नमस्कार, इंस्टामराठी या वेबसाईटवर तुमचं स्वागत आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Ahilyabai Holkar information in Marathi.
अहिल्याबाईं होळकर याना देवीचा अवतार अशी उपाधी देण्यात आली आहे. त्या अंधारात एका प्रकाशाच्या किरणासारख्या होत्या. त्यांना अंधार पुन्हा पुन्हा भस्मसात करण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. उत्कृष्ट विचार आणि नैतिक आचरणामुळे त्यांना समाजात देवीचा दर्जा मिळाला आहे.
अहिल्याबाई होळकर यांनी अनेक धार्मिक कार्य केले आहेत. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेली मंदिरे त्यांनी पुन्हा बांधली. श्रीनगर, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, प्रयाग, वाराणसी, नैमिषारण्य, पुरी, रामेश्वरम, सोमनाथ, महाबळेश्वर, पुणे, इंदूर, उडुपी, गोकर्ण, काठमांडू इत्यादी ठिकाणी भारतभर त्यांनी अनेक मंदिरे बांधली आहेत.
अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यावर स्त्रीशक्ती किती महान आहे आणि एक स्त्री आपल्या जीवनात काय काय करू शकते याचे उदाहरण आपल्याला अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यावर समजते. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांना कसे सामोरे जायचे हे अहिल्याबाईंच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते.
अहिल्याबाई होळकर याना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. स्वाभिमानाची खोटी आसक्ती सोडून गोरगरिबांना आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न अहिल्याबाई होळकर यांनी शेवटपर्यंत केला आहे.
अहिल्याबाई होळकर यांनी सदैव आपल्या राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी काम केले. त्यांच्या कामाची पद्धत अतिशय सरळ आणि सोपी होती. अहिल्याबाई होळकर आपल्या राज्यातील लोकांशी अत्यंत प्रेमाने आणि दयाळूपणे वागायच्या.
अहिल्याबाई होळकर यांनी अनेक युद्धांमध्ये आपल्या सैन्याचे नेतृत्व केले आणि स्वतः हत्तीवर स्वार होऊन शौर्याने लढल्या. अहिल्याबाई होळकर माळवा प्रांताची राणी होती. त्यांनी आपल्या माळवा प्रांताचे अनेक लोकांच्या आक्रमणापासून रक्षण केले.
अहिल्याबाई होळकर यांची सामाजिक कार्यासाठीही ओळख आहे. त्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. चला तर मग जाणून घेऊया अहिल्याबाई होळकरांचा इतिहास.
Table of Contents
आहिल्याबाई होळकर यांची थोडक्यात माहिती
संपूर्ण नाव | पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई खंडेराव होळकर |
जन्म | 31 मे 1725 |
जन्मस्थान | चौंडी, अहमदनगर, महाराष्ट्र |
वडिलांचे नाव | माणकोजी शिंदे |
आईचे नाव | सुशीलाबाई शिंदे |
पतीचे नाव | खंडेराव मल्हारराव होळकर |
धर्म | हिंदू |
कार्य | होळकर साम्राज्याचा राज्यकारभार, सामाजिक कार्य, धार्मिक कार्य |
निधन | 13 ऑगस्ट 1795 |
जीवनचरित्र |
अहिल्याबाई होळकर त्यांचा जन्म आणि बालपण । अहिल्याबाई होळकर का इतिहास मराठी?
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी या छोट्याशा खेडे गावात झाला. चौंडी हे खेडे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात आहे. अहिल्याबाई होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौंडी गावचे पाटील होते. अहिल्याबाई होळकर यांच्या आईचे नाव सुशीलाबाई शिंदे होते.
त्या काळात स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नव्हते तरीही माणकोजी शिंदे यांनी अहिल्याबाईना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. तुम्हाला हि गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की त्यावेळी महिलांना शिक्षण दिले जात नव्हते, पण माणकोजी यांनी आपल्या मुलीला चांगले शिक्षण दिले आणि चांगले आचरणही दिले. माणकोजी हे खूप विद्वान आणि दूरदर्शी गृहस्थ होते, म्हणूनच त्यांनी अहिल्याबाईंना नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली. त्यांनी बालपणीच अहिल्याबाईंना शिकवायला सुरुवात केली होती.
एकदा महाराज मल्हारराव होळकर पुण्याला जात असताना चौंडी येथे वास्तव्यास थांबले होते. एका आख्यायिकेनुसार, मल्हाररावांनी अहिल्यादेवींना एका देवळात बघितले होते. त्यावेळी अहिल्यादेवीं 8 वर्षाच्या होत्या. अहिल्यादेवीं खूपच बुद्धिमान आणि हुशार होत्या. मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई यांचा विवाह स्वतःचा मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी करण्याचे ठरवले.
अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास
इ. स. 1733 साली अहिल्याबाई आणि खंडेराव यांचा विवाह मोठ्या थाटामाटात करण्यात आला. अहिल्याबाईंनी मल्हारराव होळकरांच्या घरात त्यांची सून म्हणून प्रवेश केला आणि होळकरांच्या घरामध्ये आनंद आणि उत्साहाला जणू उधाण आले होते. अहिल्याबाईंनी आपल्या प्रेमळ वागण्याने घरातील सर्वांची मने जिंकली.
कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता विनम्रतेने आणि निष्पक्षपातीपणे अहिल्याबाई सर्वांची कामे चोखपणे करत असत. आपल्या सासू सासऱ्यांची सेवा त्या स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांच्या अंगी असणाऱ्या विनयशील आचरणाने आणि दयाळूपणाने थोड्या दिवसातच सर्वांच्या लाडक्या बनल्या.
खंडेराव होळकर हे होळकरशाहीचे वारसदार होते परंतु राज्यकारभार करण्यासाठी आवश्यक असणारे गुण त्यांच्या अंगी नव्हते. खंडेराव एक स्वच्छंदी, चिडखोर, तापट स्वभावाचे होते. खंडेरावांच्या अशा वागण्यामुळे मल्हारराव होळकर नेहमी चिंतित राहत असत.
खंडेरावांना राज्यकारभाराची जरादेखील आवड नव्हती. खंडेरावांचा स्वभाव लहानपणापासूनच हट्टी, भांडखोर आणि चिडखोर होता. अहिल्याबाईंनी आपल्या बिघडलेल्या पतीराजाचे व्यक्तिमत्त्व सुधरवण्याचा प्रयत्न सुरू केला.
अहिल्याबाईंचे शुद्ध प्रेम आणि विनम्र सेवाभाव यामुळे खंडेरावांच्या वाईट वर्तनात बदल घडू लागला. अहिल्याबाई जेव्हापासून खंडेरावांच्या आयुष्यात त्यांची सहचारिणी म्हणून आल्या, तेव्हापासून अहिल्याबाईच्या सहवासाने खंडेरावांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत चालले होते.
अहिल्याबाईंच्या सुशील आचरणाने आणि प्रेमळ वागण्याने खंडेराव नेहमी प्रसन्न असायचे. त्यांच्यामधील वाईट वृत्ती हळूहळू कमी होत चालली होती. खंडेराव आता एक आदर्श गृहस्थ बनत चालले होते.
अहिल्याबाईंच्या प्रेरणेमुळे खंडेराव राज्यकारभार आणि युद्ध शिक्षण शिकू लागले होते. अशा प्रकारे खंडेरावांनी राज्यकारभारात लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी युद्धकलेतही नैपुण्य संपादन केले होते.
काही वर्षातच अहिल्याबाईंना पुत्र झाले. त्याचे नाव मालेराव असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर एक कन्या झाली. कन्येचे नाव मुक्ताबाई असे ठेवण्यात आले होते.
ई.स.1754 साली अजमेर येथे कुंभेरच्या किल्ल्याजवळ होळकर आणि जाट यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. कुंभेरच्या किल्ल्यावरून जाटांनी गोळीबार केला आणि त्यातील एक गोळी खंडेरावांच्या छातीत लागली. खंडेराव धारातीर्थी पडले आणि त्यातच त्यांना वीरगती प्राप्त झाली.
खंडेरावांच्या मृत्यूनंतर आहिल्याबाईंवर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. अहिल्याबाईंनी सती जाण्याचे ठरवले होते. खंडेरावांच्या जाण्यामुळे मल्हारराव खूप दुखी झाले होते. त्यांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून रोखले. मल्हारराव होळकर यांची आज्ञा मानून अहिल्याबाईंनी प्रजाहितासाठी सती न जाण्याचा निर्णय घेतला.
इ.स. 1754 पासूनच अहिल्याबाईंच्या दुःखी जीवनास सुरुवात झाली. खंडेरावांच्या मृत्यूनंतर होळकर घराण्यात मृत्यूची अखंड मालिकाच सुरू झाली होती. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हारराव अत्यंत खचून गेले होते. परंतु तो काळ अत्यंत अराजकतेचा आणि अशांतीचा होता.
इ.स. 1761 च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला होता. देशामध्ये सर्वत्र अशांतता पसरली होती. मराठ्यांच्या झालेल्या पराभवाने त्यांचे विरोधक आनंदित झाले होते. मराठ्यांचे साम्राज्य समूळ नष्ट करण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न चालू होते.
माळवा प्रांतातून मराठा साम्राज्याचा अस्त करण्याचा विरोधक प्रयत्न करत होते. सर्वत्र अशांती, अराजकता, अंदाधुंदी पसरली होती. मराठेशाहीची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती.
अशा अतिशय बिकट प्रसंगी मल्हारराव देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम करत होते. रोजची होणारी दगदग आणि नेहमी होणारी युद्धे यामुळे वृद्धत्वाकडे झुकलेल्या मल्हाररावांची तब्येत बिघडत चालली होती. शेवटी 26 मे 1766 रोजी महापराक्रमी वीरपुरूष मल्हारराव होळकर यांचे निधन झाले.
अहिल्याबाईंना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. मुलाचे नाव मालेराव होते. अहिल्याबाईंनी मालेराव यांचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले. 23 ऑगस्ट 1766 रोजी मालेरावांचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि मालेराव होळकर राज्याचे सर्वाधिकारी बनले.
परंतु मालेरावांना राज्यकारभारात जरासाही रस नव्हता. मालेरावांनी राज्यकारभाराकडे किंचितही लक्ष दिले नाही. काही दिवसातच मालेराव आजारी पडले आणि काही दिवसातच त्यांचे निधन झाले.
मालेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यामातेने राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. तो काळ अत्यंत अशांतीचा आणि अराजकतेचा होता. सर्वत्र अशांतता पसरली होती. पती खंडेराव, त्यानंतर सासरे मल्हारराव आणि मुलगा मालेराव यांच्या मृत्यूने अहिल्याबाई पूर्णत: खचून गेल्या होत्या. अशी जीवाची माणसे एकापाठोपाठ एक निघून गेली होती.
अहिल्याबाईंचा लाडका नातू म्हणजेच मुक्ताबाईचा मुलगा नथू याचाही आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसातच मुक्ताबाईचे पती यशवंतराव फणसे यांचाही आजारपणामुळे मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर अहिल्याबाईंची आता एकुलती एक मुलगी मुक्ताबाईही सती गेली.
अहिल्याबाईंवर एकामागून एक असे दुःखाचे डोंगर कोसळत होते. परंतु त्यांची सदसद्विवेकबुद्धी आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे प्रजाहितासाठी त्या राज्यकारभाराकडे लक्ष देत असत. अहिल्याबाईंनी महेश्वरला राजधानी बनवली आणि तेथूनच त्यांनी राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.
अहिल्याबाईंचे जीवन हे अत्यंत साधे, सरळ आणि प्रेरणा देणारे होते. त्यांच्या जीवनचरित्रामुळे मनुष्याच्या जीवनास योग्य दिशा मिळते. धार्मिकता, कर्तव्यदक्षता आणि प्रजाहित या बाबींना त्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व होते.
हे नक्की वाचा: [Ahilyabai Holkar information in Marathi]
लोकमान्य टिळक यांचे जीवनचरित्र
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवनचरित्र
संत एकनाथ महाराज यांचे जीवनचरित्र
अहिल्याबाई होळकर यांचे कार्य
- अहिल्याबाई होळकर यांनी अनेक धार्मिक कार्य केले आहेत. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेली मंदिरे त्यांनी पुन्हा बांधली. श्रीनगर, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, प्रयाग, वाराणसी, नैमिषारण्य, पुरी, रामेश्वरम, सोमनाथ, महाबळेश्वर, पुणे, इंदूर, उडुपी, गोकर्ण, काठमांडू इत्यादी ठिकाणी भारतभर त्यांनी अनेक मंदिरे बांधली आहेत.
- अहिल्याबाईंनी भारतभर केवळ मंदिरेच बांधली नाहीत, तर अनेक मंदिरे, अनाथाश्रम, अन्नछत्रे, सिंचन तलाव इत्यादी स्थापन केले
- अहिल्याबाईनी स्वतःला पूर्णपणे समाजसेवेत वाहून घेतले. अहिल्याबाईंनी नेहमीच आपल्या प्रजेच्या आणि गरिबांच्या कल्याणाचा विचार केला, त्यासोबतच गरीबजनतेच्या मदतीसाठी त्या सदैव तत्पर होत्या.

अहिल्याबाई होळकर यांची वंशावळ
अनेक इतिहासकारांनी होळकर घराण्याची वंशावळी तयार केल्या आहेत. काळानुसार या वंशावळींमध्ये संशोधन करून बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या वंशावळींमध्ये थोडीफार तफावत आढळू शकते.
अहिल्याबाई होळकर यांची वंशावळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा : अहिल्याबाई होळकर यांची वंशावळ
अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू
राज्याच्या राज्यकारभाराचे ओझे आणि जिवापेक्षा प्रिय असलेल्या माणसांचा एकापाठोपाठ मृत्यू तसेच आयुष्यभर आलेल्या संकटांनी अहिल्याबाईंचा अंत पाहिला होता.
हळूहळू अहिल्याबाईंची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर 13 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्याबाईंचे निधन झाले.

FAQ: [Ahilyabai Holkar information in Marathi]
अहिल्याबाईंनी जवळपास किती वर्षे राज्यकारभार केला?
अहिल्याबाईंनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर इ.स. 1767 ते 1795 पर्यंत होळकर साम्राज्याचा राज्यकारभार पहिला.
अहिल्याबाईंना कोणी शिकवले?
ज्या काळात स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नव्हते त्या काळात अहिल्याबाईंचे वडील माणकोजी शिंदे यांनी अहिल्याबाईना चांगले शिक्षण दिले. माणकोजी यांनी अहिल्याबाईना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. लग्नानंतर राज्यकारभाराचे शिक्षण अहिल्याबाईंनी त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून घेतले होते.
खंडेरावांचा मृत्यू कसा झाला?
ई.स.1754 साली अजमेर येथे कुंभेरच्या किल्ल्याजवळ होळकर आणि जाट यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. या युद्धातच अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला.
अहिल्याबाई होळकर यांच्या आईचे नाव काय होते?
अहिल्याबाई होळकर यांच्या आईचे नाव सुशीलाबाई माणकोजी शिंदे होते.
अहिल्याबाई होळकर जयंती कधी असते?
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी या छोट्याशा खेडे गावात झाला होता. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांची जयंती दर वर्षी 31 मे रोजी साजरी केली जाते.