B Pharmacy Information In Marathi.

बी.फार्मसी बद्दल संपूर्ण माहिती । B Pharmacy Information In Marathi

नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत B Pharmacy Information In Marathi.

मित्रांनो, बर्‍याचदा अनेक विद्यार्थी आपल्या करिअरबद्दल खूप चिंतेत असतात. त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, याची पुरेशी माहिती नसते. जर तुम्ही तुमचे करिअर करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र निवडायचे ठरवले असेल तर तुमच्यासाठी बी फार्मसी हा एक चांगला पर्याय आहे.

जर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचे असेल तर बी फार्मसी कोर्स करून तुम्ही सहज मेडिकल फील्डमध्ये करिअर करू शकता. तुम्हीही बी फार्मा कोर्स करण्याचा विचार करत असाल, किंवा बी फार्मसी कोर्स करून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो, या लेखात आम्ही तुम्हाला बी फार्मसी बद्दल माहिती सांगणार आहोत? तसेच या लेखात आपण पाहणार आहोत कि बी फार्मा म्हणजे काय? बी फार्मा कशी करावी? बी फार्मा करण्यासाठी पात्रता काय लागते? तसेच बी फार्माची फी किती आहे? आणि बी फार्माचा सिलॅबस काय आहे?

याशिवाय हा कोर्स करण्यासाठी कोणती सर्वोत्तम कॉलेजे आहेत. आणि बी फार्मा केल्यानंतर पगार किती मिळतो इत्यादी गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

बी फार्मा म्हणजे काय । What is B Pharmacy Information In Marathi.

बी फार्मसीचा फुल फॉर्म हा “बॅचलर ऑफ फार्मसी” असा आहे. बी फार्मसी हा बॅचलर डिग्री कोर्स आहे. बी फार्मसी हा चार वर्षांचा कोर्स आहे जो एकूण 8 सेमिस्टरमध्ये विभागला गेला आहे.

बी फार्मसी या बॅचलर डिग्री कोर्स मध्ये तुम्हाला औषधे, औषधोपचार आणि औषधांशी संबंधित सर्व प्रकारची माहिती दिली जाते. तसेच त्यात औषध कधी आणि कसे द्यावे, आणि औषध कधी आणि कसे घ्यावे? कोणती चाचणी कधी करावी? तसेच या कोर्समध्ये रुग्णाला कोणते औषध कोणत्या वेळी द्यावे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात.

बी फार्मसी या कोर्समध्ये औषधांचे उत्पादन आणि कोणत्या रोगात कोणते औषध घ्यावे इत्यादी शिकवले जाते.

बी फार्मसी कोर्समध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजियोलॉजी, बायोकेमिस्ट्री या विषयांचा अभ्यास करावा लागतो. परदेशातही या अभ्यासक्रमाला खूप मागणी आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे स्वतःचे मेडिकलही सुरु करू शकता.

फार्मसी क्षेत्रात करिअर करण्यासाठी D pharmacy कोर्स, B pharmacy कोर्स, M pharmacy कोर्स करून तुम्ही औषधांची माहिती मिळवू शकता, हे कोर्स केल्यानंतर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात सहज करिअर करू शकता.

जर तुम्हाला बी फार्मा कोर्स करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पुढे आपण पाहणारच आहोत कि बी फार्मसी करण्यासाठी  बारावीसोबतच आणखी काय करावं लागतं.

बी फार्मा हा औषधे, औषध उत्पादन उद्योग, विविध मेडिकल स्टोअर्स, औषध वितरक आणि घाऊक विक्रेत्यांना औषधांचे वितरण इत्यादी गोष्टींशी संबंधीत करिअर आहे.

बी फार्मसी कोर्स करण्यासाठी पात्रता काय लागते । Eligibility for B Pharmacy Information In Marathi.

 • बी फार्मसी कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बारावी सायंस या शाखेतून उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
 • 12वी च्या परीक्षेत तुम्हाला किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
 • बारावीमध्ये तुम्ही PCB हा ग्रुप घेऊन बारावी उत्तीर्ण करावी. PCB ग्रुप म्हणजेच (Physics) भौतिकशास्त्र, (Chemistry)रसायनशास्त्र आणि (Biology)जीवशास्त्र हे विषय बारावीमध्ये ठेवावेत.
 • D. Pharmacy केल्यानंतरही तुम्ही बी.फार्मसी ला ऍडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स केला असेल तर पुढे डिग्री पूर्ण करण्यासाठी बी. फार्मसी हा कोर्स करू शकता.
  एएनएम नर्सिंग म्हणजे काय? एएनएम नर्सिंग कसे करावे? | ANM Nursing Course Information in Marathi

बी. फार्मसी हा किती वर्षांचा कोर्स आहे | B. Pharmacy Course Duration

बी. फार्म म्हणजेच बॅचलर ऑफ फार्मसी हा 4 वर्षांचा डिग्री कोर्स आहे. 4 वर्षांचा हा डिग्री कोर्स 8 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर पदवीधरांना ‘बॅचलर ऑफ फार्मसी’ ची पदवी मिळते.

बी फार्मसी करण्याचे फायदे । Benefits of doing B Pharmacy

मित्रांनो, बी फार्मसी करण्याचे बरेच फायदे आहेत, जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्हाला त्याबद्दल माहिती होईल, तेव्हा तुम्हाला हा कोर्स करण्यात आणखी इंटरेस्ट येईल आणि तुम्हाला हा कोर्स करायला आवडेल.

बी फार्मसी करण्याचे खालील फायदे आहेत.

 • सरकारी किंवा खाजगी अशा सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात.
 • तुम्हाला तुमचे स्वतःचे मेडिकल स्टोअर उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला परवाना (लायसेन्स) मिळेल.
 • तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता.
 • तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून देखील नोकरी करू शकता.
 • तुम्ही रिसर्च एजन्सी, हेल्थ सेंटर, मेडिकल स्टोअर, मेडिसिन कंपनी इत्यादी विविध क्षेत्रात काम करू शकता.

बी. फार्मसी कोर्सची फीस किती आहे । B. Pharmacy Course Fees

तर मित्रानो प्रत्येक विद्यार्थी कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी फीसबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येक विद्यार्थी त्याच्या बजेटनुसार कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो. आता आपण बी. फार्मसी कोर्सच्या फीस बद्दल माहिती बघुयात.

मित्रानो प्रत्येक कॉलेजची फीस वेगवेगळी असते त्यामुळे एक फिक्स आकडा सांगणे अवघड आहे. परंतु मी तुम्हाला अंदाजे फीस किती असू शकते याबद्दल माहिती देऊ शकतो.

खाजगी महाविद्यालयात बी फार्मसीची फी दरवर्षी 20,000 ते 1,25,000 रुपये पर्यंत असू शकते. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की प्रत्येक महाविद्यालयात फीसची रक्कम वेगवेगळी असू शकते.

विद्यार्थ्यांना एक विनंती आहे कि तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहात आधी त्या कॉलेजमध्ये जाऊन फीस बद्दल चौकशी करावी.

खाजगी महाविद्यालयाच्या तुलनेत सरकारी महाविद्यालयाची फी खूपच कमी असते. परंतु कोणत्याही शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही प्रवेश परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालात तर तुम्हाला सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळेल.

बी फार्मासाठी प्रवेश परीक्षा । B. Pharmacy Entrance Exam

जर तुम्हाला बी फार्मा कोर्स करायचा असेल तर तुम्ही हा कोर्स सरकारी कॉलेजमधून किंवा खासगी कॉलेजमधूनही करू शकता. पण जर तुम्हाला सरकारी महाविद्यालयातून हा कोर्स करायचा असेल तर त्यासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे.

कारण तुमच्या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला बी फार्मा कोर्स करण्यासाठी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो.

बी फार्मासाठी सरकारी महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा पुढीलप्रमाणे आहेत. MHT-CET, EAMCET, Wbjee, BITSAT, Tsmcet, WBJEE, GPAT इत्यादी प्रवेश परीक्षा देऊन तुम्ही सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकता.

जर तुम्हाला प्रवेश परीक्षा न देता बी. फार्मा या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे असेल, तर तुम्ही थेट खासगी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकता.

मित्रानो हा कोर्स तुम्हाला नियमितपणे (रेग्युलर) करायचा आहे हे लक्षात ठेवा. जेणेकरून तुम्हाला सर्व औषधे तसेच इतर माहिती मिळू शकेल. [B Pharmacy Information In Marathi]

हे नक्की वाचा:
जीएनएम नर्सिंग म्हणजे काय? जीएनएम नर्सिंग कसे करावे?
एएनएम नर्सिंग म्हणजे काय? एएनएम नर्सिंग कसे करावे?
एनडीए म्हणजे काय आणि एनडीएची तयारी कशी करावी?

Subjects of B Pharmacy Course

 • Human Anatomy And Physiology
 • Pharmaceutical Engineering
 • Industrial Pharmacy
 • Biochemistry
 • Pharmaceutical Analysis
 • Pharmaceutical Microbiology
 • Pharmaceutical Inorganic Chemistry
 • Pharmaceutical Organic Chemistry
 • Pharmacognosy And Phytochemistry
 • Biopharmaceuticals And Pharmacokinetics
 • Computer Applications In Pharmacy Pharmacology
 • Remedial Biology/Remedial Mathematics Physical Medicine
 • [B Pharmacy Information In Marathi]
  एनडीए म्हणजे काय आणि एनडीएची तयारी कशी करावी | NDA Information in Marathi

B Pharma Course Syllabus

B Pharma Syllabus 1st Year

 • Human Anatomy And Physiology
 • Pharmaceutical Inorganic Chemistry
 • Pharmaceutical Organic Chemistry
 • Computer Applications In Pharmacy
 • Pharmacy
 • Remedial Maths
 • Biochemistry
 • Pathophysiology
 • Environmental Science
 • Pharmaceutical Analysis
 • Therapeutic Biology

B Pharma Syllabus 2nd Year

 • Pharmacology
 • Physical Medicine
 • Medicinal Chemistry
 • Pharmaceutical Microbiology
 • Pharmaceutical Engineering
 • Pharmaceutical Organic Chemistry
 • Pharmacognosy And Phytochemistry

B Pharma Syllabus 3rd Year

 • Pharmacology
 • Medicinal Chemistry
 • Industrial Pharmacy
 • Medicinal Chemistry
 • Herbals Drug Technology
 • Pharmaceutical Jurisprudence
 • Pharmaceutical Biotechnology

B Pharma Syllabus 4th Year

 • Quality Control And Standardization Of Herbs
 • Cosmetic Experimental Pharmacology
 • Dietary Supplements And Nutraceuticals
 • Industrial Pharmacy
 • Novel Drug Delivery Systems
 • Instrumental Methods Of Analysis
 • Pharmacy Practice
 • Computer Aided Drug Design
 • Pharmacovigilance
 • Practical Training
 • Project Work
 • Cell And Molecular Biology
 • Advanced Instrumentation Techniques
 • Pharmaceutical Regulatory Science
 • Social And Preventive Pharmacy
 • Biostatistics And Research Methodology

सारांश: [B Pharmacy Information In Marathi]

 • जर तुम्हाला बी फार्मा कोर्स करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित/जीवशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण व्हावे लागेल. तसेच इयत्ता 12वी मध्ये किमान 50% ते 55% गुण मिळवलेले असावेत.
 • जर तुम्हाला सरकारी महाविद्यालयातून बी फार्मा कोर्स करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. पण लक्षात ठेवा की तुम्हाला चांगल्या गुणांसह प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
 • कारण तुमच्या प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला बी फार्मा अभ्यासक्रमासाठी सर्वोत्तम महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त गुणांसह प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करा.
 • प्रवेश परीक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्यास उत्तम शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो तसेच शासकीय महाविद्यालयात फीसही कमी असते.
 • याशिवाय तुम्हाला कोणत्याही खाजगी महाविद्यालयातून बी फार्मा कोर्स करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. पण हा कोर्स तुम्हाला रेग्युलर करायचा आहे हे लक्षात ठेवा.
 • कारण काही विद्यार्थी बाहेरून थेट परीक्षा देऊन हा कोर्स उत्तीर्ण होतात. मात्र त्या विद्यार्थ्यांना औषधांबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे खाजगी महाविद्यालयातून नियमित बी फार्मा कोर्स करणे तुमच्यासाठी चांगले राहील. जेणेकरून तुम्हाला औषधांची संपूर्ण माहिती मिळू शकेल.
 • तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की बी फार्मा कोर्स चार वर्षांचा आहे. आणि हा कोर्स 8 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. म्हणूनच तुम्हाला 8 सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने परीक्षा यशस्वीपणे पास केल्यास तुम्हाला बॅचलर ऑफ फार्मसीची पदवी दिली जाते.

मित्रानो, मला आशा आहे कि बी. फार्मसीबद्दल [B Pharmacy Information In Marathi] सर्व माहिती तुम्हाला या लेखातून मिळाली असेल. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा.

2 thoughts on “बी.फार्मसी बद्दल संपूर्ण माहिती । B Pharmacy Information In Marathi”

 1. sahida Inamdar

  B pharmacy lateral साठी admission external karata येते का जर येत असेल तर कॉलेज कोणते

  1. नमस्कार SAHIDA INAMDAR,
   जर तुम्ही डी फार्मसी हा कोर्स पूर्ण केला असेल तर तुम्ही B pharmacy lateral साठी admission घेऊ शकता. परंतु B pharmacy lateral हा externally करता येतो का नाही याबाबद्दलची माहिती मला कुठेही मिळाली नाही.
   आमचा सल्ला हा आहे कि तुम्ही B pharmacy lateral हा कोर्स नियमित (रेग्युलर) पद्धतीनेच करा जेणेकरून तुम्हाला सर्व औषधे तसेच इतर माहिती Practically मिळू शकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *