B tech course information in Marathi

बीटेक ची संपूर्ण माहिती | B Tech course information in Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत B Tech course information in Marathi. 

शिक्षण ही उत्तम करिअरची पहिली पायरी आहे, शिक्षण हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे व्यक्तीला इच्छित करिअर मिळू शकते.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अनेक मुले इंजिनिअर, पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ इ. होण्याचे स्वप्न बघतात. जे साधारणपणे शिक्षणातूनच साध्य होऊ शकते, त्यामुळे पालकही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा देण्यास तयार असतात.

बी टेक हा भारतातील सर्वात लोकप्रिय अभियांत्रिकी अभ्यासक्रमांपैकी एक आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून जास्तीत जास्त करिअर प्रदान करण्याच्या उद्देशाने ओळखला जातो. आज तरुणांमध्ये  B.Tech सारख्या कोर्सकडे जाण्याचा कल जास्त आहे. ज्या विध्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी B. Tech हा सर्वोत्तम करिअर पर्याय आहे.

इंजिनीअर होण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी ज्यांना बी.टेक. करायचं आहे त्यांच्या मनात काही प्रश्न असतील. जसे की B.Tech चा कोर्स म्हणजे काय, B.Tech कसा करायचा, B.Tech करण्यासाठी किती कालावधी लागतो, B.Tech ची फी किती आहे, B.Tech चे प्रकार कोणते आहेत? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात देण्यात आलेली आहेत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात बी.टेक कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी आमचा हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे. आमच्या या लेखात विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी B.Tech च्या प्रत्येक भागाची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

बीटेक चा  फुल फॉर्म काय आहे । B Tech Full Form in Marathi

बी टेकचा फुल फॉर्म बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आहे. हा फुल फॉर्म इंग्रजी शब्द Bachelor of Technology आहे. परंतु मुख्यतः त्याचा शॉर्ट फॉर्म BTech असाच वापरला जातो. मराठीत याचा अर्थ तंत्रज्ञानाची पदवी असा होतो.

बीटेक कोर्स काय आहे । What is B tech course details in Marathi

इंजिनीअर होण्यासाठी बी.टेक.च्या कोर्समध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी, विद्यार्थ्याला या कोर्सची चांगली माहिती असणे आवश्यक आहे.

बी टेक कोर्स हा पदवी अभ्यासक्रम (Graduation Degree )आहे. हा कोर्स बारावीनंतर केला जातो. हा अभ्यासक्रम तंत्रज्ञानावर आधारित आहे. बीटेक केल्यानंतर विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करतो.

हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याला बारावीच्या वर्गात पीसीएम विषय असणे अनिवार्य आहे. हा पीसीएम ग्रुप काय आहे? याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी हा अभ्यासक्रम बारावीनंतर 4 वर्षाचा आहे.

B.Tech साठी पात्रता । Eligibility for B Tech Course in Marathi

बी.टेक कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी किमान पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • बारावी विज्ञान शाखेतून केलेली असणे आवश्यक आहे.
  • दहावीनंतर 11वी आणि 12वीमध्ये विज्ञान शाखेचे दोन गट असतात. जीवशास्त्र गट(Biology Group) आणि गणित गट(Math Group). B.Tech मध्ये प्रवेश घेण्यासाठी 11वी आणि 12वी मध्ये गणिताचा गट (Math Group) असणे अनिवार्य आहे.
  • गणित गटात रसायनशास्त्र (Chemistry), भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Math) हे तीन मुख्य विषय आहेत. ज्यांना शॉर्टमध्ये PCM ग्रुप (PCM Group) असे म्हणतात.
  • प्रत्येक कॉलेजने बीटेक कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान गुणांची मर्यादा देखील ठेवली आहे. सरासरीबद्दल बोलायचे तर, विद्यार्थ्याला इयत्ता 12 वी मध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
  • बी.टेक कोर्सच्या प्रवेशासाठी काही महाविद्यालयाकडून प्रवेश परीक्षा  घेतली जाते. काही खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षा न घेताही प्रवेश दिला जातो.

विद्यार्थ्यांना B.Tech कोर्सच्या प्रवेश परीक्षेची (Entrance Exam) सविस्तर माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. आता पुढे आपण या B.Tech अभ्यासक्रमाच्या तपशीलामध्ये B.Tech प्रवेश परीक्षेबद्दल जाणून घेऊ.

B.Tech साठी कोणती प्रवेश परीक्षा असते । B Tech Entrance Exam

  • B.Tech मध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स (JEE Mains) आणि जेईई एडवांस (JEE Advanced) या परीक्षा द्याव्या लागतात. या दोन वेगवेगळ्या परीक्षा आहेत.
  • JEE चा फुल फॉर्म जॉइंट एंट्रेंस एग्जाम (Joint Entrance Exam) आहे. ज्याला मराठीत संयुक्त प्रवेश परीक्षा असे म्हणतात.
  • 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी प्रथम JEE Mains उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जेईई मेन उत्तीर्ण करणारे विद्यार्थी जेईई एडवांस परीक्षेसाठी पात्र मानले जातात.
  • जेईई मेन आणि जेईई एडवांस या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम हा इयत्ता 11वी आणि 12वीच्या विज्ञान विषयांवर आणि गणितावर आधारित आहे.
  • या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळालेल्या गुणांनुसार विद्यार्थ्याला भारतातील प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. भारतातील प्रसिद्ध महाविद्यालयांबद्दल आपण या लेखात पुढे चर्चा करू.
  • जेईई मेन आणि जेईई एडवांस या दोन्ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जातात. त्यामुळे भारतातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.
  • या परीक्षांव्यतिरिक्त, अनेक राज्ये त्यांच्या स्तरावर बी.टेक प्रवेश परीक्षा घेतात. त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन विद्यार्थी त्या-त्या राज्यांतील महाविद्यालयांमध्ये बी.टेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.
  बीबीए कोर्सची संपूर्ण माहिती । BBA Course Information in Marathi

B.Tech करण्यासाठी किती कालावधी लागतो । B Tech Course Duration

  • 12वी नंतर बी.टेक कोर्स करण्यासाठी किमान 4 वर्षे लागतात. बी.टेक कोर्स 8 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे.
  • 12वी नंतर बीटेक कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षेसाठी लागणारा वेळ या 4 वर्षांत जोडलेला नाही. विद्यार्थ्याला 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 6 महिने किंवा त्याहून अधिक वेळ लागल्यास त्यामुळे हा कालावधी वाढतच जातो.
  • वेळेची बचत करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी 11वी आणि 12वी दरम्यानच बी.टेक प्रवेश परीक्षेची तयारी करावी.

बी.टेक कोर्सची फी किती आहे? । B Tech Course Fees

कॉलेजच्या प्रतिष्ठेनुसार बी टेक कोर्सची फी प्रत्येक कॉलेजनुसार बदलते. बीटेक कोर्सच्या फीची एक फिक्स संख्या देणे शक्य नाही.

सरकारी महाविद्यालयांच्या तुलनेत खासगी महाविद्यालयांमध्ये बी.टेक अभ्यासक्रमाची फी जास्त आहे. तरीही, जर आपण सरासरीबद्दल बोललो तर. त्यामुळे बीटेक कोर्स फी ₹ 100000 प्रति वर्ष ते ₹ 300000 प्रति वर्ष पर्यंत असू शकते.

फिसच्या माहितीसाठी, विद्यार्थी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक आहे. त्या महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फीबद्दल संपूर्ण माहिती मिळवावी.

बीटेकचे किती प्रकार आहेत । B Tech Course Specialization

इंजीनियर होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना ही बाब स्पष्ट व्हायला हवी कि त्याला कोणत्या क्षेत्रात इंजीनियर व्हायचे आहे. इंजीनियरिंगचे अनेक प्रकार आहेत.

विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार इंजीनियरिंग क्षेत्र निवडावे लागते. भारतात उपलब्ध असलेल्या मुख्य B.Tech स्पेशलायझेशनची यादी खाली दिली आहे.

  • Electrical Engineering
  • Computer Science Engineering
  • Civil Engineering
  • Mechanical Engineering / Mechanical & Automation Engineering
  • Chemical Engineering
  • Textile Engineering
  • Project Engineering
  • Aerospace Engineering
  • Petroleum Engineering
  • Instrumentation Engineering
  • Marine Engineering
  • Ceramic Engineering
  • Metallurgical Engineering
  • Geotechnical Engineering
  • Optical Engineering
  • Materials Science Engineering
  • Biomolecular Engineering
  • Computer Engineering
  • Software Engineering
  • Petroleum Engineering
  • Aeronautical Engineering
  • Nuclear Engineering
  • Automobile Engineering
  • Electrical & Communication Engineering
  • Electronics & Electrical Engineering
  • Production And Industrial Engineering
  • Transportation Engineering
  • Environmental Engineering
  • Nanotechnology Or Nanobiotechnology
  • Biotechnology
  • Textile Technology
  • Food Technology
  • Information Technology

B Tech नंतर काय करावे । Career Option after B Tech Course in Marathi

प्रत्येक कोर्सप्रमाणे बीटेक कोर्स केल्यानंतरही विद्यार्थ्याकडे दोन मार्ग असतात. पहिला विद्यार्थी बी.टेक नंतर नोकरी शोधून आपला उदरनिर्वाह सुकर करू शकतो. आणि दुसरे म्हणजे बी.टेक नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतो.

या दोन्ही मुद्यांवर आपण पुढे चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी B.Tech नंतर कोणता कोर्स करायचा हे जाणून घेऊयात.

बीटेक नंतर कोणता कोर्स करायचा । Courses after B Tech Course in Marathi

ज्या विद्यार्थ्यांना बी.टेक केल्यानंतर नोकरी न करता उच्च शिक्षण घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी भारतात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जे बी.टेक डिग्री केल्यानंतर करता येतात.

विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही मुख्य अभ्यासक्रमांची यादी (B. Tech नंतर अभ्यासक्रमांची यादी) खाली देत ​​आहोत.

  • MBA
  • MTech
  • Post Graduate Diploma in Management (PGDM)
  • Short-term certificate courses in Graphic Designing, Web Designing
  • JAVA
  • C, C++, SQL, HTML and Other Programming Languages
  • PG Diploma in Digital Marketing
  • Software Testing

हे काही अभ्यासक्रम होते. जे बी.टेक पास आऊट विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी करू शकतात. या अभ्यासक्रमांशिवाय इतरही अनेक अभ्यासक्रम भारतात उपलब्ध आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना बीटेक कोर्स केल्यानंतर पुढील शिक्षण न करता जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. बी.टेक नंतर कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत हे जाणून घेऊयात.

हे नक्की वाचा:
एमबीए कोर्सची संपूर्ण माहिती
बी.फार्मसी बद्दल संपूर्ण माहिती

बीटेक नंतर कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत । Jobs after B. Tech Course

ज्या विद्यार्थ्यांना बीटेक कोर्स केल्यानंतर नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी B.Tech मध्ये विषय स्पेशलायझेशन निवडताना त्या स्पेशलायझेशननंतर उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांबद्दल चांगले ज्ञान असले पाहिजे.

भारतात बी टेक इंजिनिअरसाठी अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. नोकरी म्हणून बी टेक इंजिनीअरला खाजगी नोकऱ्या आणि सरकारी नोकऱ्या दोन्ही मिळू शकतात. सर्व प्रथम खाजगी नोकरीबद्दल बोलूया.

खाजगी नोकऱ्या (Private Jobs)

खाजगी नोकऱ्यांमध्ये, बहुतेक कंपन्यांमध्ये तांत्रिक नोकऱ्यांना जास्त मागणी असते. कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल या विषयात बीटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतरांपेक्षा खासगी क्षेत्रात नोकरीच्या अधिक संधी आहेत.

कंप्यूटरवर आधारित बीटेक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये खूप मागणी आहे. सी, सी प्लस प्लस, जावा, पायथन, पीएचपी इत्यादी प्रोग्रामिंग भाषांमध्ये चांगली पकड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजसह नोकऱ्या उपलब्ध आहेत.

तुम्ही कोणत्याही विषयात बी.टेक केलेली असेल तर त्या क्षेत्रात नोकऱ्या मिळवण्याच्या अधिक संधी आहेत. खाली आम्ही काही मुख्य नोकऱ्यांची यादी देत ​​आहोत.

  फॅशन डिझायनिंग कोर्स करिअरचा उत्तम पर्याय । Fashion Designer Course Information In Marathi
Job Types
Mechanical EngineerCeramic Engineer
Civil EngineerProduction Engineer
Chemical EngineerElectronics & Communication Engineer
Computer Science EngineerMining Engineer
Electronics EngineerSoftware Developer
Automobile EngineerRobotics Engineer
Aeronautical EngineerProduct Manager
Electrical EngineerLecturer/Professor
Marine EngineerConstruction Engineer
Aerospace EngineerTelecommunication Engineer

हे फक्त एक उदाहरण आहे, आम्ही काही विषयांवर आधारित नोकऱ्यांबद्दल सांगितले आहे. याशिवाय इतरही अनेक नोकऱ्या बीटेक उत्तीर्ण विद्यार्थ्याला मिळू शकतात.

आता B.Tech केल्यानंतर कोणत्या सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत याबद्दल बोलूया.

सरकारी नोकऱ्या (Government jobs)

B.Tech केल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना भारतात जूनियर इंजीनियर, सिस्टेंट इंजीनियर इत्यादी सरकारी नोकऱ्या मिळण्याच्या संधी आहेत. या नोकऱ्या मिळवण्यासाठी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.

परीक्षांबद्दल बोलताना, उदाहरणार्थ, इंजीनियर सर्विस एग्जाम, इंडियन  इंजीनियरिंग सर्विसेज एग्जाम यासारख्या परीक्षा सरकारद्वारे आयोजित केल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवू शकतो.

बीटेकसाठी टॉप कॉलेज कोणते आहेत । Top College for B.Tech

अभियांत्रिकी क्षेत्रात स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बीटेक कोर्समध्ये प्रवेश घेताना, भारतातील टॉप बीटेक महाविद्यालयांची माहिती मिळणे आवश्यक आहे.

तरीही भारतात अशी अनेक महाविद्यालये आहेत. जे बी टेक पदवीसाठी सर्वोत्तम मानले जातात. परंतु त्यापैकी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) ही बी.टेक कोर्स करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.

  • IIT Bombay
  • IIT Madras
  • IIT Hyderabad
  • IIT Kanpur
  • IIT Delhi
  • IIT Kharagpur
  • NIT Trichy
  • Vellore Institute of Technology
  • Delhi Technological University
  • PSG College of Technology, Coimbatore
  • IIT Guwahati
  • Indian Institute of Technology Roorkee
  • Anna University, Chennai
  • Jadavpur University, Kolkata
  • Amity University Noida
  • IIT Indore
  • BMS College of Engineering
  • Manipal Institute of Technology
  • College Of Engineering Pune

बीटेक मध्ये कोणते विषय असतात । B. Tech Course Subjects

B.Tech मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्याला B.Tech च्या विषयांची नीट माहिती असायला हवी. विद्यार्थ्याने निवडलेल्या B.Tech स्पेशलायझेशननुसार B.Tech चे विषय बदलतात. विद्यार्थ्याने बी.टेक.मध्ये शिक्षण घेण्यासाठी जे क्षेत्र निवडले आहे त्याला त्या क्षेत्राशी संबंधित विषयांचा अभ्यास करावा लागतो.

या लेखात सर्व विषयांची माहिती देणे शक्य नाही त्यामुळे उदाहरण म्हणून खाली आम्ही काही B.Tech स्पेशलायझेशनच्या विषयांची लिस्ट देत आहोत.

B Tech Computer Science Engineering Subjects

  • Operating Systems
  • Computer Forensics
  • Computer Networks
  • Programming in C++
  • Programming in Python
  • Programming in Java
  • Computer Architecture
  • Data Structure and Algorithms
  • Machine Learning
  • Artificial Intelligence

B Tech Civil Engineering Subjects

  • Hydraulic Structures
  • Transportation engineering
  • Groundwater Engineering
  • Pavement Engineering
  • Bridge Engineering
  • Structural Mechanics
  • Soil Mechanics
  • Water Resources Engineering
  • Hydropower Engineering
  • Traffic Engineering
  • Forensic Civil Engineering

B Tech Mechanical Engineering Subjects

  • Basic Mechanical Engineering
  • Data Analysis and Interpretation
  • Engineering Graphics and Drawing
  • Material Science
  • Applied Thermal Engineering
  • Applied Thermodynamics
  • Foundry Engineering
  • Manufacturing Process and Principles
  • Electric Circuits
  • Fluid Mechanics
  • Industrial Engineering

B Tech Chemical Engineering Subjects

  • Thermodynamics
  • Fluid Flow/Mechanics
  • Heat Transfer Systems
  • Process Control & Instrumentation
  • Oil Exploration and Refinery
  • Mechanical Operations
  • Advanced Mathematics
  • Process Calculations
  • Chemical Technology/Synthesis

B Tech Electrical and Electronics Engineering Subjects

  • Electrical Engineering Practices
  • Electrical Machines
  • Digital Systems
  • Calculus
  • Electronic Devices
  • Digital Communications
  • Optimal Control Systems

B Tech Biomedical Engineering Subjects

  • Material Sciences
  • Thermodynamics
  • Medical Instrumentation
  • Hospital Safety and Management
  • Engineering Mechanics
  • Communicative English
  • Human Anatomy & Physiology
  • Dynamics of Biofluids
  • Environmental Sciences

B Tech ECE Subjects

  • Digital Signal Processing
  • Microcontrollers
  • Network Design and Analysis
  • Semiconductors
  • Optical Fibre and Wireless Communication
  • Embedded Systems

B Tech Robotics and Automation Engineering Subjects

  • Motion Planning
  • Robot Dynamics
  • Computer Programming
  • Mathematical Algorithms
  • Machine Learning
  • Computer Vision
  • Advanced Physics
  • Artificial intelligence

B Tech Automobile Engineering Subjects

  • Heat Transfer and Combustion
  • Pollution and Control
  • Power Units
  • AutoCAD
  • Material and Polymer Science
  • Vehicle Dynamics

B Tech Food Technology Subjects

  • Food Storage and Transport Engineering
  • Food Engineering
  • Food Production Trends and Programs
  • Food Industrial Economics
  • Food Microbiology and Safety
  • Fruits Processing Technology
  • Technology of Milk Products Processing
  • Meat, Fish, and Poultry Product Technology

B Tech Aerospace Engineering Subjects

  • Avionics
  • Aircraft Design
  • Aerodynamics
  • Spaceflight Mechanics
  • Fluid and Solid Mechanics
  • Elements of Aeronautics
  • Propulsion
  • Rocket Missiles

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *