नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Avocado in Marathi.
निरोगी शरीरासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. पौष्टिक आहारामध्ये फळे महत्त्वाची भूमिका बजावतात. याचे मुख्य कारण म्हणजे फळांमध्ये मध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात.
तुम्हाला माहित आहे का की अशी काही फळे आहेत ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असल्यामुळे ती फळे सुपर फूड म्हणून ओळखली जातात. असेच एक फळ म्हणजे ऍव्होकॅडो. जगातील लोकप्रिय निवडक फळांमध्ये ऍव्होकॅडोची गणना होते.

ऍव्होकॅडोची चव थोडी बटरसारखी असते, म्हणून त्याला बटरफ्रूट असेही म्हणतात. चला तर मग या लेखात आपण ऍव्होकॅडो म्हणजे काय आणि ऍव्होकॅडोचे फायदे सविस्तरपणे जाणून घेऊ, जेणेकरून आपल्याला ऍव्होकॅडो फळाची उपयुक्तता अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.
तसेच, हे लक्षात ठेवा की ऍव्होकॅडो हे काही समस्यांमध्ये आराम देऊ शकतो, परंतु ते कोणत्याही आजाराचे संपूर्ण उपचार म्हणून वापरणे योग्य नाही त्यासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Table of Contents
ऍव्होकॅडो म्हणजे काय | What is Avocado in Marathi
ऍव्होकॅडोला इंग्रजीत ऍव्होकॅडो (Avocado) असे म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ऍव्होकॅडोला मराठीत काय म्हणतात. तर हे फळ भारतीय नसल्यामुळे भारतातही या फळाला ऍव्होकॅडोच म्हणतात. त्यामुळे मराठीतही आपण याला ऍव्होकॅडो म्हणू शकतो. हिंदीत ऍव्होकॅडोला “रुचिरा” असे म्हटले जाते. ऍव्होकॅडोला वैज्ञानिक भाषेत Persea Americana म्हणतात.

आता अनेक लोकांना आणखी एक प्रश्न पडला असेल कि ऍव्होकॅडो हे फळ आहे कि फळभाजी आहे? तर याच उत्तर आहे ऍव्होकॅडो हे एक फळ आहे. या विशेष फळाचे उत्पादन दक्षिण मेक्सिको आणि कोलंबियामध्ये सुमारे सात हजार वर्षांपूर्वीपासून घेतले जात होते. ऍव्होकॅडो मधील असणाऱ्या पोषक तत्वांमुले आणि त्याच्या असणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांमुळे जगातील अनेक देशांमध्ये त्याची लागवड केली जाते.
ऍव्होकॅडो हे एक मांसल फळ आहे ज्याच्या मध्यभागी एक मोठे बी असते. त्याच्या मोठ्या आकारामुळे आणि त्याच्या असणाऱ्या जाड सालीमुळे, त्याला अॅलिगेटर पियर्स असेही म्हणतात. या फळाची साल खूप जाड असते त्यामुळे हे फळ कीटकांपासून सुरक्षित राहते.
आता ऍव्होकॅडो हे फळ कीटकांपासून सुरक्षित असल्यामुळे यावर कीटनाशक किंवा पेस्टीसाइट्स यांचा वापरहि खूप कमी प्रमाणात केला जातो किंवा त्यांचा वापर करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे तुम्हाला ऍव्होकॅडो ऑरगॅनिक स्वरूपात खायला मिळते. ऍव्होकॅडोवर कीटकनाशकांचा कमी वापर होतो त्यामुळे ते सर्वात सुरक्षित फळांच्या उत्पादनांपैकी एक आहे.
जगभरात ऍव्होकॅडोचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी हास ऍव्होकॅडो सर्वात लोकप्रिय आहे. हॅस ऍव्होकॅडो हे पोषक तत्वांच्या बाबतीत सर्वात खास आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये ऍव्होकॅडो या फळाची लागवड केली जाते. लेखात पुढे, आपण ऍव्होकॅडोचे फायदे तसेच त्यामध्ये असलेल्या सर्व पोषक तत्वांबद्दल तपशीलवार माहिती घेऊ.

ऍव्होकॅडो एवोकॅडोचे फायदे | Benefits of Avocado in
- हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
- पचन सुधारण्यासाठी उपयुक्त
- वजन कमी करण्यास उपयुक्त
- डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त
- कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त
- तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
- हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त
- यकृताच्या (लिवर) आरोग्यासाठी उपयुक्त
- किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त
- संधिवातामध्ये आराम मिळतो
- मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त
- कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त
- मेंदूच्या विकास करण्यास उपयुक्त
- केसांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते
हे नक्की वाचा:
1. रॉक सॉल्ट म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत
2. बार्ली म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत
3. ऍश गार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत
FAQ:
1. एवोकॅडो ही भाजी आहे की फळ?
ऍव्होकॅडो हे एक फळ आहे
2. मी रोज एवोकॅडो खाऊ शकतो का?
हो, तुम्ही रोज ऍव्होकॅडो खाऊ शकता.
3. मी एवोकॅडो सकाळी किंवा रात्री कधी खावे?
तुम्ही ऍव्होकॅडो केव्हाही खाऊ शकता. सकाळी खाल्यास जास्त होऊ शकतो.
4. भारतात एवोकॅडो कुठे आढळतो?
भारतात एवोकॅडो तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, दक्षिण-मध्य भारतातील कर्नाटक आणि पूर्वेकडील हिमालयीन राज्य सिक्कीममध्ये आढळतो