chia seeds in marathi

चिया सिडला मराठीत काय म्हणतात | Chia Seeds in Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण पाहणार आहोत Chia Seeds in Marathi.

जर तुम्हीही हेल्थ कॉन्शिअस म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत जागरूक असाल तर कधी ना कधी चिया सीड हे नाव नक्की ऐकले असेल. खरंतर चिया सीड्सचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे तुम्ही त्याचा आहारात नक्की समावेश करायला पाहिजे.

यामध्ये प्रोटिन्स, फायबर आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. चिया सिड्सचा सर्वात जास्त वापर हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी केला जातो. त्याबरोबरच चिया सीड्स हे अनेक आजारांना आपल्या शरीरापासून दूर ठेवतात.

तर, आज आपण चिया सीडबद्दल जाणून घेणार आहोत, चिया सीड्सला मराठीत काय म्हणतात (Chia Seeds in Marathi) आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? हे पाहणार आहोत.

चिया सिडला मराठीत काय म्हणतात । Chia Seeds in Marathi

हेल्दी फूड्सबद्दल बोलायचे झाले तर चिया सीड्सचे नाव नक्कीच येते. चिया सीड्स हे वजन कमी करण्यासाठी लोकप्रिय खाद्य आहे जे विविध वजन कमी करणारे पेय आणि स्मूदी, सॅलड इत्यादींमध्ये वापरले जाते.

चिया सिड्सला मराठीत “सब्जा” म्हणतात. (Chia Seeds is called “Sabja” in Marathi )

चिया सीड्स हे दिसायला लहान असतात परंतु त्यात अनेक उत्तम गुण असतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचे किंवा चियाच्या बियांचे सेवन करतात. चिया सीड्स मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सच्या नकारात्मक प्रभावापासून वाचवण्याचे काम करतात. त्यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होणे थांबते.

चिया सीड्स पोटाचे आरोग्यही चांगले ठेवतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर नियंत्र ठेवतात. चिया सिड्समुळे अन्न पचन सुधारण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट खांद्यांच्या श्रेणीमध्ये चिया सिड्सचा समावेश करण्यात आला आहे.

यासोबतच हाडे मजबूत करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी चिया सीड्सचे आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो कि चिया सीड्सचे जसे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे काही दुष्परिमाण सुद्धा आहेत.

चला तर मग या लेखात आपण चिया सीड्सचे फायदे, चिया सीड्सचे नुकसान, चिया सिड्समधील पोषक घटक, चिया सीड्स कसे खायचे, याबद्दलची सविस्तर माहिती पाहुयात.

चिया सीड्स कसे दिसतात । How Chia Seeds looks in Marathi

चिया सीड्स किंवा चियाचे बी हे काळ्या रंगाच्या तिळाच्या आकाराचे असतात आणि त्यांची चव काही एवढी खास नसते. चिया नावाच्या फुलांच्या वनस्पतीपासून या बिया मिळतात. म्हणजेच ते चिया फुलाचे बी आहेत.

  ऍपल सायडर व्हिनेगर म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत। Apple Cider Vinegar in Marathi
chia-seeds-marathi

हे मुख्यतः वजन कमी करण्याच्या पेयांमध्ये वापरले जाते. अनेक वेळा तुम्ही हे खाल्लं असेल. जर कधी तुम्ही स्मूदी किंवा सॅलड खाल्लं असेल किंवा तुम्ही कधी फालूदा खाल्ला असेल, तर फालूदामधील जे छोटे काळे दाणे असतात ते चिया सिड्सचं असतात. जगात त्याची सर्वाधिक लागवड अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये होते.

चिया सिड्समध्ये कोणते पोषक घटक असतात । Chia Seeds Nutrition Facts in Marathi

चिया सिड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् आणि ‘इतर बायोएक्टिव्ह न्यूट्रिशनल कंपाऊंड्स’ असतात तसेच चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.

संशोधन अभ्यासातून असे दिसून आले आहे की या सुपरफूडमध्ये जीवनसत्त्वे सी, ई, नियासिन, थियामिन, अँटिऑक्सिडंट्स, राइबोफ्लेविन (Vitamin C, E, niacin, thiamine, anti-oxidants, riboflavin, and minerals) असतात जी मानवी आरोग्यासाठी आवश्यक असतात.

चिया सिड्समधील पोषक घटक । Chia Seeds Nutrition Facts in Marathi

चिया सिड्समध्ये भरपूर पोषक घटक असतात. एका वेळच्या सर्विंगमध्ये सरासरी 28 ग्रॅम इतके चिया सीड्स वापरले जातात.

त्यामुळे आपण सरासरी 28 ग्रॅम इतक्या चिया सिड्समध्ये किती पोषक घटक असतात ते पाहुयात.

पोषक घटक
(28 ग्रॅम चिया सिड्समध्ये)
प्रमाण
कॅलरीज138 ग्रॅम
प्रोटीन4.7 ग्रॅम
फॅट्स8.7 ग्रॅम
कार्बोहाइड्रेट12 ग्रॅम
फायबर9.8 ग्रॅम

चिया सीड्सचे फायदे | Benefits of Chia Seeds in Marathi | Sabja Seeds Benefits in Marathi

चिया सीड्सचे अनेक फायदे आहेत. हे ओमेगा 3, प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

1. वजन कमी करण्यात मदत | Weight Loss Chia Seeds in Marathi

चिया सिड्सचा मुख्य फायदा म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रोटिन्स आणि फायबर आढळतात, जे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात.

2. हाडे मजबूत करतात

चिया सीड्स मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम आढळतात, जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे हाडांचे आरोग्य आणि घनता सुधारते.

3. अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत

चिया सीड्सचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला कर्करोगासारख्या जुनाट आजारांशी लढण्यास मदत होते आणि अकाली वृद्धत्व टाळता येते.

4. ओमेगा 3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध

हे एक शाकाहारी अन्न आहे जे ओमेगा 3 मध्ये समृद्ध आहे जे नैराश्य, चिंता, मेंदूचे आरोग्य, डोळ्यांचे आरोग्य वाढवण्यास आणि झोपेच्या समस्यांशी लढण्यास मदत करते.

5. बद्धकोष्ठता पासून आराम

या बिया पाण्याच्या संपर्कात येताच जेली मध्ये बदलतात आणि त्यांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते.

चिया सीड्सचे दुष्परिणाम |  Side Effects of Chia Seeds in Hindi

  1. चिया सीड्सचे सेवन केल्याने काही लोकांमध्ये काही दुष्परिणाम होऊ शकतात, विशेषत: जेव्हा वजन कमी करण्यासाठी ते अति प्रमाणात सेवन केले जातात किंवा एखाद्याला विशिष्ट पदार्थांची ऍलर्जी असते तेव्हा चिया सीड्स चे साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. चला तर मग चिया सीड्सचे नुकसान किंवा दुष्परिणाम काय आहेत ते जाणून घेऊयात.
  2. चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते जे तुमच्या पोटासाठी आणि पचनासाठी फायदेशीर आहे. परंतु अति प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने सूज येणे, उलट्या होणे आणि जुलाब होणे असे दुष्परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात सेवन करा. चिया सीड्स  दिवसातून दोनदा तेही 20 ग्रॅम किंवा सुमारे 1.5 चमचे एवढे खाणे चांगले आहे. त्यापेक्षा जास्त खाल्यास साईड इफेक्ट्स जाणवू शकतात.
  3. काही लोकांना चिया सीड्स खाल्ल्यानंतर सूज येणे, डोकेदुखी आणि खाज येणे यासारख्या ऍलर्जीचा अनुभव येतो. अशा लोकांनी चिया सीड्स खाणे टाळावे आणि डॉक्टर सल्ला घेऊन खाल्लेलं बरे.
  4. मधुमेहाच्या रुग्णांनी (Diabetic patients) योग्य प्रमाणात चिया सीड्सचे सेवन करावे. चिया सिड्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असते त्यामुळे त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  5. चिया बियांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मधुमेह आणि रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या काही औषधांशी रिऍक्शन होऊ शकते. म्हणूनच चिया बियांचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे. अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच चिया सीड्सचे सेवन करावे.
  सॅलमन फिश म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत । Salmon Fish in Marathi

हे नक्की वाचा:
क्विनोवा म्हणजे काय? त्याचे फायदे आणि नुकसान | Quinoa in Marathi
केल म्हणजे काय? उपयोग, फायदे आणि तोटे। Kale in Marathi
ब्लूबेरी म्हणजे काय? उपयोग, फायदे आणि नुकसान । Blueberry in Marathi

चिया सीड्स कसे खावे । How to Eat Chia Seeds in Marathi

  • वजन कमी करण्याच्या आहारात चिया सीड्सचा समावेश करण्यासाठी, तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे खाऊ आणि पिऊ शकता. या बियांची चव सौम्य आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही डिश किंवा रेसिपीचा भाग बनवण्यापूर्वी जास्त विचार करण्याची गरज नाही.
  • चिया सीड्स पाण्यात मिसळूनही प्यायल्या जाऊ शकतात. यासाठी काही चिया सीड्स एक ग्लास पाण्यात भिजवा. हे पाणी (चिया सीड्स वॉटर) सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. चिया बिया किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा म्हणजे ते खाण्यायोग्य होईल.
  • जर तुम्हाला चिया सीड्सचे पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही ते स्मूदी किंवा सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. बर्‍याच लोकांना पॅनकेक्स आणि पुडिंगमध्ये चिया सीड्स घालून खायलाही आवडते.
  • दुधात चिया सीड्स मिसळून पेय बनवता येते. याशिवाय चिया सीड्स दह्यासोबत खायलाही उत्तम असतात.
  • सफरचंद, केळी किंवा आंबा यांसारखी फळे कापून त्यात चिया बिया टाकून खाऊ शकतात. हे उत्तम टॉपिंग म्हणून काम करते.

Disclaimer

Chia Seeds in Marathi: चिया सिड्सबद्दल ची या लेखातील माहिती हि इंटरनेटवरील संदर्भ घेऊन लिहिण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ लोकांचा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. इंस्टामराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

9 thoughts on “चिया सिडला मराठीत काय म्हणतात | Chia Seeds in Marathi”

  1. Pingback: रोझमेरी म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत | Rosemary In Marathi

  2. Pingback: चिलगोजा म्हणजे काय त्याचे फायदे काय आहेत? | Chilgoza in Marathi

  3. Pingback: केल म्हणजे काय? उपयोग, फायदे आणि तोटे। Kale in Marathi

  4. Pingback: ब्लूबेरी म्हणजे काय? उपयोग, फायदे आणि नुकसान । Blueberry in Marathi

  5. Pingback: टूना फिश खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? | Tuna Fish in Marathi Information

  6. Pingback: तुमचा रक्त गट हा A पॉजिटीव्ह का आहे | A Positive Blood Group Information in Marathi

  7. Pingback: पॉलीस्टर फायबर म्हणजे काय | Polyster Fibre in Marathi

  8. Pingback: फ्लॅक्ससीड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत | Flax Seeds in Marathi

  9. Dinesh Rakhame

    khupch mahtv purn mahiti milali tyacha mla majhya arogyasathi khup fyda hoil khup khup dhanyawad aple

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *