DMLT म्हणजे काय? पात्रता, फीस, पगार किती? । DMLT Course Information in Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण पाहणार आहोत DMLT Course Information in Marathi

आजच्या काळात नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. म्हणूनच अनेक विध्यर्थी सामान्य पदवी घेण्यापेक्षा व्यावसायिक पदवी (Professional Degree) घेण्यात अधिक इंटरेस्टेड आहेत. कारण व्यावसायिक शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. व्यावसायिक अभ्यासक्रम जर वैद्यकीय क्षेत्रात असेल तर उत्तमच.

अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असते, मात्र डॉक्टर होऊनच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असते असे नाही, या व्यतिरिक्तही अनेक कोर्सेस आणि पर्याय उपलब्ध आहेत ज्याद्वारे वैद्यकीय क्षेत्रात सहज करिअर करता येते.

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या क्षेत्रांची वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम करण्याची आवड वाढत आहे. आजच्या या लेखात, मी तुम्हाला मेडिकल क्षेत्राशी संबंधित DMLT या कोर्सची संपूर्ण माहिती मराठी मध्ये देणार आहे.

जर तुम्हालाहि DMLT हा कोर्स करायचा असेल तर हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा. या लेखात DMLT संबंधित असलेल्या तुमच्या सर्व शंका दूर होतील. तर या लेखात आपण पाहणार आहोत कि DMLT कोर्स म्हणजे काय? DMLT कोर्स किती वर्षांचा आहे? DMLTकोर्स करण्यासाठी पात्रता काय असते? DMLT कोर्सचा सिलॅबस काय आहे? DMLT कोर्स पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं?

वैद्यकीय क्षेत्रात प्रयोगशाळेला (Laboratory) खूप महत्व आहे. आजच्या काळात लॅब टेस्टिंग हे वैद्यकीय क्षेत्रातील खूप महत्वाचं क्षेत्र बनलं आहे. कारण कोणताही आजार जाणून घेण्यासाठी डॉक्टर पेशंटला वेगवेळ्या तपासण्या करण्यास सांगतात. रक्त तपासणी, लघवी तपासणी, थुंकी तपासणी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या जातात.

अशा सर्व तपासण्या या प्रयोगशाळेत किंवा लॅब मध्ये केल्या जातात. या तपासण्या प्रयोगशाळेत टेक्निशियन्स करतात. तर असे टेक्निशियन्स बनण्यासाठी DMLT हा कोर्स करावा लागतो. तर या लेखात आपण तेच पाहणार आहोत कि DMLT कोर्स करून लॅब टेक्निशियन कसं बनायचं.

Table of Contents

DMLT चा फुलफॉर्म काय आहे? । What is Full Form of DMLT Course in Marathi?

DMLT चा फुलफॉर्म काय आहे हे अनेक विध्यार्थ्याना माहित नसते त्यामुळे आधी आपण जाणून घेऊयात कि DMLT चा फुलफॉर्म काय आहे. DMLT फुलफॉर्म “डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी” असा आहे.

English: – Diploma in Medical Laboratory Technology

मराठी:- डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी

DMLT कोर्स म्हणजे का? । What is DMLT Course in Marathi?

DMLT म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. हा कोर्स वैद्यकीय क्षेत्रातील डिप्लोमा कोर्स आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डीएमएलटी कोर्स हा लॅब टेक्निशियन होण्यासाठी असलेला डिप्लोमा कोर्स आहे.

DMLT या कोर्समध्ये तुम्हाला विविध वैद्यकीय उपकरणांद्वारे रोगांचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेतील रक्त तपासणी, लघवी चाचणी अशा अनेक चाचण्या कशा करायचे हे शिकवले जाते.

तसेच या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्याला वैद्यकीय प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्‍या विविध उपकरणांची ओळख करून दिली जाते. प्रयोग करणे, डॉक्टरांच्या निर्देशानुसार तपासणी करणे, उपकरणांची योग्य काळजी घेणे इ.

DMLT कोर्स पूर्ण केल्यानंतर, हॉस्पिटलच्या अनुभवासाठी 6 महिन्यांच्या इंटर्नशिप प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्यामुळे रुग्णाची तपासणी करण्याचा अनुभव विद्यार्थ्याना मिळतो.

DMLT कोर्स करण्यासाठी पात्रता काय? । Qualification for doing DMLT Course in Marathi

  • DMLT कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम Physics, Chemistry, Biology या विषयांसह बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • अशी काही महाविद्यालये आहेत जी Physics, Chemistry, Biology किंवा Mathematics या विषयांमध्येहि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डीएमएलटी अभ्यासक्रमासाठी पात्र मानतात.
  • परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला बारावीत Physics, Chemistry, Biology या विषयांमध्ये किमान 55% ते 60% गुण असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही DMLT कोर्समध्ये प्रवेश परीक्षेद्वारे (Entrance Exam) किंवा केवळ 12वी वर्गात मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश घेऊ शकता.
  CCC कोर्सची संपूर्ण माहिती । CCC Course Information in Marathi

DMLT कोर्स किती वर्षांचा आहे? । DMLT Course Duration in Marathi

DMLT कोर्स पूर्ण करण्यासाठी एकूण 2.5 वर्षे लागतात. त्यापैकी 2 वर्षे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आहेत. शेवटी हॉस्पिटलमधील अनुभवासाठी इंटर्नशिपचे प्रशिक्षण 6 महिने करावे लागते.

इंटर्नशिप प्रशिक्षणाद्वारे, विध्यार्थाना रुग्णांना आणि वैद्यकीय प्रयोगशाळेतील उपकरणांना हाताळण्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रयोगशाळेत काम करण्याचा अनुभव येतो.

काही कॉलेजेसमध्ये DMLT कोर्सला ऍडमिशन देण्यासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेतली जाते. बारावीनंतर जर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागत असेल तर, त्याच्या तयारीला थोडा वेळ लागतो. ती वेळ वर दिलेल्या वेळेत जोडलेली नाही.

तुम्हाला माहिती आहेच की प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम बारावीपर्यंतच्या विज्ञान विषयावर आधारित असतो. म्हणूनच काही विद्यार्थी प्रवेश परीक्षेचा वेळ वाचवण्यासाठी 11वी आणि 12वी दरम्यान प्रवेश परीक्षेची चांगली तयारी करतात.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, हा अभ्यासक्रम 2.5 वर्षे ते 3 वर्षांपर्यंत करता येतो. ज्यामध्ये प्रवेश परीक्षेच्या तयारीपासून इंटर्नशिपपर्यंतचा समावेश आहे.

DMLT कोर्सची फीस किती असते। DMLT Course Fees in Marathi

डीएमएलटी किंवा लॅब टेक्निशियन या कोर्सची फी प्रत्येक सरकारी कॉलेज आणि खासगी कॉलेजसाठी वेगळी असू शकते. खासगी कॉलेजच्या तुलनेत सरकारी कॉलेजमध्ये फी खूपच कमी असते.

खासगी कॉलेजमध्ये डीएमएलटी कोर्सची वार्षिक फीस 40 हजार ते 60 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. तर सरकारी महाविद्यालयाची फीस वार्षिक 30,000 पेक्षा कमी असू शकते.

सर्व महाविद्यालयांसाठी कोर्सची फीस वेगवेगळी असू शकते, तुम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयात जाऊन तुम्ही फीस बद्दलची चौकशी करू शकता. दरवर्षी महाविद्यालयांकडून ही फीस कमी जास्त केली जाते.

हे नक्की वाचा:
1. एमबीए कोर्सची संपूर्ण माहिती
2. बीसीए कोर्सची संपूर्ण माहिती
3. बीटेक ची संपूर्ण माहिती
4. MSW कोर्सची संपूर्ण माहिती
5. एएनएम नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती
6. जीएनएम नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती

DMLT कोर्ससाठी प्रवेश आणि अर्ज प्रक्रिया । Admission and Application Process for DMLT Course in Marathi

DMLT कोर्ससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेद्वारे (Entrance Exam) किंवा बारावीमध्ये सर्वाधिक गुणांच्या आधारे अशा दोन प्रकारे प्रवेश घेता येईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या निवडलेल्या कॉलेजची प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण करावी लागेल तरच तुमच्या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला प्रवेश दिला जाईल.

दुसरीकडे, जर तुम्हाला १२वीमध्ये सर्वाधिक गुणांच्या आधारे डीएमएलटी अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल, तर तुम्हाला १२वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांमध्ये किमान ६०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवावे लागतील. कारण काही महाविद्यालये बारावीत सर्वाधिक गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार करतात, त्याच मेरिट लिस्टद्वारे विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जातो.

DMLT कोर्ससाठी अर्ज प्रक्रिया

  1. DMLT कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या निवडलेल्या कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  2. वेबसाइटला भेट दिल्यानंतर Apply Online किंवा Apply Now वर क्लिक करा, New Registration वर क्लिक करा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
  3. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला आयडी आणि पासवर्ड मिळेल, तो आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  4. लॉगिन केल्यानंतर नाव, पत्ता, शैक्षणिक डिटेल्स इत्यादी टाका.
  5. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा. आणि सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्ही त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवू शकता.
  7. आता वेळोवेळी वेबसाइटला भेट देत राहा, तिथे तुम्हाला प्रवेश परीक्षेशी संबंधित सर्व माहिती मिळेल.

जर तुम्हाला ऑफलाइन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या कागदपत्रांसह थेट कॉलेजमध्ये जाऊन तो भरू शकता.

DMLT कोर्स नंतर काय करावे?

डीएमएलटी कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही पुढील शिक्षण सुरू ठेवू शकता किंवा नोकरीही करू शकता. जर तुम्हाला पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही BMLT  (Bachelor in Medical Laboratory Technology) कोर्स करू शकता किंवा तुम्ही BSc MLT कोर्स देखील करू शकता.

डीएमएलटी कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरी करायची असेल, तर तुम्ही सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होममध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करू शकता. किंवा तुम्ही स्वतःचे डायग्नोसिस सेंटर उघडून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

  SAP म्हणजे काय? याचा वापर कुठे केला जातो? | SAP Course Information in Marathi

DMLT कोर्स केल्यानंतर नोकरीची क्षेत्रे कोणती आहेत?

  1. सरकारी रुग्णालय
  2. आर्मी मेडिकल हॉस्पिटल
  3. खाजगी रुग्णालय
  4. पॅथॉलॉजी प्रयोगशाळा
  5. खाजगी दवाखाना
  6. खाजगी प्रयोगशाळा
  7. रक्तदान केंद्र
  8. शिक्षण संस्था

या व्यतिरिक्त, असे अनेक विभाग आहेत जे DMLT डिप्लोमा धारकांना नोकरी देतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार नोकरीचे क्षेत्र निवडू शकता.

DMLT कोर्स पूर्ण केल्यावर कोणती नोकरी करता येते

  1. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन)
  2. प्रयोगशाळा व्यवस्थापक (लॅबोरेटरी मॅनेजर)
  3. आरोग्य आणि सुरक्षा अधिकारी (हेल्थ अँड सेफ्टी ऑफिसर)
  4. पर्यवेक्षक (सुपरवाइजर)
  5. सल्लागार (कंसल्टेंट)
  6. शिक्षक

DMLT कोर्स केल्यानंतर पगार किती मिळतो । Salary after DMLT Course in Marathi

DMLT अभ्यासक्रमानंतरचा पगार तुमच्या अनुभवावर आणि नोकरीवर अवलंबून असतो. तरीही या क्षेत्रात सुरुवातीचा पगार 20 हजार ते 30 हजारांपर्यंत आहे. जसजसा अनुभव वाढत जाईल तसतसा तुमचा पगार 35 हजारांवरून 45 हजारांपर्यंत वाढू शकतो.

DMLT Course Exam Syllabus

1st Year Exam Syllabus

Paper – I
पॅथॉलॉजि :-

  • Clinical Pathology
  • Hematology

Paper – II
सूक्ष्म जीव विज्ञान :-

  • General Bacteriology
  • Systemic Bacteriology
  • Immunology and Serology

Paper – III
बायोकेमिस्ट्री (Biochemistry)

2st Year Exam Syllabus

Paper – I
पैथोलॉजी :-

  • Histopathology
  • Cytopathology
  • Blood Banking

Paper – II
माइक्रोबायोलॉजी :-

  • Paratology
  • Clinical Microbiology
  • Immunology and Serology
  • Mycology
  • Animal Care
  • Virology

Paper – III
बायोकेमिस्ट्री (Biochemistry

सारांश:

डीएमएलटी कोर्स कसा करायचा । How to do DMLT Course in Marathi

  • जर तुम्हाला DMLT कोर्स करून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुम्ही प्रथम Physics, Chemistry  आणि Biology या विषयांसह किमान 55% ते 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • DMLT करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीचे महाविद्यालय निवडावे लागेल, एकतर तुम्ही महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश घेऊ शकता किंवा सर्वाधिक 12वी गुणांच्या मेरिट लिस्टच्या आधारे प्रवेश घेऊ शकता.
  • प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला २ वर्षे मेहनत करून अभ्यास करावा लागेल. जेणेकरून तुम्ही या परीक्षेत सहज उत्तीर्ण होऊ शकता. तुम्ही हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यास, तुम्हाला त्याची पदवी दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला सहा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजीमध्ये नोकरी मिळू शकते. यामध्ये तुम्हाला करिअरचे अनेक पर्याय मिळतात, जसे की तुम्ही कोणत्याही पॅथॉलॉजी किंवा हॉस्पिटल आणि हेल्थकेअर सेंटरमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करू शकता.
  • याशिवाय तुम्ही कॉलेज आणि रिसर्च सेंटरमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तसेच, तुम्हाला सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.

FAQ: DMLT अभ्यासक्रमाशी संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न

DMLT चा फुल फॉर्म काय आहे?

DMLT चा फुल फॉर्म Bachelor in Medical Laboratory Technology आहे.

DMLT नंतर कोणता कोर्स करायचा?

DMLT नंतर, तुम्ही BMLT कोर्स करू शकता म्हणजेच Bachelor in Medical Laboratory Technology किंवा तुम्ही बीएससी एमएलटी कोर्स देखील करू शकता.

DMLT अभ्यासक्रम किती वर्षांचा आहे?

DMLT कोर्स हा 2 वर्षांचा कोर्स आहे. त्यानंतर सहा महिन्यासाठी इंटर्नशिप करावी लागते.

DMLT कोर्सची फी किती आहे?

खाजगी महाविद्यालयांमध्ये या DMLT अभ्यासक्रमाची फी 30 हजार ते 60 हजार पर्यंत असू शकते. तसेच जर तुम्ही हा कोर्स सरकारी महाविद्यालयातून केला तर त्याची फी 30 हजार पेक्षा कमी असू शकते असू शकते.

DMLT कोर्स करण्यासाठी पात्रता काय लागते?

DMLT कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम Physics, Chemistry, Biology या विषयांसह बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *