equity meaning in marathi

इक्विटी म्हणजे काय आणि ती कशी जाणून घ्यायची? । Equity Meaning in Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Equity Meaning in Marathi.

जेव्हा तुम्ही शेअर बाजाराबद्दल ऐकता किंवा वाचता तेव्हा तुम्हाला एक शब्द नेहमी ऐकण्यात येतो तो म्हणजे इक्विटी. परंतु तुम्हाला equity म्हणजे काय माहिती आहे काय? नसेल तर या लेखात आपण पाहणार आहोत Equity Meaning in Marathi

मित्रांनो, शेअर बाजारात सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे इक्विटी. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला इक्विटीचा खरा अर्थ कळला पाहिजे जेणेकरून त्यामुळे तुमच्या शेअर मार्केटबद्दल असलेल्या ज्ञानात भर पडेल.

चला तर मग आज या लेखाद्वारे आपण Equity म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात.

Equity meaning in Marathi: “इक्विटी म्हणजे एखाद्या कंपनीत असलेला मालकी हिस्सा किंवा भागीदारी.”

Table of Contents

Equity म्हणजे काय? | Equity Meaning in Marathi

सोप्या भाषेत समजून घ्यायचं झाल्यास, इक्विटी हा कंपनीच्या मालकाचा कंपनीत असलेला हिस्सा असतो किंवा गुंतवणूकदाराचा कंपनीत गुंतवलेला हिस्सा असतो.

उदाहरणार्थ, तुम्ही SBI बँकेचे 10 शेअर्स खरेदी केले आहेत आणि SBI चे एकूण 1,000 शेअर्स बाजारात आहेत. म्हणजे तुमचा SBI बँकेत 1% हिस्सा आहे किंवा तुमच्याकडे SBI बँकेचा 1% इक्विटी आहे. याचा सरळ अर्थ असा की तुम्ही SBI बँकेत एक टक्का मालक आहात.

Equity चे उदाहरण । Example of Equity in Marathi

इक्विटी म्हणजे कंपनीतील मालकी किंवा हिस्सेदारी. व्यवसाय सुरू करण्यासाठी मालकाद्वारे गुंतवला जाणारा पैसा म्हणजे इक्विटी.

उदाहरणार्थ, 5 मित्रांनी मिळून ₹ 10 कोटी रुपयांची कंपनी स्थापन केली. ज्यामध्ये या पाच मित्रांनी प्रत्येकी दोन कोटी रुपये गुंतवले. अशा प्रकारे प्रत्येक मित्राकडे कंपनीत 20% इक्विटी असते.

Equity आणि Debt यामधील फरक काय । Difference between Equity and Debt in Marathi

अनेक वेळा असे होते की प्रमोटर्सना कंपनी सुरू करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. कंपनी सुरु करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी इक्विटी व्यतिरिक्त जे कर्ज घेतले जाते त्यालाच Debt असे म्हणतात.

उदाहरण: मिस्टर आनंद यांनी एकूण ₹ 10 कोटींची कंपनी स्थापन केली. ज्यामध्ये आनंद यांनी स्वतःचे 7 कोटी रुपये गुंतवले आणि उरलेले 3 कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले.

अशा प्रकारे, मिस्टर आनंद यांच्या या कंपनीतील Equity 70% आणि 30% debt होते. जो पैसे प्रोमोटर्स द्वारे कंपनीत गुंतवला जातो त्याला इक्विटी कॅपिटल असे म्हणतात तर कर्जाच्या स्वरूपात घेतलेल्या पैशाला liability असे म्हणतात.

अशा प्रकारे, कंपनीची एकूण Equity आणि liability जोडल्यास एकूण मालमत्ता (Asset) मिळते. वरील उदाहरणात ₹7 कोटीची Equity आणि ₹3 कोटीची liability मिळून एकूण ₹10 कोटींची मालमत्ता (Asset) बनते.

शेयर होल्डर्स इक्विटी म्हणजे काय । Equity Shares meaning in Marathi

आता आपण शेअर्सच्या माध्यमातून इक्विटी म्हणजे काय ते समजून घेऊयात.

आपण असे गृहीत धरू कि दोन मित्रांनी प्रत्येकी 5-5 लाख रुपये गुंतवणूक करून 10 लाख रुपयांची एक कंपनी स्थापन केली. आता या कंपनीत दोन्ही मित्रांची   50%-50% इक्विटी असेल.

काही काळानंतर कंपनीला भविष्यातील वाढीसाठी 5 लाख रुपयांची गरज होती. या 5 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, कंपनीने IPO द्वारे 50% इक्विटी विकण्याचा निर्णय घेतला. कंपनीने आयपीओद्वारे एकूण 50,000 शेअर्स जारी केले. म्हणजे आता या दोन मित्रांचा कंपनीतील वाटा ५०% इतका कमी झाला आहे.

कंपनीने 50% हिस्सेदारीसाठी 50,000 शेअर्स जारी केले. तुम्ही या कंपनीचे 5,000 शेअर्स विकत घेतल्यास, या कंपनीमध्ये तुमची 1% इक्विटी असेल.

  ऍव्होकॅडो म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत | Avocado in Marathi

कोणत्याही कंपनीच्या प्रत्येक शेअरला इक्विटी शेअर असे म्हणतात. त्यामुळे इक्विटी आणि शेअरमध्ये कोणताही फरक नाही.

रिटर्न ऑन इक्विटी (ROE) म्हणजे काय? । Return on equity meaning in marathi

रिटर्न ऑन इक्विटी (ROE) हे कंपनीच्या आर्थिक कामगिरीचे मोजमाप आहे जे कंपनीचा नफा आणि गुंतवणूकदाराचा परतावा यांच्यातील संबंध दर्शवते. भागधारकांनी गुंतवलेल्या पैशातून कंपनी किती नफा कमावते आणि कंपनी आणि गुंतवणूकदारांसाठी व्यवसायात टाकलेल्या रोख रकमेचे रुपांतर करण्यात कंपनीचा व्यवस्थापन संघ किती यशस्वी होतो हे ROE स्पष्ट करते. ROE जितके जास्त असेल तितकेच कंपन्या अधिक कार्यक्षमतेने त्या निधीचा वापर करतात.

कमाईची पुनर्गुंतवणूक करून एखादी फर्म किती लवकर वाढू शकते हे ROE वरून निश्चित होते. जेव्हा एखादी कंपनी पैसे कमवते, तेव्हा ती फर्ममध्ये निधीची पुनर्गुंतवणूक करू शकते किंवा कमाईची रक्कम गुंतवणूकदारांना लाभांश म्हणून देऊ शकते. याव्यतिरिक्त, ROE कंपनीच्या प्रतिस्पर्ध्यांच्या नफ्याशी तुलना करण्यासाठी उपयुक्त आहे.

कोणत्याही कंपनीची इक्विटी कशी जाणून घ्यायची?

जर वर्षी प्रत्येक कंपन्या त्यांचा वार्षिक रिपोर्ट (Annual Report) सादर करतात. जर तुम्हाला एखाद्या कंपनीची इक्विटी माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या कम्पनीची बॅलन्स शीट चेक करावी लागेल. बॅलन्स शीट कंपन्या त्यांच्या Annual Report मध्ये देतात.

उदाहरणार्थ, जर कंपनीच्या Balance Sheet  नुसार, त्या कंपनीकडे 10 कोटींची  मालमत्ता (Assets) आणि 3 कोटींची Liabilities असतील, तर त्या कंपनीची Equity खाली दिलेल्या पद्धतीने काढता येईल,

Equity = Total Assets – Total Liabilities

Equity = 10 कोटी – 3 कोटी = 7 कोटी.

तुम्ही त्या कंपनीच्या एकूण Assets मधून एकूण Liabilities वजा करा म्हणजे तुम्हाला त्या कंपनीची Equity माहित होईल.

हे नक्की वाचा:
तुमचे विचार तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात
पैसे कमावण्याचे हे नियम लवकर शिकून घ्या
जे पाहिजे ते मिळेल, फक्त तुमच्या सबकॉन्शिअस मनाची शक्ती जाणून घ्या

कोणत्याही कंपनीत इक्विटी कोणाची असू शकते?

जर एखादी कंपनी शेअर बाजारात लिस्टेड असेल, तर साधारणपणे तिची इक्विटी दोन प्रकारच्या व्यक्तींकडे असू शकते. एक म्हणजे प्रमोटर्स आणि दुसरे म्हणजे शेअरहोल्डर्स

 1. प्रमोटर्स – कंपनीचे प्रमोटर्स म्हणजेच ज्यांनी कंपनीची स्थापना केली यांच्याकडे इक्विटी असू शकते.
 2. शेअरहोल्डर्स – शेअरहोल्डर्समध्ये पब्लिक, FII ( foreign institutional investors), DII (domestic institutional investors), म्युच्युअल फंड यांचा समावेश होतो.

इक्विटी फंड आणि डेब्ट फंड मधील फरक । Differece between Equity Fund and Debt Fund in Marathi

आता आपण इक्विटी फंड आणि डेब्ट फंड मधील फरक जाणून घेऊयात. या दोन्ही गोष्टी आपण गुंतवणुकीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या इक्विटीमध्ये गुंतवणूक केली तर याचा अर्थ असा कि तुम्ही त्या व्यवसायात पैसे गुंतवत आहात. त्या कंपनीचा व्यवसाय जसजसा वाढेल तसतसा तुमचे गुंतवलेले पैसेही वाढतील. तुमच्या शेअरच्या

किमतीत वाढ झाल्यामुळे तुमच्या गुंतवलेल्या पैश्यामध्येही वाढ होईल. इक्विटी फंडांमध्ये जोखमीची शक्यता खूप जास्त असते परंतु त्यामध्ये मिळणारा परतावा देखील जास्त असतो.

त्याचप्रमाणे तुम्ही डेब्ट फंडात (Debt Fund) गुंतवणूक केली तर तुम्हाला तेथे कोणतेही मालकी हक्क मिळत नाहीत. डेब्ट फंडामध्ये, तुम्हाला फक्त पूर्वनिर्धारित व्याज मिळेल. डेब्ट फंडामध्ये जोखीम कमी असते आणि परतावादेखील मर्यादित असतो.

इक्विटीमध्ये गुंतवणूक कशी करावी? । How to Invest in Equity in Marathi

आता पर्यंत आपण पाहिलं कि इक्विटी म्हणजे काय (Equity meaning in Marathi). आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की इक्विटीमध्ये गुंतवणूक कशी करावी?

 • इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे कंपनीचे शेअर्स खरेदी करणे. शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला स्टॉक ब्रोकरकडे डिमॅट खाते उघडावे लागेल.
 • डिमॅट खाते उघडल्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर्स सहज खरेदी आणि विक्री करू शकता.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी यासाठी तुम्ही आमचा लेख वाचू शकता.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी

कॅपिटल म्हणजे काय? । Capital meaning in Marathi

एखाद्या व्यवसायात मालकाकडून गुंतवलेल्या पैशांना किंवा भांडवलाला कॅपिटल असे म्हणतात.

कॅपिटल दोन भागात विभागले जाऊ शकते:

 1. स्थिर भांडवल (Fixed Capital):- कंपनीमध्ये मालमत्ता (Assetes) निर्माण करण्यासाठी गुंतवलेल्या रकमेला स्थिर भांडवल म्हणतात, जसे की प्लांट आणि मशिनरी खरेदी करणे, जमीन आणि इमारत खरेदी करणे.
 2. खेळते भांडवल (Working Capital):- व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजासाठी भांडवलाचा जो भाग वापरला जातो त्याला खेळते भांडवल म्हणतात.

इक्विटीचे प्रकार कोणते आहेत।Types of Equity in Marathi

आता आपण इक्विटीचे प्रकार जाणून घेऊयात. स्टॉक मार्केटमध्ये अनेक कंपन्या लिस्टेड आहेत, आता प्रत्येक कंपनी निश्चित इक्विटी शेअरची यादी सादर करते आणि प्रत्येक शेअरचे स्वतःचे मूल्य असते, ज्याच्या आधारावर प्रत्येक कंपनीचे बाजार भांडवल मोजले जाते.

या मार्केट कॅपवर आधारित, तीन प्रकारच्या कंपन्या आणि त्यांचे इक्विटी शेअर्स आहेत:

  रोझमेरी म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत | Rosemary In Marathi

1. लार्ज कॅप इक्विटी शेअर्स

ज्या कंपनीची मार्केट कॅप 20000 कोटींपेक्षा जास्त आहे तिला लार्ज कॅप कंपनी आणि तिच्या लिस्टेड शेअर्सला लार्ज कॅप इक्विटी शेअर्स म्हणतात.

Infosys, SBI, HDFC सारख्या भारतातील सुप्रसिद्ध कंपन्या लार्ज कॅप इक्विटी शेअर्सचा भाग आहेत.

अशा कंपनीत गुंतवणुकीची जोखीम कमी असते आणि त्यामुळे गुंतवणूकदार अशा कंपनीत गुंतवणूक करून कमी परंतु स्थिर परताव्याची अपेक्षा करू शकतो.

2. मिड कॅप इक्विटी शेअर्स

बाजार भांडवलाच्या आधारावर, जर एखाद्या कंपनीचे मार्केट कॅप रु 5000 Cr-20000 Cr च्या श्रेणीत असेल, तर त्या कंपनीचे शेअर्स मिड-कॅप मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये येतात.

आता ही कंपनी लार्ज-कॅप बनण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याने, या कंपनीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मध्यम जोखीम आणि अधिक परताव्याची अपेक्षा करू शकता.

3. स्मॉल कॅप इक्विटी शेअर्स

5000 कोटींपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्या कंपन्या स्मॉल कॅप इक्विटी शेअर्समध्ये ठेवल्या जातात, या प्रकारच्या श्रेणीमध्ये मुख्यतः अशा स्टार्ट-अप्सचा समावेश होतो ज्यांनी कमी कालावधीत कामगिरी दाखवली आहे.

आता या कंपन्या प्रगतीच्या आणि विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते, परंतु परताव्याच्या बाबतीत, जर तुम्ही योग्य कंपनी निवडली आणि त्यात गुंतवणूक केली तर अधिक परताव्याची अपेक्षा करू शकता.

इक्विटी मध्ये असलेल्या जोखीम:

जेव्हा तुम्ही शेअर बाजारात आणि विशेषत: इक्विटी विभागात गुंतवणूक करता तेव्हा विविध प्रकारच्या जोखमी असतात. त्यापैकी काही जोखीम तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या कंपन्यांवर अवलंबून असू शकतात:

 • तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या शेअरच्या किमतीत घट होण्याचा धोका.
 • जेव्हा तुम्ही विशिष्ट शेअर्समध्ये नियमित लाभांशाच्या अपेक्षेने गुंतवणूक करता आणि कंपनी त्यांना देणे थांबवते किंवा त्यांची किंमत कमी करते तेव्हा तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी परतावा मिळतो.
 • कंपनीमध्ये आढळलेल्या कोणत्याही संभाव्य फसवणुकीचा धोका उघडकीस येणे किंवा कंपनी बंद केली जात आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला लॉस होऊ शकतो.

त्याचप्रमाणे, खालील काही विशिष्ट घटक आहेत ज्यांच्यावर हे इक्विटी जोखीमअवलंबून असतात:

 • बाजारातील अस्थिरता
 • जागतिक घटक
 • कंपनी व्यवस्थापन स्थिरता.
 • उद्योगांमधील नवीन ट्रेंड
 • आंतर-उद्योग गतिशीलता

निष्कर्ष: [Equity Meaning in Marathi]

मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती मिळवून योग्य पद्धतीने गुंतवणूक केली, तर शेअर बाजारातील नुकसान होण्याची शक्यता खूप कमी होते. म्हणूनच सुरुवातीला प्रत्येक लहान मूलभूत गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्याव्यात.

आज या लेखात आपण इक्विटी म्हणजे काय (Equity meaning in Marathi) याबद्दलची संपूर्ण माहिती पहिली. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तो सोशल मीडिया नेटवर्कवर नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न किंवा सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे सांगू शकता.

FAQ: [Equity Meaning in Marathi]

शेअर मार्केटमध्ये इक्विटी म्हणजे काय?

इक्विटी हा कंपनीच्या मालकाचा कंपनीत असलेला हिस्सा असतो किंवा गुंतवणूकदाराचा कंपनीत गुंतवलेला हिस्सा असतो. एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून तुम्ही त्या कंपनीमध्ये भागीदार होऊ शकता.

रिटर्न ऑन इक्विटी (ROE) म्हणजे काय?

रिटर्न ऑन इक्विटी (ROE) हे कंपनीच्या आर्थिक कामगिरीचे मोजमाप आहे जे कंपनीचा नफा आणि गुंतवणूकदाराचा परतावा यांच्यातील संबंध दर्शवते. भागधारकांनी गुंतवलेल्या पैशातून कंपनी किती नफा कमावते आणि कंपनी आणि गुंतवणूकदारांसाठी व्यवसायात टाकलेल्या रोख रकमेचे रुपांतर करण्यात कंपनीचा व्यवस्थापन संघ किती यशस्वी होतो हे ROE स्पष्ट करते.

शेअर्सचे प्रकार काय आहेत?

शेअर्स हे प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात ज्यात इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर आणि डीव्हीआर शेअर यांचा समावेश होतो.

इक्विटी ट्रेडिंग म्हणजे काय?

इक्विटी ट्रेडिंग म्हणजे प्रामुख्याने शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करणे.

इक्विटी आणि शेअर्स वेगळे आहेत का?

नाही, हे दोन्ही टर्म्स समान आहेत.

इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड जे त्यांचे पैसे थेट शेअर बाजारातील समभागांमध्ये गुंतवतात ते इक्विटी म्युच्युअल फंड आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *