत्र आहे, त्यामुळे या क्षेत्रात तुम्हाला नवीन ओळख मिळू शकते.

Fashion Designing Course

फॅशन डिझायनिंगसाठी शैक्षणिक पात्रता । Eligibility for Fashion Designing Course

  • फॅशन डिझायनिंग कोर्सला ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे. अंडर ग्रॅज्युएट (UG) स्तरावरील फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तरुणांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना NID, DAT, UCEED आणि NIFT सारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. फॅशन डिझायनिंग कोर्सेसमध्ये प्रवेश प्रवेश घेण्यासाठी एंट्रन्स एक्साम देखील उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • फॅशन डिझायनर कोर्स करणाऱ्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा 19 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे.
  • 12वी नंतर फॅशन डिझायनिंग कोर्स करण्यासाठी तुम्ही भारतातील सर्वोत्तम कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता. या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेतली जाते, ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण मिळवावे लागतात.
  वकील व्हायचं असेल तर जाणून घ्या एलएलबी कोर्सची संपूर्ण माहिती । LLB Course Information

बारावीनंतर फॅशन डिझायनिंग कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी काही सर्वोत्तम प्रवेश परीक्षा खालीलप्रमाणे आहेत.

  • NIFT नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी
  • NID नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिजाइन
  • UCEED अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एग्जाम फॉर डिजाइन
  • FDDI फुटवियर डिजाइन डेवलपमेंट इंस्टीट्यूट
  • SEED सिंबायोसिस एंटरेंस एग्जाम फॉर डिजाइन
  • IIAD इंडियन इंस्टीट्यूट आफ आर्ट अँड डिजाइन
  • AIEED ऑल इंडिया एंट्रन्स एग्जाम फॉर डिजाइन

फॅशन डिझायनिंगसाठी आवश्यक कौशल्ये | Skills required for Fashion Designing Course

  • फॅशन डिझाईन क्षेत्रात चांगले आणि इच्छित करिअर करण्यासाठी काही सामान्य आणि अद्वितीय कौशल्ये आवश्यक आहेत. जसे कि Artistic आणि Creative Skill इ.
  • यासोबतच स्केचिंग आणि ड्रॉईंगचे ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे. कारण आपल्याकडे ड्रॉईंग आणि स्केचिंगद्वारे आपल्या कल्पना चांगल्या प्रकारे व्यक्त करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
  • तसे तर प्रत्येक क्षेत्रासाठी सर्जनशील मन असणे आवश्यक आहे आणि डिझाइनिंग पूर्णपणे सर्जनशीलतेने परिपूर्ण आहे, म्हणून या उद्योगात करिअर करण्यासाठी खालील कौशल्ये आवश्यक आहेत.
  • सर्जनशीलता आणि कलात्मक क्षमता (Creativity and Artistic Ability)
  • चांगले संवाद कौशल्य (Good Communication Skills)
  • ध्येय-केंद्रित परिमाणात विचार करण्याची क्षमता (Ability to Think in Goal-Oriented Dimension)
  • बिझनेस आयडिया (Business Idea)
  • बाजाराची चांगली समज (Good Understanding of Market)
  • ग्राहक जीवनशैली समजून घेण्याची क्षमता (Ability to Understand customer Lifestyle)
  • व्हिज्युअल कल्पनाशक्ती (Visual Imagination)
  • स्केचिंगमधील कला (Art in Sketching)
fashion designing course information in marathi

फॅशन डिझायनिंग कोर्सेसचे प्रकार कोणते आहेत? What are the types of fashion designing course?

फॅशन डिझाईन साठी विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यापैकी काही फेमस कोर्स खालीलप्रमाणे आहेत.

  • B. Sc in Fashion and Apparel Designing
  • B. Sc in Fashion Business and Retail Management
  • B. Sc in Lifestyle and Accessory Design
  • B. Des (Fashion Design)
  • B. Des (Textile Design)
  • B. Des (Leather Design)
  • B. Des (Accessory Design)
  • B. Des (Knitwear Design)
  • B. Des (Apparel Production)
  • B. Des (Fashion Communication)
  • B. A. (Hons) Fashion Design
  • B. A. (Hons) Fashion Styling and Image Design
  • B. A. (Hons) Communication Design
  • B. A. (Hons) Jewellery Design
  • MBA in Fashion Merchandising and Retail Management
  • MBA in Fashion Design and Business Management
  • MBA in Textile Management
  • M.Sc. in Fashion Designing

फॅशन डिझाईन कोर्सची फी किती असते । How much is the fee for fashion designing course?

फॅशन डिझायनिंग कोर्सची प्रवेश प्रक्रिया, आवश्यकता आणि फी या सर्व भिन्न आहेत. प्रत्येक कॉलेजची फीस वेगवेगळी असू शकते. जर तुम्ही हा कोर्स एखाद्या सामान्य इन्स्टिटयूट मधून करत असाल तर त्यांची सामान्य फी 50,000 ते 1,00,000 पर्यंत असू शकते.

पण जर तुम्हाला दिल्ली, मुंबई, बेंगळुरू इत्यादी शहरांमधून फॅशन डिझायनिंग कोर्स करायचे असेल तर अशा इन्स्टिटयूटची सामान्य फी 1,00,000 ते 4.5 लाखांपर्यंत असू शकते. त्यामुळे ऍडमिशन घेण्यापूर्वी योग्य रिसर्च करून कॉलेज आणि कोर्सची निवड करावी.

तसेच विद्यार्थ्यांना विनंती आहे कि त्यांना ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यापूर्वी जाऊन चौकशी करावी किंवा कॉलेजच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन फी स्ट्रक्चर जाणून घावे.

फॅशन डिझायनिंग कोर्सचा कालावधी किती आहे । What is the duration of fashion designing course?

फॅशन डिझायनिंगमध्ये बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग, बीएससी इन फॅशन डिझायनिंग, बॅचलर ऑफ फॅशन कम्युनिकेशन, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग असे कोर्सेस करता येतात.

वेगवेगळ्या इन्स्टिटयूट मध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम चालवले जातात, ज्यांचा कालावधीही वेगळा असतो. फॅशन डिझायनिंगचे कोर्स 1 ते 4 वर्षे कालावधीचे असू शकतात.

हे नक्की वाचा:
1. बीसीए कोर्सची संपूर्ण माहिती
2. नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती
3. MSW कोर्सची संपूर्ण माहिती
4. एएनएम नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती
5. जीएनएम नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती

फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर । A career in fashion designing

फॅशन डिझाईन हे झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे आणि त्यात करिअरच्या अफाट संधी आहेत हे तुम्हाला माहिती आहेच कारण ते हळूहळू जागतिक उद्योग बनले आहे.

  एनडीए म्हणजे काय आणि एनडीएची तयारी कशी करावी | NDA Information in Marathi

फॅशन डिझायनरची मागणी पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे, त्यामुळे त्यात करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. फॅशन डिझायनिंगचे चांगले ज्ञान असलेल्या डिझायनर्ससाठी कंपन्या दरवाजे उघडत आहेत.

फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात तुम्ही उत्तम करिअर करू शकता. कारण भारतीय फॅशन उद्योग अनेक लोकांच्या डिझायनर कपड्यांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करतो.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश आहे. त्यामुळे येथे कपड्यांना खूप मागणी आहे. यामुळे या क्षेत्रातील चांगल्या फॅशन डिझायनर्सना मोठी मागणी आहे, जे फॅशनप्रेमींसाठी नवनवीन कपड्यांचे डिझाइन तयार करू शकतात.

अशाप्रकारे, जर तुमच्याकडे डिझायनिंगचे कौशल्य असेल तर तुमच्यासाठी नोकऱ्यांची कमतरता राहणार नाही. या क्षेत्रात तुम्हाला एकापेक्षा जास्त नोकऱ्या मिळतील. या क्षेत्रातील नोकऱ्या फक्त अशा लोकांना उपलब्ध आहेत ज्यांच्याकडे या क्षेत्राशी संबंधित कौशल्य आणि प्रतिभा आहे. म्हणूनच, या क्षेत्रात येण्यापूर्वी, कोर्स दरम्यान, आपण आपल्यामध्ये फॅशन डिझायनिंगशी संबंधित कौशल्ये आणि ज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करा.

फॅशन डिझायनिंगमध्ये कोणते जॉब प्रोफाईल्स आहेत What are the job profiles in fashion designing?

फॅशन डिझायनिंग हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, आपण विविध पदांवर काम करू शकता. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्पेशलायझेशनच्या आधारे नोकरी करू शकता.

  • Fashion Designer
  • Fashion Marketer
  • Fashion Concept Manager
  • Quality Controller
  • Fashion Coordinator
  • Fashion Show Organizers
  • Technical Designer
  • Fashion Consultant
  • Fashion Journalist
  • Fashion Modelling
  • Fashion Photography
  • Fashion Textile Designer
  • Fashion Fabric Designer
  • Fashion Stylist

फॅशन डिझायनरला पगार किती मिळतो । How much does a fashion designer get paid?

फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर, बरेच विद्यार्थी इंटर्नशिपसाठी जातात जेणेकरून ते त्यांचे कौशल्य सुधारू शकतील आणि कामाचा अनुभव मिळवतात.

बरेच विद्यार्थी कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी जातात. फॅशन डिझायनरचा पगार त्यांच्या क्षमतेवर आणि कौशल्यावर अवलंबून असतो.

तसे जर आपल्याला एखाद्या डिझायनरबद्दल बघायचे झाले तर, फ्रेशर स्तरावर फॅशन डिझायनरचा अंदाजे पगार 20,000 ते 30,000 च्या दरम्यान असतो आणि अनुभवी डिझायनरचा पगार 30,000 पेक्षा जास्त असतो.

जसजसा अनुभव वाढत जातो तास पगारही वाढत जातो. फॅशन डिझायनिंग क्षेत्रात चांगला अनुभव मिळवून स्वतःचा बिझनेस सुरु केला तर यामध्ये भरपूर पैसे कमवता येतात. यामध्ये पैसे कमवण्यासाठी कोणत्याही प्रकारची लिमिट नाही.

फॅशन डिझायनर कोर्स करण्यासाठी काही नामांकित कॉलेज | Reputed Colleges for doing Fashion Designer Course

फॅशन डिझायनर कोर्स करण्यासाठी काही नामांकित कॉलेजेस खालीलप्रमाणे आहेत.

  • नेशनल इंस्टिट्यूट ऑफ फैशन  टेक्नोलॉजी, दिल्ली
  • एमिटी स्कूल  ऑफ  फैशन  टेक्नोलॉजी, नॉएडा
  • नेशनल इंस्टिट्यूट  ऑफ  फैशन  टेक्नोलॉजी, मुंबई
  • सिम्बायोसिस इंस्टिट्यूट  ऑफ  डिज़ाइन , पुणे
  • नेशनल इंस्टिट्यूट  ऑफ  फैशन  टेक्नोलॉजी , बेंगलुरु
  • पर्ल अकादमी , दिल्ली
  • नेशनल इंस्टिट्यूट ऑफ  फैशन  टेक्नोलॉजी , चेन्नई
  • पर्ल अकादमी , जयपुर
  • नेशनल इंस्टिट्यूट  ऑफ  फैशन  टेक्नोलॉजी,पटना
  • नेशनल इंस्टिट्यूट  ऑफ  फैशन  टेक्नोलॉजी , हैदराबाद
  • निफ्ट -टिया कॉलेज  ऑफ  निटवियर  फैशन , दिल्ली
  • नेशनल इंस्टीट्यूट ऑफ डिजाइन (NID)
  • नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फैशन टेक्नोलॉजी (NIFT)
  • पर्ल एकेडमी ऑफ फैशन (PAF)
  • सिम्बोयसिस सेंटर ऑफ डिजाइन (SID)
  • नॉर्दन इंडिया इंस्टीट्यूट ऑफ फैशन टेक्नोलॉजी (NIIFT)
Fashion Designer Course Information In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *