bcs course information in marathi

BCS कोर्सची संपूर्ण माहिती । BCS Course Information in Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण पाहणार आहोत BCS Course Information in Marathi.

इंटरनेट आणि डिजिटलायझेशनमुळे आज प्रत्येक क्षेत्रात कॉम्पुटरचा वापर होत आहे. जगात सर्वत्र आणि कोणत्याही क्षेत्रात कॉम्पुटर वापरला जात आहे.

ही वाढती संधी पाहून अनेक विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचा कोर्स करून सॉफ्टवेअर इंजिनीअर किंवा संगणक अभियंता व्हायचे आहे. जर तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक असाल ज्यांना BCS कोर्स करून आपले भविष्य घडवायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

कारण, आज आपण BCS कोर्सबद्दल चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्हाला टप्प्याटप्प्याने कळेल, BCS कोर्स म्हणजे काय, प्रवेश प्रक्रिया काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, कोर्सची फी किती आहे, कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि पगार किती असेल वगैरे वगैरे.

जर तुम्ही नुकतेच बारावी पूर्ण केले असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी पर्याय ठरू शकतो, परंतु तुम्ही कोणत्या विषयातून बारावी उत्तीर्ण झाला आहात, हे अधिक महत्त्वाचे ठरेल. कारण अनेक विद्यापीठे सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांना बीसीएस कोर्स करू देत नाहीत, म्हणूनच काही विषयांवर तुम्ही बीसीएस कोर्स करू शकता, चला जाणून घेऊया बीसीएस कोर्स म्हणजे काय?

BCS कोर्स म्हणजे काय । BCS Course Information in Marathi

बीसीएस हा कॉम्पुटरशी संबंधित अभ्यासक्रम आहे ज्याचा फुल फॉर्म बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स आहे, या कोर्सच्या मदतीने तुम्ही तुमचे ज्ञान वाढवू शकता, या  कोर्समध्ये तुम्हाला हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवले जातात.

बारावीनंतर पुढील शिक्षण कॉम्प्युटरच्या क्षेत्रात पूर्ण करण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जात आहे. काही काळापूर्वीपर्यंत लोकांना या अभ्यासक्रमाची माहितीही नव्हती, मात्र हळूहळू हा अभ्यासक्रम प्रसिद्ध होत आहे.

यामध्ये शिकवले जाणारे विषय म्हणजे यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वेब डिझायनिंग जसे की HTML, CSS, JavaScript तसेच इतर लँग्वेजस आणि कॉम्पुटरचे ज्ञान दिले जाईल, ज्यामुळे तुम्ही हा कोर्स केल्यावर तुम्हाला आयटी क्षेत्रात नोकरी मिळण्यास मदत होते.

BCS चा फुलफॉर्म काय आहे । BCS Full Form in Marathi

BCS चा फुलफॉर्म बॅचलर ऑफ कॉम्पुटर सायन्स (Bachelor of Computer Science) आहे.

बीसीएस कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत । Eligibility for BCS Course in Marathi

  • बीसीएस कोर्ससाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. आवश्यक पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत:
  • BCS कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी अर्जदारांनी 12 वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
  • BCS कोर्ससाठी पात्र होण्यासाठी किमान ५०% गुणांसह कोणत्याही नामांकित बोर्डातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • दहावीनंतर 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण झालेले उमेदवारही या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.
  • काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) ठेवली जाते. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याच्या मेरीटच्या आधारावरच तुम्हाला महाविद्यालयात प्रवेश मिळतो, परंतु बहुतेक सर्व महाविद्यालयांमध्ये असे होत नाही. बारावीच्या मार्कांच्या आधारावरच प्रवेश दिला जातो.
  • BCS कोर्ससाठी वयोमर्यादा ठरवलेली नाही त्यामुळे कोणतीही व्यक्ती या कोर्ससाठी अर्ज करू शकते.
  बी.फार्मसी बद्दल संपूर्ण माहिती । B Pharmacy Information In Marathi

बीसीएस कोर्सची फी किती आहे | Fees For BCS Course in Marathi

BCS अभ्यासक्रमाची फी विद्यार्थ्याला ज्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे त्यावर अवलंबून असते. सरकारी महाविद्यालयांच्या तुलनेत खाजगी महाविद्यालयांची फी जास्त आहे.

महाविद्यालय किंवा विद्यापीठाद्वारे प्रदान केलेल्या पायाभूत सोयी आणि सुविधांवर अवलंबून बीसीएस अभ्यासक्रमाची फी दरवर्षी सुमारे 40000 ते 1 लाखांपर्यंत असू शकते.

बीसीए कोर्स किती वर्षांचा आहे । Duration of BCS Course in Marathi

  • बीसीए हा कोर्स सुमारे 3 वर्षांचा आहे आणि हा कोर्स 3 वर्षात पूर्ण होतो.
  • यामध्ये सेमिस्टर पद्धत असते, तीन वर्षात एकूण 6 सेमिस्टर असतात.
  • प्रत्येक वर्षी तुम्हाला 2 सेमिस्टरचे पेपर द्यावे लागतील, दोन्ही सेमिस्टर मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढील सेमिस्टरमध्ये प्रवेश मिळेल.
  • प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळे विषय शिकवले जातात आणि सेमिस्टरच्या शेवटी तुम्हाला त्या विषयावर आधारित परीक्षा द्यावी लागते.

BCS कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया कशी आहे? Admission Process for BCS Course in Marathi

  • बीसीएस कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया साधारणपणे विद्यार्थ्याने बारावीमध्ये मिळवलेल्या गुणवत्तेवर आधारित असते.
  • परंतु काही राज्यस्तरीय महाविद्यालये या कोर्ससाठी ऍडमिशन देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (Entrance Exam)देखील घेतात.
  • किमान पात्रता पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांच्या इयत्ता 12वीच्या निकालाची आणि इच्छित महाविद्यालयीन प्रवेश सूचनेची प्रतीक्षा करावी.
  • ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज सर्व आवश्यक तपशिलांसह भरावा लागेल आणि अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी महाविद्यालय/विद्यापीठाकडे सबमिट करावा लागेल.
  • अशी काही महाविद्यालये देखील आहेत जी 12वी मध्ये जास्त टक्केवारी असलेल्या उमेदवाराला प्रवेश देतात, त्यामुळे जास्त गुण मिळाले तर प्रवेशाची शक्यता जास्त असते.
  • गुणवत्ता यादी (Merit List) तयार केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना कळवले जाईल. मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव आल्यास, त्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजमद्ये जाऊन ऍडमिशन घ्यावे लागेल त्यानंतर त्या शैक्षणिक वर्षासाठीची फीस भरून तुम्हाला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता.
  • जर एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन प्रोसेस हि ऑफलाईन असेल तर तुम्ही थेट त्या कॉलेजला भेट देऊ शकता आणि सर्व प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून, फीस भरून ऍडमिशन करू शकता.
  • बीसीएस प्रवेश प्रक्रिया त्यांच्या मानक आणि अभ्यासक्रमाच्या आधारावर एका विद्यापीठातून दुसर्‍या विद्यापीठात बदलते.
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने प्रवेश घेता येतील.
  • उमेदवारांनी कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करावी किंवा नोंदणी फॉर्मची भरलेली हार्ड कॉपी वेळेच्या आत द्यावी.
  • बहुतेक संस्था राष्ट्रीय स्तरावरील IIT JEE, AUCET, UPSEE, MHCET इत्यादी परीक्षांमध्ये मिळालेले गुण आणि रँक विचारात घेतात आणि काही विद्यापीठे त्यांच्या स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतात ज्यावर आधारित प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते.
  • उमेदवारांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुण, प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण आणि त्यांच्या 10+2 परीक्षेच्या टक्केवारीच्या एकत्रित गुणांच्या आधारावर निवडले जाईल.
  • त्याआधारे रँक लिस्ट प्रसिद्ध केली जाईल ज्याच्या आधारे विद्यार्थ्यांना समुपदेशन सत्रासाठी बोलावले जाईल.
  • काही खाजगी महाविद्यालयांमध्ये थेट प्रवेश पद्धती आहे जिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जाचा फॉर्म आणि पदवी स्कोअर तसेच कौशल्याच्या आधारावर समुपदेशन सत्रासाठी बोलावले जाते.

हे नक्की वाचा:
1. एमबीए कोर्सची संपूर्ण माहिती
2. बीसीए कोर्सची संपूर्ण माहिती
3. बीटेक ची संपूर्ण माहिती
4. MSW कोर्सची संपूर्ण माहिती
5. एएनएम नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती
6. जीएनएम नर्सिंग कोर्सची संपूर्ण माहिती

BCS कोर्स का करावा । Why to Choose BSC Course in Marathi

  • कॉम्प्युटर सायन्स ऍप्लिकेशन्स आणि कोडिंगमध्ये आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला कोर्स आहे.
  • या कोर्सच्या अभ्यासक्रमाची रचना अलीकडच्या ट्रेंडनुसार करण्यात आली आहे. जे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानात वाढ करण्यास मदत करेल.
  • एआय आणि मशीन लर्निंगमधील घडामोडींमुळे, हा कोर्स विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे करिअर करण्यासाठी भरपूर संधी प्रदान करतो.
  • बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स हा एक विशेष कॉम्प्युटर सायन्स कोर्स आहे. हा कोर्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा ऍनालिसिस मध्ये सखोल ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करतो.
  • या कोर्समध्ये बरेच प्रॅक्टिकल प्रशिक्षण देखील दिले जाते जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी आवश्यक आहे.
  • सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा अनॅलिटीक्स हे ग्रॅज्युएशननंतर करिअरसाठी सर्वाधिक मागणी असलेले काही पर्याय आहेत.
  • याशिवाय, पदवीधर क्लायंट-बेस्ड अप्लिकेशन आणि वेबपेज डेव्हलपमेंटसाठी देखील निवडू शकतात.
  • कोर्सचा अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान मिळण्यास आणि उज्ज्वल करिअर करण्यास मदत होते.
  • हा कोर्स केल्यानंतर पदवीधरांसाठी चांगल्या पगाराच्या पॅकेजसह नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. नोकरीच्या संधीमध्ये टेकनिकल मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, सिनिअर डेव्हलपर इत्यादींपैकी एकाचा समावेश होतो.
  • ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे ते मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स (MCS) पदव्युत्तर पदवी निवडू शकतात.
  सीए कोर्सची संपूर्ण माहिती । CA Information in Marathi

BCS कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरीच्या संधी । Opportunities after Completing BCS Course in Marathi

BCS कॉम्प्युटर सायन्सचे तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांसमोर दोन पर्याय खुले असतात. पहिला उच्च शिक्षण घेणे आणि दुसरा म्हणजे नोकरी करणे.

जर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर तो MCS कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स करू शकतो. याशिवाय BCS कोर्स केलेल्या विध्यार्थ्यांसाठी एमबीए कोर्स हा एक उत्तम पर्याय आहे.

जर कोणाला BCS कोर्स केल्यानंतर नोकरी करायची असेल तर खालील IT क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी करू शकता.

  • गूगल
  • अमेज़न
  • फेसबुक
  • टीसीएस
  • टेक महिंद्रा
  • विप्रो
  • एचसीएल
  • एलएनटी इंफोटेक
  • फ्लिपकार्ट
  • वर्चुअल गेम इंडस्ट्रीज

BCS कोर्स केल्यानंतर कोणते जॉब्स प्रोफाइल असतात । Job Profiles after Completing BCS Course in Marathi

  • डेटाबेस मॅनेजर
  • सिस्टम एडमिनिस्ट्रेटर
  • स्टॅक वेब डेवलपर
  • बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर
  • सॉफ्टवेयर इंजीनियर
  • सिस्टम आर्किटेक्ट
  • मोबाइल ऍप्प डेवलपर
  • UI/UX डेवलपर
  • नेटवर्क इंजीनियर
  • टेक्निकल राइटर
  • सॉफ्टवेयर क्वालिटी टेस्टर

BCS कोर्स केल्यानंतर पगार किती मिळतो । Salary after Completing BCS Course in Marathi

BCS कोर्स केल्यानंतर पगार हा या क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य यावर अवलंबून बदलू शकतो.

सरासरी, पदवीधरांना सुरुवातीच्या टप्प्यात INR 5L – 10 LPA चा BCS पगार मिळण्याची शक्यता असते. जस जसा अनुभव वाढत जाईल त्याप्रमाणे पगार सुद्धा वाढेल.

BCS कोर्सचा अभ्यासक्रम । BCS Corse Syllabus in Marathi

BCS कोर्समध्ये खालील विषय शिकवले जातात. BCS कोर्सचा अभ्यासक्रम सेमिस्टरवाईज खाली दिलेला आहे.

Bachelor of Computer Science (BCS) Syllabus
Semester I
Sr NoSubjects
1Mathematics
2Basic Physics
3Computer Fundamentals
4Digital Logic
5Programming in c
6Programming in c Laboratory
7Communication Skills
 Bachelor of Computer Science (BCS) Syllabus 
Semester II
Sr NoSubjects
1Mathematics-2
2Basic Electronics
3Data structure
4Operating system
5Computer Organization
6Advanced C programming
7Programming Laboratory
8Communication Skills 2
 Bachelor of Computer Science (BCS) Syllabus 
Semester III
Sr NoSubjects
1Mathematics-3
2Circuit theory
3Analysis of Algorithms
4Operating systems -2
5Interfacing and Peripherals
6Object-Oriented Programming in C/ Java
7Database management-1
8Programming Lab
 Bachelor of Computer Science (BCS) Syllabus 
Semester IV
Sr NoSubjects
1Mathematics and Statistics
2Computer Architecture
3Database Management -2
4Introduction to JAVA programming
5Software Engineering
6Web Designing
7Introduction to Data Communication
 Bachelor of Computer Science (BCS) Syllabus 
Semester V
Sr NoSubjects
1Advanced Java programming
2Software Engineering
3Data networks and communication systems
4Computer Graphics
6GUI programming
7Operations Research
8Embedded Systems
 Bachelor of Computer Science (BCS) Syllabus 
Semester VI
Sr NoSubjects
1Software Testing
2Dot net Technologies
3Web Programming with PHP and MySQL
4Ethics & Cyber Law
6Mobile Computing
7Project
8Comprehensive Viva

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *